Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०४, २०१९

8 लाख 30 हजारची रक्कम जप्त

भद्रावती/ प्रतिनिधी  : 

जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून 8 लाख 30 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. वरोरा येथील तंबाखू विक्रेते आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी चे विक्रेता अनिल फुलचंद शर्मा यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये गरजेपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगल्यास त्या रकमेबाबत चौकशी करण्यात येत आहे. वरोरा येथून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून संशयास्पद रक्कम नेली जाणार असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी खाबांडा भागात ही बस अडवली आणि त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनिल शर्मा यांचेकडे ही रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.