Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०५, २०१९

अडीच लाख लोकसंख्येला सांभाळतात फक्त ४५ पोलीस कर्मचारी

लोकसभा निवडणूकीचा वाढला भार
१०१ बुथ मात्र वाडी पोलीस ८८ पोलीस कर्मचारी
५० वर्षापासून पोलीस स्टेशन भाड्याच्या घरात 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:

लोकसभा निवडणुकीचा जस जसा ज्वर वाढत आहे तस-तसा पोलीसावरील ताण वाढत आहे. वाडी पोलीस स्टेशन मध्ये फक्त ८८ पोलीस कर्मचारी अडीच लक्ष लोकसंख्येचा सांभाळ करतात त्यामध्ये १५ ते १६ पोलीस कर्मचारी असतात साप्ताहीक सुटीवर, तर ९ ते १० काही कोर्ट व इतर कामात व्यस्त असतात. सुरक्षेसाठी फक्त ४५ कर्मचारी दिवस व रात्रीच्या वेळी आपले कर्तव्य बजावतात .

पोलिस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे उपस्थित अधिकारी यांना सुरक्षा करतांना तणावाचे वातावरण निर्माण होते .तर दुसरीकडे लोकांचे नेते अनेक प्रकरणांविषयी हस्तक्षेप करून आरोपीची बाजू घेतात . आणि पोलिस विभागाची बाजू न घेता बदनामी करतात.परंतु लोकसंख्येनूसार पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी वाढवण्याची मागणी आज पर्यंत कोणत्याही नेत्यानी केली नाही.वाडी ठाण्यात फक्त ४ बीट मार्शल बाईक आहे,त्यात चारही बाईक दुरूस्त नसल्यामुळे पोलीस स्वतःच्या बाईक ने पेट्रोलिंग करतात.येत्या गुरूवार ११ एप्रील रोजी लोकसभेचे निवडणूक आहे. वाडी पोलीस क्षेत्रात काही भाग रामटेक,नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये येते. ह्या क्षेत्रात १०१ निवडणूक बूथ आहेत.

ज्यासाठी पोलिसांना बंदोबस्त करिता बाहेरून पोलीस मागीतल्या जाणार आहे .चेक पोस्टवर,वाडीतील ४ ते ५ पोलीस सतत कर्तव्य बजावत आहेत.वाडी पोलीस स्टेशन हा ७ ग्रामपंचायत व १ नगर पालीकाचा क्षेत्र आहे.वाडी पोलीसात एकूण ८८ पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत, ज्यात पीआई १,दुय्यम पीआई १,एपीआई १,महिला एपीआई १ ,पीएसआई ४,महिला १ ,एक रजेवर,असे २२,एनपीसी १८,पीसी २९ महिला पोलीस १२ आहे.जे सुरक्षतेसाठी खूप कमी प्रमाणात पोलीस आहेत.तसेच पोलीस स्टेशनला आवश्यकता पोलीस निरीक्षक २ , पोलीस उप निरीक्षक ४ ,महिला १,पीएसआई ८,महिला ३,पुलिस कर्मचारी २५ व महिला १२ पुलिस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.पोलीस मिळाल्यावर, वाडीच्या प्रत्येक तक्रारीसाठी पोलिस वेळ देण्यास सक्षम असतील आणि पोलिसांना आपराधिक प्रकरणांवर खटला चालविण्यास वेळ लागणार नाही.अडीच लक्ष लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला फक्त ४५ पोलीस संभाळत आहेत.

वाडी स्टेशनचे क्षेत्र खूप मोठे व लांब आहे. हद्दीत ४ बीट डॉ .आंबेडकर नगर-कंट्रोल वाडी,दत्तवाडी,आठवा मैल, वडधामना आहे. सात ग्रामपंचायत व एक नगरपालिका आहेत.ज्यात नगरपालिका आहे व जवळपास अडीच लाख लोकसंख्या आहे. क्षेत्र मोठे असून फक्त ४५ पोलिस दिवस पाळी व रात्र पाळी सांभाळतात.ज्यामुळे पोलीस नेहमीच प्रत्येक तक्रारीकडे लक्ष देतात,परंतु महत्त्वपूर्ण घटनासमोर आल्यामुळे पोलीस लहान घटनांवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.त्यामुळे वाडी स्टेशनवर लोक पोहचल्याने पोलिसांना अनभिज्ञ असल्याचा आरोप करीत आहेत.त्यातच वाडी पोलीस स्टेशनची इमारत ही ५० वर्षापासून किरायाने राहत आहे. 

ही इमारत आयुध निर्माणी अंबाझरी डिफेन्स ची आहे. पन्नास वर्षापासून वाडी पोलीस स्टेशन किरायात आहेत.येथील पोलिसांना स्वतःच्या डोक्यावर स्वतःचे छत नाही. कोणी नागपूर मधून आहे,कोणी हिंगणा मधून आहे,तर कोणी वाडीमध्ये किरायच्या घरी राहत आहे.जर पोलीस निवासी झाले तर पोलिसांची समस्या कमी होईल आणि घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होणार नाही.

कित्येक वेळा काम जास्त प्रमाणात असल्यामुळे पोलीस स्टेशन खाली होऊन जाते .पोलीस स्टेशनच्या बाजूला जंगल असल्यामुळे नेहमीच साप निघत असतो .काही दिवसा अगोदर महिला तक्रार केंद्रात कोब्रा निघाला होता. अशा प्रकारे अनेकदा साप निघाल्याच्या घटना घडल्या आहे . येथे पोलिसच सुरक्षित नाही. तर जनता कशी सुरक्षित राहणार?

प्रतिक्रिया 
आवश्यकतेनुसार पोलीसांची मागणी करण्यात येते.वाडी ठाण्यात कमी मनूष्यबळ आहे.निवडणुकीत मजबूत सुरक्षा बल असेल, चेक पोस्टद्वारे तपासणी होत आहे.अनुचित प्रकरणावर कारवाई होईल त्यांना सोडणार नाही.
विवेक मासाळ
डीसीपी झोन न १ ,नागपुर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.