Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०३, २०१९

भाजप कार्यकर्त्यांचा निषेध; कवाडेंची दिलगिरी



भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

नागपूर - आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र व पीरिपाचे नेते जयदीप कवाडे यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली़ त्यानंतर लकडगंज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवाडेंच्या विधानाचे निषेध नोंदविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कपाळावर मोठे कुंकू, काळी साडी व तोंडाला काळी पट्टी बांधून केला संविधान चौक येथे आंदोलन केले़ त्यानंतर कवाडे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जयदीप कवाडेंविरोधात भाजप महिला आघाडीकडून मूक निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे ही तक्रार आल्यानंतर त्यांनी ती आचारसंहिता कक्षाकडे पाठविली होती. या तक्रारीच्या आधारे पूर्व नागपूरच्या सह निवडणूक निर्णय अधिकाºयांनी लकडगंज पोलिसांत ही तक्रार दाखल केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जयदीप कवाडे यांनी नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सोमवारच्या प्रचार सभेत सदर वक्तव्य केले. कवाडे म्हणाले होते की, स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते, आमच्या नाना पटोले यांनी स्मृती इराणीला थेट संसदेत संविधान बदलणे हे नवरे बदलण्या ऐवढे सोपे काम नाही, असा सवाल केला होता, असा वादग्रस्त दावाही कवाडे यांनी या वेळी केला. कवाडे बोलत असताना पटोले व्यासपीठावर उपस्थित होते. या विधानामुळे काँग्रेसच्याही महिला कार्यकर्त्यांची मान शरमेनं खाली गेली होती, हे विशेष़

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.