९ ऑगस्ट क्रांतीदिन श्री गुरुदेव सेवाश्रम साजरा
श्री गुरुदेव सेवाश्रम, नागपूर येथे ९ आँगस्ट क्रांतीदिन निमित्याने क्रांती लढ्याचे रणशिंग या कार्यक्रमाचे आयोजन करुन क्रांतीविरांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुरेंद्र बुराडे होते त्यांनी ९ आँगस्ट १९४२ च्या स्वातंत्र लढ्यामधे सामील होऊन सर्व सामान्य शेतकरी, कष्टकरी समाजाला लढ्यासाठी प्रेरित केले. अब काहे धुम मचाते, आते है नाथ हमारे पथ्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना असा ईग्रंज सरकारला ईशारा दिला.महाराजांच्या प्रेरणेने गावोगावी आंदोलने झाली परिणामस्वरुप महाराजांना अटक होऊन नागपूर व नंतर रायपुर जेलला रवानगी झाली. माजी पोलीस निरीक्षक श्रीराम सरोदे यांनी त्यांचे वडील सुद्धा महारांजांच्या प्रेरणेने घर दाराची कुटुंबाची पर्वा न करता स्वातंत्र लढ्यात सामील झाले त्यामुळेच पोलीस खात्याची नौकरी स्विकारुन जनतेची सेवा केली.अशी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.अशोक यावले यांनी तुकडोजी महाराज क्रांतीकारी संत होते.त्यांच्या राष्ट्रीय क्रांतीकारी भजनामुळे सर्वसामान्य जनता लढ्यात सामील झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपराव वाघ यांनी तर संचलन राजेश कुंभलकर व आभार सीयाराम चावके यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र पवार, विठ्टलराव तळवेकर, पाडुरंग कडु,मुरलीधर नरड, अशोक काकडे, नंदु लेकुरवाळे, गणराज बसेशंकर, रामचंद्र राऊतउपस्थित होते.