Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

गोरजा तलावावर उष्माघाताने ९ पक्ष्याचा मृत्यू




चंद्रपूर/प्रतिनिधी 
पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरजा तलावावर ९ पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे, चंद्रपूर हे जगात उष्ण शहरामधून चौथ्या क्रमांकावर असून ४७.३ डिग्री तापमान पोहचते, सध्या एप्रिल महिन्यात ४१.२ ते ४५.०० डिग्री पर्यंत तापमान पोहोचत आहे, उष्णतेची लाटेचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्हा हा जंगलाने व्यापलेला क्षेत्र असून सुद्धा, येथे कोळसा च्या खाणी व सिमेंट उद्योगामुळे तापमानात वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे, गोरजा तलावावर नेहमी प्रमाणे स्तलांतरित पक्ष्यांच्या अभ्यास करण्याकरिता हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे करण तोगट्टीवार व रोहित बेलसरे गेले होते, त्यांना -३-ढोकरी (pond heron ), २-टिटवी (red-wattled lapwing ), १-शेकोट्या (Black winged stilt ),१-धोबी (grey wagtail ) व २- गायबगळा (Cattle egret ) हे पक्षी

मृत अवस्थेत आढळले, आणखी पाहणी केले असता एक राखी बगळा नावाचा पक्षी (grey heron) खूप वेळेचा एकाच ठिकाणी बसल्याचे लक्षात आले, पाहनि करण्यासाठी जवळ गेले असता त्याची हालचाल खूप सुस्त दिसली, नंतर लक्षात आले कि तो स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नव्हता, लगेच त्याची माहिती वनविभागाला दिली व त्याला रेस्क्यु करून ट्रान्सीट ट्रीटमेंट सेन्टर, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले, तेथील डॉक्टरने तपासणी केल्यावर सांगितले कि उंष्माघाताने पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे व राखी बगळ्याला सुद्धा उष्माघाताचा परिणाम झाल्याचे सांगितले , पण तो ३-४ दिवसात बरा होईल असे सांगितले सध्या ट्रान्सीट ट्रीटमेंट सेन्टर मध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहे.

चंद्रपूर जिह्यात असे अनेक तलाव आहे जिथे भरपूर प्रमाणात पक्षी असतात व त्यांचाही मृत्यू उष्माघाताने होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही, सिंदेवाही तालुक्यात सुद्धा भरपूर प्रमाणात पक्षी आहे तेथील पक्षीमित्रांनी सुद्धा तलावावर काय स्तिथी आहे ती तपासणे गरजेचे झाले आहे, तलावाजवळील झाडांची कत्तल झाल्याने पक्ष्यांना आसरा घेण्यासाठी झाड नसल्याने त्यांना तलावावरच आसरा घ्यावा लागतो, विकासाच्या नावावर अश्याच झाडांची कत्तल झाली तर त्यांचा प्रभाव मानवाला व प्राण्यांना सुद्धा भोगावा लागेल, झाडे लावून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे, तरच हे जीवसृष्टी जगू शकेल अन्यथा कित्येक पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू होईल याचे आकडे सुद्धा सांगणे कठीण होईल, आधीच पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, जसे वाघांना प्राध्यान देण्यात येते तसेच पक्ष्यांना प्राध्यान देत नाही, पण पक्ष्यांचा सुद्धा विचार करून त्यांच्यासाठी उपाय योजना केल्या तर पक्ष्यांचा संख्येत वाढ होईल. उष्माघात ने ९ पक्ष्यांचा मृत्यू तर एका पक्ष्याचा जीव वाचवण्यात संस्थेच्या सदस्यांना यश आले, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे शशांक मोहरकर, दिनेश खाटे, पिंटू उईके ,ओंकार मते, स्वप्नील बांदूरकर उपचार दरम्यान उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.