Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

दारू बनविण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या काळ्या गुळाचा वापर पशू खाद्यासाठी होणार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
हातभट्टीची दारू बनविण्यासाठी जप्त करण्यात आलेला काळा गुळ आता पशू खाद्यासाठी वापरण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला. यामुळे शासनाला महसूलही प्राप्त होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यांच्या सीमा भागात शिरोंजी बडेगाव, देवलापार कांद्री, केळवद, खुर्सा पार, चोरखैरी आदी ठिकाणी चेक नाके लावून सर्व वाहन तपासणी करणेची मोहीम होती घेण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेश राज्यातून नागपूर जिल्ह्यात अवैध रित्या हातभट्टी दारू निर्मिती साठी आलेला साडे चार टन काळा गुळ पकडून गुन्हे नोंदविण्यात आले होते. हातभट्टीच्या कारखान्यांवर छापे टाकून अवैध मद्यसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गुळाचे नमूने प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. जप्त करण्यात आलेला गुळ खाण्यास योग्य नसल्याचे आढळून आले. मनुष्यांसाठी अयोग्य असलेला हा गुळ पशूंचे खाद्य बनू शकतो त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासाठी पाऊल उचलले असून २० रुपये किलो दराने हा गुळ विकण्यात येत असल्याचे दुय्यम निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी सांगितले.

राज्य उत्पादनशुल्क विभागाकडून काळ्या गुळाची तस्करी करणाऱ्या टोळीचा शोध घेणे सुरू आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात हातभट्टी दारूसाठी काळा गुळ पुरविण्यात येतो. काळा गुळ पुरविणाऱ्या केंद्रांचा शोध घेणे सुरू असल्याचे कोरे यांनी सांगितले. उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीचा शोध घेण्यात येत असल्याचे कोरे यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.