Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०४, २०१९

धानोरकरांसाठी राहुल गांधी शुक्रवारी चंद्रपुरात

चंद्रपूर/प्रतिनिधी:
लोकसभा निवडणुक ऐन आठवडाभरवर येऊन ठेपली असतांना शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले आमदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी राहुल गांधी चंद्रपुरात येणार आहेत.विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात हे मतदान होणार असल्यामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्यासभा विदर्भात होत आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुलगांधी यांची सभा ५ एप्रिल रोजी चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधींना विशेष सुरक्षा असल्यामुळे सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन सातत्याने आढावा घेत आहे. तब्बल पाच वर्षानंतर राहुलगांधी चंद्रपुरात येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येसुद्धा नवचैतन्य निर्माण झाले आहे.
 चांदा क्लब ग्राऊंडवर सभामंडपाची तयारी 
धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली आणि कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी  चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील नांदेड गावात खास दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी राहुल गांधी यांची चंद्रपुरातील सभा विरोधकांची डोकेदुखी वाढविणारी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.मात्र चंद्रपुरात कॉंग्रेसमध्ये असलेले गट हे राहुल गांधी यांच्या सभेला हजरी लावतील का ? व राहुल गांधी भाजपवर कोणता घणाघात करतील ! याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले राहणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.