Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

टिईटी अपात्र शिक्षकांचे वेतन थांबू देणार नाही

🔵 शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची गर्जना
🔵 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची भूमिका



नागपूर - 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टिईटी अपात्रच्या आडून वेतन थांबविण्याची धमकी शिक्षण विभागातर्फे देण्यात येत आहे. मात्र टिईटीग्रस्त कोणत्याही शिक्षकांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नसल्याची स्पष्ट भूमिका शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी जाहीर केली.*

गुरुवारी (ता 25) महाल येथील छत्रपती विद्यालयात टिईटी ग्रस्त शिक्षकांची सहविचार सभा पार पडली. या *सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे संस्थापक मार्गदर्शक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सर, तर मार्गदर्शक म्हणून विजुक्टा संघटनेचे पदाधिकारी व प्राचार्य विलास केरडे, विभागीय सचिव खिमेश बढिये उपस्थित होते*.

13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टिईटी अनिवार्य करण्यात आली असून 30 मार्च 2019 ही त्यांची अंतिम डेडलाईन ठरविण्यात आली आहे. नागपूर माध्यमिक विभागाने जवळपास 15 शिक्षकांचे टिईटीच्या कारणास्तव पगार थांबविले आहे तर प्राथमिक वेतन पथक अधिक्षकांनी 30 मार्च पर्यंत टिईटी पात्र अपात्र कर्मचार्‍यांची यादी मुख्याध्यापक पातळीवरून संकलीत करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्य़ातील 456 प्राथमिक व 79 माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात आज टिईटीग्रस्त शिक्षकांची सहविचार सभा पार पडली. यात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उच्च न्यायालय नागपूर येथून प्राप्त झालेल्या चार प्रकरणातील Stay Order च्या प्रती विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच वेतन पथक अधिक्षक यांना सोमवारी (ता 29) सादर करुन कोणत्याही शिक्षकाला वेतनापासून वंचित ठेवू नये अशी भूमिका व विनंती प्रशासनास करणार आहे. याचवेळी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत टिईटी शिक्षकांना अद्याप एक संधी बाकी असल्याने कुठलिही कार्यवाही करु नये अशी विनंती केली. यासंदर्भात लवकरच सुधारित पत्र काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) प्रशासनासोबत निरंतर पत्र व्यवहार करुन टिईटी मुक्त शिक्षक करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे व विभागीय सचिव खिमेश बढिये यांनी दिले.

बैठकीला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे, शहर संघटक समीर काळे, शहर संघटक रविकांत गेडाम, टिईटी कृती समन्वयक व पारशिवनी तालुका संघटक भीमराव शिंदेमेश्राम, स्वप्निल झलके, अमोल राठोड, माध्यमिक विभाग संघटक राजू हारगुडे, प्रफूल देवतळे, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, विभागीय संघटक महेश गिरी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अरविंद शेंडे, अल्पसंख्याक संघटक गौरव दातीर, जिल्हा महिला संघटक प्रमुख प्रणाली रंगारी, कमलेश कामळे, अंकुश कडू, मेघा ढोरे, प्रणाली खवले,सचिन कोवे, शारदा समरित, प्रेरणा हिरेखन, अपर्णा मसराम, निनाद वंजारी, लोकोत्तम बुटले, पी. पी. बोमीडवार, एस वी डेकाटे, सत्यभामा दुबे, रिना टाले, शोयब काझी यासह टिईटी धारक , विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.