Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०६, २०१९

चंद्रपुरातील काँग्रेसी दर्दी मतदानाला करतील का गर्दी ?

ललित लांजेवार/नागपूर:

निवडणुकीला अवघे ४ दिवस शिल्लक असतांना चंद्रपुरात भाजप व काँग्रेस या दोन पक्षांमधील उमेदवारांमध्ये सध्या फेसबुकसह सोशल मीडियावर चांगलाच वॉर सुरु आहे.एकमेकांवर टीका व खिल्ली उडविण्याचा कार्यक्रम २०१९ च्या या लोकसभा निवळणुकीच्या दरम्यान बघायला मिळत आहे.प्रचारासोबत हाजी हाजी व  विरोध सध्या सोशल मिडीयावर चांगलेच दिसून येत आहे. 

११ एप्रिल ला होणाऱ्या याच लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चंद्रपुरात आले होते.त्यांच्या या सभेला काँग्रेसच्या दर्दी समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती, मात्र हेच समर्थक ११ एप्रिल ला मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी करतील का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे,कारण हि लढत डंके के चोट पे होणारी लढत समजली जात आहे,शुक्रवारी चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे दुपारी राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी आले होते.

 या सभेला काँग्रेसचे माजी माजी खासदार आमदार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सोशल माध्यमावर दाखवण्यात येणाऱ्या फोटो वरून व समर्थकांच्या सांगण्यावरून सभेला चांगलीच गर्दी बघायला मिळाली,सद्या चंद्रपुरात सूर्य आग ओकू लागला आहे, अश्याही परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्त गर्दी जमवली.ह्या गर्दीतील लोक राहुल गांधी यांना बघायला आले असतील हे दिखील नाकारता येत नाही.

मात्र 11 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी हीच गर्दी लोकसभा मतदार संघातील संपूर्ण मतदान केंद्रावर बघायला मिळाली,व धानोरकर विजयी झाले तर काँग्रेसच्या सभेचे व वडेट्टीवार व धानोरकरांच्या मेहनतीचे फलित समजले जाईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.