Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१
गोंदिया पोलीस दलाची शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांना श्रद्धांजली
राष्ट्रीय पोलीस शहीद दिनाचे कान्होली ,नवेगावबांध येथे आयोजन
संजीव बडोले / प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.21ऑक्टोबर:-
राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त गोंदिया पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोंबर रोज गुरुवारला पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत मौजा कान्होली व नवेगावबांध येथे पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.,शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहीले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंगनडोह गावाजवळील पुलावर 20 जानेवारी 2003 ला नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात कान्होली येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम राहिले हे शहीद झाले होते. 21 ऑक्टोबरला भारतात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृती जागवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने दरवर्षी शहीद दिन पाळला जातो.
गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी जालंधर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिस दलाच्या वतीने मौजा कानोली येथील चौकात असलेल्या शहिद दीपक सखाराम रहीले पोलीस उपनिरीक्षक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, 2 मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाला शहिद दिपक रहिले यांचे मातोश्री सुभद्राबाई रहिले, त्यांच्या मोठ्या भगिनी लताबाई थेर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, प्राचार्य राठोड उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगावबांध येथेही पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या मातोश्री सुभद्राबाई राहिले त्यांच्या मोठ्या भगिनी लताबाई थेर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. ठाणेदार हेगडकर यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. ठाणेदार जनार्दन हेगडकर, प्राचार्य राठोड यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक राहिले यांच्या बलिदाना विषयी स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका ए.आर. कुथिरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पोलीस हवालदार तुलावी यांनी मानले. कार्यक्रमाला कान्होली येथील गावकरी, विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी, गावकरी, आबालवृद्ध महिला-पुरुष नवेगावबांध पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१
शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयं रोजगाराची संधी - किशोर तरोणे
शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयं रोजगाराची संधी - किशोर तरोणे
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२० ऑक्टोबर:-
उषा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी दिल्ली व अफार्म पूणे आणि ग्राम विकास संस्था भंडाराच्या वतीने शिलाई शिक्षीका प्रशिक्षणाचे आयोजन रुखमा महिला महाविघालय नवेगावबांध येथे आयोजीत करण्यात आले.त्यात उद्घाटन प्रंसगी शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून, महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळतअसुन उषा कंपणी कडून सिलाई मशिन दुरुस्तीचे काम.नवनवीन डिझाईनचे ब्लाउज या प्रशिक्षणातून मिळाल्यानंतर ह्या प्रशिक्षणातील महिला सक्षम अशी ब्लाऊज डिझायनर बनेल आणि ती महिला इतरांना सुद्धा शिकवेल त्यातून, मिळालेल्या रकमेतून त्या आपल्या कुंटुबाचा आधार बनेल.असे वक्तव्य जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी काढले.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, रुखमा महिला महाविद्यालयाचे संस्थापिका वैशालीताई बोरकर , संस्थापक एकनाथ बोरकर तसेच उषा शिलाई इंटरनॅशनल लिमिटेड महाराष्ट्राचे समन्वयक परेश नागपूरे पूणे, ' ट्रेनर सुनयना रणदिवे मुंबई.ट्रेनर वर्षा मते हे उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास संस्था भंडाराचे संचालक दिलीप बिसेन तर आभार किशोर रंगारी समन्वयक यांनी मानले.कार्यकम यशस्वीतेसाठी सर्व २० प्रशिक्षणार्थी तसेच रुखमा महीला महाविद्यालय नवेगावबांध चे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले .
बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीचा इतिहास घडविला - प्रभाकर दहिकर
बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीचा इतिहास घडविला - प्रभाकर दहिकर
बोळदे येथे धम्मचक्र वर्धापनदिन साजरा
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.20 ऑक्टोबर:
सामान्य माणसाला जन्म देणे सोपे आहे, पण जीवन देणे फार कठीण काम आहे. लाखो लोकांना दीक्षा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी या जगात ऐतिहासिक धम्मक्रांतीचा इतिहास घडविला हे कोणी नाकारु शकणार नाही. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिकर यांनी केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मुन्नाभाई नंदागवळी यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश चिमणकर, दादाजी चिमणकर, मंगलमूर्ती रामटेके, डिलक्स सुखदेवे, ग्रामसेवक शरद चिमणकर, अनिल चिमणकर, चंद्रशेखर रामटेके, मनोज रामटेके, मेश्राम, ज्ञानू प्रधान, रुपलाल चिमणकर, डोंगरे, आदी मान्यवर प्रामुख्याने होते.
प्रबुद्ध पंचशील बौद्ध समाज बोळदे येथे दि. १४ आक्टोबर सायंकाळी ०६.०० वाजता धम्मध्वज ध्वजारोहण करण्यात आले. तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माळार्पण करण्यात आले. नंतर समतावादी रॅली गावात काढण्यात आली व सहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रम संचालन व आभार धम्मदीप मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी शुभम हुमणे, रमण रामटेके, शैलेश रामटेके, विशाल मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१
गोंदियात धानशेतीवर दोन दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रम |
नागपूर | 13 ऑक्टोबर 2021
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयच्या अंतर्गत नागपूरच्या सिवीललाईन्स स्थित नवीन सचिवालय भवन येथील केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र (आर.सी.आई.पी.एम.सी.) नागपूरतर्फे धानशेतीवर दोन दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रमाचे आयोजन गोंदीया जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्र हिवरा, येथे दिनांक 11 व 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.डी. चौहान, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदिया. आणि तालुका कृषी अधिकारी श्री.डी.एल. तुमडाम होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल आर.सी.आई.पी.एम.सी.चे प्रमुख डॉ.ए.के. बोहरिया यांनी टोळ नियंत्रणावर माहिती दिली . जेव्हा शेतात गरज असेल तेव्हा एकाच वेळी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या खर्चामध्ये बचत करता येईल आणि पर्यायाने कमी पर्यावरणीय प्रदूषण होईल आणि या व्यतिरिक्त, कीटक रसायनांविरूद्ध हानिकारक कीटकांच्या आत निर्माण झालेली प्रतिकारशक्ती तेथे राहणार नाही. कमीतकमी रसायनांचा वापर करून आपल्या पिकांचे कीटकांपासून संरक्षण करू शकता. आणि याद्वारे शुद्ध अन्नधान्य आणि अन्नधान्य शेतकरी मिळवू शकतात असे डॉ. बोहरिया यांनी सांगितल
आर.सी.आई.पी.एम.सी.चे उपसंचालक डॉ शिवाजी हरिदास वावरे यांनी सांगितले की, रासायनिक कीटकनाशकांचा वापर नेहमी पिकांमध्ये सिद्ध आणि सुरक्षित स्वरूपात केला पाहिजे. डॉ.मनीष मुंडे सहाय्यक संचालक, यांनी धानामधील कीटकांची ओळख आणि व्यवस्थापनाबद्दल आपले मत व्यक्त केले. डॉ सुरेश नायक, गिरीश, छाया पासी, यांनीही कार्यक्रमात तांत्रिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा आणि ट्रायकोग्रामाच्या वापराबद्दल तंत्र समजावून सांगितले . कार्यक्रमाला हिवरा गावातील शेतकरी उपस्थित होते.
केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र नागपुर क्षेत्रीय कार्यालय द्वारा धान पर दो दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रम का गोंदिया में आयोजन
केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र नागपुर (क्षेत्रीय कार्यालय), भारत सरकार, कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, (कृषि सहकारिता एवं किसान कल्याण विभाग), वनस्पति संरक्षण संगरोध एवं संग्रह निदेशालय की तरफ से धान पर दो दिवसीय मानव संसाधन विकास पर आधारित कार्यक्रम आयोजित किया गया । इस कार्यक्रम का आयोजन कृषि विज्ञान केंद्र गांव हिवरा, तालुका एवं जिला गोंदिया में दिनांक 11से 12 अक्तुबर तक किया गया.
इस कार्यक्रम के मुख्य अतिथि श्री आर.डी. चौहान, कृषि विज्ञान केंद्र, गांव- हिवरा, जिला- गोंदिया । तथा तालुका कृषि अधिकारी श्री डी.एल.तुमडाम उपस्थित थे। श्री चौहान ने बताया कि, धान में एकीकृत नासीजीव प्रबंधन के बारे में तथा आर.सी.आई.पी.एम.सी. कार्यालय के कार्यालय प्रमुख डॉ ऐ. के. बोहरिया उप निदेशक (कीट विज्ञान) ने किसानों तथा पेस्टिसाइड डीलरों का आई पी एम के बारे में विशेष ध्यान आकर्षित किया । टिड्डी नियंत्रण पर भी व्याख्यान दिया,और बताया कि आई पी एम की चार विधियां के बारे में जैसे की नंबर 1) व्यवहारिक पद्धति 2) यांत्रिक पद्धति 3) जैविक पद्धति 4) रासायनिक पद्धति को किसनो के स्तर पर लागू करवाना है। जिसके दौरान यह बताया गया कि खेत में जब जरूरत हो जहां जरूरत हो उसी समय रसायन कीटनाशकों का उपयोग करना।जिससे किसानों को अनेक फायदे होंगे। तथा फसल की लागत में कमी होगी,वातावरण प्रदूषण कम होगा, और मानव संबंधित रोग कम होंगे। और इसके अलावा जो हानिकारक कीटों के अंदर प्रतिरोधक क्षमता कीट रसायनों के प्रति पैदा हो जाती थी वह नहीं हो होगी । कम से कम रसायन का प्रयोग करके अपनी फसलों को कीड़ों से बचा सकते हैं । और इससे हमें शुद्ध अनाज एवं खाद्यान्न मिल सकेंगे ।
इसके बाद आरसीआईपीएमसी, नागपुर से उपनिदेशक डॉ शिवाजी हरिदास वावरे ने बताया कि फसलों में हमेशा प्रमाणित एवं सुरक्षित रूप में रासायनिक कीटनाशक का उपयोग करना चाहिए। उसके बाद डॉ. मनीष के मुंडे सहायक निदेशक, ने धान में लगने वाले कीटों की पहचान एवं उनके प्रबंधन के बारे में अपने विचार व्यक्त किए । तथा डॉ सुरेश नायक श्री गिरीश, कुमारी छाया पासी, श्री एसएस टॉक एपीपीओ इत्यादि ने कार्यक्रम में तकनीकी गतिविधियों में भाग लिया तथा ट्राइकोडर्मा तथा ट्राइकोग्रामा के उपयोग के बारे में किसानों को तकनीकी के बारे में बताया और इस प्रकार कार्यक्रम संपन्न हुआ.
Two day human resource development based program on paddy farming in Gondia
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारा बौद्धधम्म आपणास दिला- हरिश्चंद्र लाडे
संजीव बडोले/प्रतिनिधी
नवेगावबांध ता.१३ ऑक्टोबर:-
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारा बौद्धधम्म आपणास दिला. प्रज्ञा,शील, मैत्री या तत्वांशी आपल्या जीवनाची सांगड घातली. विज्ञाननिष्ठ, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे तत्व मानणारा, मैत्रीला अग्रस्थान देणारा धम्म असून बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली ही देणगी आहे. हे तत्त्व आपण जीवनात अंगीकारले पाहिजे. असे प्रतिपादन प्रबोधनकार हरिश्चंद्र लाडे यांनी केले. ते नगर बौद्ध समाज नवेगावबांध च्या वतीने आज दिनांक 13 ऑक्टोंबर रोज बुधवारला दुपारी तीन वाजता आयोजित अशोक विजयादशमी निमित्त धम्म प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. आज धम्म प्रबोधनाचे पहिले पुष्प होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधनकार हरिश्चंद्र लाडे हे होते. तर अतिथी म्हणून प्रा. अश्विन लांजेवार, सपना बनसोड, भास्कर बडोले ,भीमराव मोटघरे, समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे,कोषाध्यक्ष देवदास बडोले,दुर्योधन राऊत उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सर्वांना बुद्ध धम्माची जाणीव असणे गरजेचे आहे. प्रबोधन कार्यक्रमातून आपण जे ऐकतो, त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःला बदलण्याची मानसिकता बनविणे गरजेचे आहे. मनाचा दृढनिश्चय हाच सर्व वाईट व्यसनावर विजय मिळविण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांचा धम्म रथ मागे न नेता, सर्वांनी पुढे नेण्याचे आवाहन प्रा. अश्विन लांजेवार यांनी केले. सपना बनसोड यांनी, जगात दुःख आहे. त्याला कारण आहे. अन ते निवारण्याचे उपायही आहे. अशी विचारसरणी भगवान बुद्धाने जगाला दिली आहे. मी म्हणतो म्हणून ते स्वीकारा असा हट्ट न धरता, जानिए, छानिए और मानिए असे विचार स्वातंत्र्य बुद्धाने जगाला दिले. आपले विचार जगावर लादले नाही. बुद्ध भूमी, बुद्ध व त्यांचे विचार आपणापर्यंत पोचण्याचे अनमोल कार्य बाबासाहेबांनी केले. असे प्रतिपादन सपना बनसोडे यांनी आपल्या भाषणातून केले. भास्कर बडोले यांचेही यावेळी भाषण झाले.
भिमराया मुळे मी पाहिली मंगल धम्म प्रभात ही कविता सरगम शहर यांनी उपस्थितांना ऐकवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे सचिव सरगम सहारे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार हेमचंद लाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश सहारे हेमलता बडोले, भिमाबाई सहारे, निरुपा राऊत यांनी सहकार्य केले.
रविवार, ऑक्टोबर १०, २०२१
उद्या कडकडीत नवेगावबांध बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन
उद्या कडकडीत नवेगावबांध बंदचे महाविकास आघाडीचे आवाहन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१० ऑक्टोबर:-
उद्या दिनांक ११ ऑक्टोंबर रोज सोमवारला राज्यातील महा विकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला समर्थन देण्यासाठी उद्या नवेगावबांध बंद ला व्यापारी प्रतिष्ठाने व जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन स्थानिक महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्ष नेत्यांनी केले आहे. या आंदोलनात स्थानिक जनतेला व व्यापारी प्रतिष्ठान यांना सहभागी करून घेण्यासाठी विचार विमर्श करण्यासाठी नवेगावबांध येथील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी पक्ष नेत्यांची आज तातडीची सभा येथे घेण्यात आली. यात नितीन पुगलिया, संतोष नरुले, बबलू शिपानी, कमलकिशोर जयस्वाल, जगदीश पवार ,परेश उजवणे रत्नदीप दहिवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तरोने, शिवसेना गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, होमराज गाहणे, बंटी गुप्ता, मोटाभाई, पोवळे यांच्या उपस्थितीत येथे सभा घेण्यात आली . गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावे. आणि महाराष्ट्र कडकडीत बंद पाळण्यात यावा . लखिमपुर घटनेचा निषेध करावा. असे महाविकास आघाडी पक्ष नेत्यांनी नागरिकांना व व्यापारी प्रतिष्ठानांना यावेळी विनंती केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात covid-19 लसीकरणाचे कवचकुंडल अभियान आरंभ
गोंदिया जिल्ह्यात covid-19 लसीकरणाचे कवचकुंडल अभियान आरंभ
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.10 ऑक्टोबर:-
8 ऑक्टोंबर रोज गुरुवारपासून राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने covid-19 लसीकरणाचे कवच कुंडल हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत अठरा वर्षाच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. सर्व नागरिकांचे पहिला डोस या अभियानांतर्गत पूर्ण होईल यावर जोर दिला जात आहे. या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यात हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात यावे. असे दिनांक 7 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकान, महिला बचत गट, शेतकरी बचत गट, राजकीय पदाधिकारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे आदेशात म्हटले आहे. कवचकुंडल अभियानाअंतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावरील नियोजन बैठकीचे आयोजन करून तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी नगरपरिषद पंचायत चे मुख्याधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कृषी अधिकारी इत्यादींनी या अभियानाला सहकार्य करावे. तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी 18 वर्षावरील कोविड लसीकरण न झालेल्या व दुसरा डोस करिता शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांची गाव निहाय यादी आरोग्य सेविका व सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्याची सूचना केली आहे. या मोहिमेत शिक्षण विभागाची देखील सहकार्य घेण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर कोविन ऍपवर लाभार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याकरता शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे व मोहीमे करिता लसीकरण केंद्रावर शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. असेही आदेशात पुढे म्हटले आहे. 1 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर दरम्यान covid-19 लसीकरणाच्या मिशन कवच-कुंडल या अभियानांतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे. हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
उद्या महाराष्ट्र बंद समर्थनार्थ अर्जुनीमोर तालुका बंद
उद्या महाराष्ट्र बंद समर्थनार्थ अर्जुनीमोर तालुका बंद
बंद मध्ये व्यापारी, जनतेने सहभागी होण्याचे तालुका महविकास आघाडीचा आवाहन
संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१० ऑक्टोबर:-
निर्दयी केंद्र शासनाच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करण्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलकांवर निर्दयीपणे गाडी चालवून हत्या केली. त्याचा निषेध नोंदवून हत्याराला अटक करून गुन्हा दाखल करावा.यासाठी महाराष्ट्र राज्य बंद करण्यासंदर्भात अर्जुनी मोरगाव तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय तालुक्यातील महाविकास आघडी सरकारातील राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथील सभेत घेतला आहे.अर्जुनी मोरगाव तालुका 11 ऑक्टोंबर 2021ला कडकडीत बंद ठेवून राज्य सरकारला पूर्णपणे समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावातील शाळा ,व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने सोमवारला बंद ठेवून दुपारी 11 वाजता दुर्गा चौक अर्जुनी मोरगाव येथून निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी व्हावे. नंतर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहेत. यावेळी तालुक्यातील शेतकरी ,शेतमजूर, व्यवसायिक, व्यापारी, महिला व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले. या संदर्भात हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये घेण्यात आलेल्या बंद समर्थनात सभेला आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,लोकपाल गाहाने,कांग्रेसचे भागवत नाकाडे, बंशिधर लंजे ,संजय पवार, विजय सिंह राठोड ,राकेश लंजे, कृष्णा शहारे ,प्रकाश उके, यादव कुंभरे, रविचंद्र देशमुख, योगेश नाकाडे ,चंद्रशेखर नाकाडे, उद्धव मेहेंदळे ,राकेश जयस्वाल ,वीरेंद्र जीवानी ,राजेंद्र जांभूळकर, भोजराम रहिले ,त्रिशरण सहारे व इतर उपस्थित होते
अर्जुनी मोरगाव तालुक्यात कवच-कुंडल अभियान शंभर टक्के यशस्वी करा - उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे
अर्जुनी मोरगाव तालुक्यात कवच-कुंडल अभियान शंभर टक्के यशस्वी करा. -उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.10 ऑक्टोबर:-
आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोज शनिवार ला covid-19 लसीकरणाचे कवच-कुंडल अभियान यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुनीमोरगाव आकाश अवतारे, तहसीलदार विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी निमजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७५ ग्राम समिती, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांची झूम मीटिंग दुपारी 12:00 वाजता आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व सरपंचांना विनंती करण्यात आली की, आपण आपल्या गावात 100% Covid-19 लसीकरणाचे कवच-कुंडल अभियान यशस्वी करावे. 100% लसीकरण कार्य पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येईल. असेही यावेळी जाहीर करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका अर्जुनी मोरगाव सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच 100 % लसीकरण करण्यास प्रशासनास मदत करतील. असे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात covid-19 लसीकरणाचे कवच कुंडल अभियान हे शंभर टक्के यशस्वी होईल, यात शंका नाही.
चान्ना येथे विद्यार्थिनींना सायकल चे वाटप
चान्ना येथे विद्यार्थिनींना सायकल चे वाटप
संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध ता.१०
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चांन्ना बाकटी येथे दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी अनुसूचित जातीच्या इयत्ता सातवी व आठवी मध्ये शिकणाऱ्या ७ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.
राज्य शासनाकडून जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी मुलींना शाळेत येणे-जाणे करण्यासाठी सायकलचे वाटप करण्यात येते. त्याअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सातवी व आठवीच्या सात विद्यार्थिनींना सायकल मंजूर झालेले आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच देवकाबाई मरस्कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश राखडे,शाळेचे मुख्याध्यापक डी.टी.
सलामे, विद्यार्थिनींचे पालक व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.
शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१
आकाश अवतारे अर्जुनीमोरगाव चे नवे उपविभागीय अधिकारी
आकाश अवतारे अर्जुनीमोरगाव चे नवे उपविभागीय अधिकारी
गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१
नवरात्र,दसरा,धम्मचक्र प्रवर्तन उत्सव शांततेत पार पाडा - ठाणेदार जनार्धन हेगडकर
नवरात्र,दसरा,धम्मचक्र प्रवर्तन उत्सव शांततेत पार पाडा - ठाणेदार जनार्धन हेगडकर
नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे आगामी उत्सवा संबंधाने बैठक संपन्न
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.7 ऑक्टोबर:-
आगामी उत्सव दुर्गा,शारदा व धम्मचक्र प्रवर्तन दिननिमीत्ताने आज दिनांक 6 ऑक्टोबर रोज बुधवारला संध्याकाळी 4.00 पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पोलीस पाटील,सर्व मंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष ,पोलीस मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
राज्यात कोविड-१९ कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा दुर्गा,शारदा मातेच्या मुर्तीची स्थापना दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर बैठकीत उपस्थित पोलीस पाटील, पोलीस मित्र, दुर्गा शारदा मंडळ, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना राज्यात कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नवरात्र उत्सव,दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन दरम्यान सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये. म्हणून आगामी नवरात्र उत्सव संबंधाने शासनाचे दि. ४आक्टोंबर २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत असताना सामाजिक दुरावा राखून शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करावा. जास्त गर्दी न करता दुर्गा, शारदा मातेची मूर्ती जास्त मोठी न ठेवता , नागरिकांना अवाजवी वर्गणी न मागता, विनाकारण डि.जे.,मोठे पंडाल न उभारता, मिरवणूका न काढता, उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करु नये, जेणेकरून सामान्य जनतेला आर्थिक अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत तसेच दुर्गा, शारदा मातेच्या मुर्तींचे विसर्जन नदी, तलावात न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यात विसर्जन करावे, याबाबत सुचना दिल्यात.दुर्गा, शारदा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी आपल्या मंडळातर्फे स्वयं प्रेरणेने गरजु लोकांची मदत करावी व सामाजिक जनजागृती करावी याबाबत मार्गदर्शन करून सदर उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन ठाणेदार हेगडकर यांनी केले.सदर बैठकीला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 27 गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र ,24 दुर्गा, शारदा मंडळ,संघटनेचे पदाधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. बैठक कोरोना प्रोटोकॉल पाळण्यात आला.
बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१
नवरात्र उत्सव संबंधाने पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे दुर्गा,शारदा मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पहाणी
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पहाणी
गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानपिकाचे प्रचंड नुकसान
नुकसान भरपाई मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही- हेमंत पटले
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.५.
यावर्षी पाणीपाऊस व्यवस्थीत असला तरी गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील धानाचे पिक हे तीस टक्केवर येवुन ठेपले आहे. दोन वर्षापासुन सुरू असलेला कोरोणा काळ व सतत लाॅकडाऊन मुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी या परिसरातील मुख्य पिक म्हणजे धान पिक मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.सर्व सुव्यवस्थित असताना यावेळी धान पिकावर गादमाशी या रोगाचा प्रंचड प्रादुर्भाव असल्याने धान पिके नष्ट झाली आहेत.त्यामुळे शेतकरी यांच्या व्यथा व नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नवेगांवबांध , परसोडी परिसरातील विविध गावातील शेतात जावुन पहाणी केली.
यावर्षीच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांची दयनीय अवस्था झाली आहे. ती शेतक-यांच्या बांधावर जावुन प्रत्यक्ष पाहणीनुसार गादमाशी, तुडतुडा ,चित्रलोंबी, कडीकरपा, या विविध रोगानी धानाचे पिक बहुतांशी प्रमाणात नेस्तनाबूत झाले आहेत.त्यामुळे शेतकरी नैराश्येतुन हवालदिल झाला आहे त्यामुळे एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकरीवर्गाने मागणी केली आहे. यावर माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भारतीय जनता पार्टी सदैव शेतकरी यांचे पाठीसी असुन नुकसानग्रस्त शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- हेमंत पटले
आज आम्ही संपूर्ण जिल्ह्य़ात फिरून नुकसानग्रस्त शेतातील पाहणी करत आहोत .विविध किडी व रोगांमुळे जिल्ह्य़ातील शेतकरी फार चिंतातुर झालाय, अशा परिस्थितीत शासनाकडून मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही .अशा बिकट परिस्थितीत जिल्हा भाजपा शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे मत भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी परसोडी येथे बोलतांना व्यक्त केले.
------
नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार हेमंत पटले,माजी आमदार रमेश कुथे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे,शेषराव गिर्हेपुंजे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय टेंभरे,रघुनाथ लांजेवार, विजयाताई कापगते, खुशाल काशिवार, होमराज पुस्तोळे, अन्ना डोंगरवार, गौरेश ब्राम्हणकर, भोजु लोगडे, नुतनलाल सोनवाने, व्यंकट खोब्रागडे, अनिरुद्ध शहारे, अण्णा डोंगरवार तामदेव कापगते व अन्य भाजपा कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
थाडेझरी येथे वन्यजीव सप्ताह साजरा
थाडेझरी येथे वन्यजीव सप्ताह साजरा
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आयोजन
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.6 ऑक्टोबर:-
नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र नागझिरा अंतर्गत वनग्राम थाडेझरी येथे ५आक्टोंबर ला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.वन्यजीव सप्ताह निमित्ताने वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली.वन्यजीव सप्ताह १आक्टोंबर ते ७ आक्टोंबर या दरम्यान साजरा केला जातो.याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.एम.कुंभरे अध्यक्ष ईडीसी समिती, तेजराम सोनवाने ,वंदनाताई वाळवे माजी ग्रा.प. सदस्या,बहुरे क्षेत्रसहायक नागझिरा संकुल,पटले वनरक्षक थाडेझरी बिट,कानगुले वनरक्षक,जे.जे. केंदरे वनरक्षक, पारधी वनरक्षक,जी.एस.सिंगनजुडे स.शि. ,शिवराम मरस्कोल्हे,दसाराम पंधरे,अजित वाळवे,केवळराम कुंभरे,संपत ऊईके,शालीनीताई कुंभरे,सौ.किरण मरस्कोल्हे आणि जि.प.प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.वन्यजीव सप्ताह निमित्त गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी बहुरे क्षेत्रसहायक नागझिरा संकुल यांनी मार्गदर्शन केले. वन्यप्राणी,वनांचे महत्त्व,वनांचा मानवी जीवनाशी संबंध याविषयी मार्गदर्शन केले.यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.रॅली काढण्यात आली .व शेवटी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन पारधी वनरक्षक यांनी केले तर कानगुले वनरक्षक यांनी आभार मानले.
चांन्ना बाकटी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे नवीन रुग्णवाहिके चे लोकार्पण
चांन्ना बाकटी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे नवीन रुग्णवाहिके चे लोकार्पण
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.५ ऑक्टोबर:-
आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटी येथे केंद्राला मिळालेल्या नवीन रुग्णवाहिके चा लोकार्पण रुग्णाच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुळकर्णी,वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे,आरोग्य सेविका भूमाली उईके, पर्यवेक्षीका नंदेश्वर ,औषधनिर्माता शिरपात्रे,सुमित्रा,बंडू शेंडे,बाळू झोळे,घनश्याम उरकुडे, टांगले,सातारे,आशा गट प्रवर्तक राखडे,अंगणवाडी सेविका, आशा गट प्रवर्तक उपस्थित होते. गेल्या काही वर्षापासून चांन्ना आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये एकच रुग्णवाहिका होती. त्यामुळे चांन्ना बाकटी क्षेत्रातील लोकांना वेळोवेळी या रुग्णवाहिकेची आरोग्य सेवा उपलब्ध होइल, याबाबत परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१
देशात वाघाचे अस्तित्व याचे सर्व श्रेय व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जाते - संचालक रामानुजम
देशात वाघाचे अस्तित्व याचे सर्व श्रेय व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जाते - संचालक रामानुजम
नवेगावबांध येथे टायगर फार इंडिया, रॅली ऑन व्हील चे जंगी स्वागत
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.4 ऑक्टोबर:-
वन्यजीव सप्ताह च्या प्रारंभी या रॅलीचे आगमन झाले आहे. व्याघ्र संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व सर्व कर्मचारी यांच्या प्रयत्न व जागरूकतेमुळे आज मीतिला देशात २२६७ वाघ आहेत. याचे सर्व श्रेय व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जाते. या रॅली पासून प्रेरणा घेऊन आणखी हे काम पुढे नेण्याचे आवाहन नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आर. एम. रामानुजम यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
ते भारत सरकारच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण नवी दिल्लीच्या वतीने टायगर फार इंडिया या उपक्रमांतर्गत रॅली ऑन व्हील च्या आगमना प्रसंगी नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प व नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती उपयार्डात कार्यक्रमात बोलत होते. वनविभागाच्या रॅली ऑन व्हील चे जंगी स्वागत येथे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आर. एम रामानुजम हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ताडोबा अंधेरी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. एस. भागवत,ए. एस. अग्रवाल सहसंचालक, प्रल्हाद यादव सहसंचालक अचानकमार व्याघ्र संरक्षण प्रकल्प छत्तीसगड, नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे उपसंचालक पुनम पाटे, दादा राऊत उपवनसंरक्षक वन विभाग प्रादेशिक, पी. एस. आत्राम, वनक्षेत्र अधिकारी एस. आर.मेश्राम, अजय कावरे,वाघ,मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे, रुपेश निंबार्ते, लोकपाल गाहणे, हिवराज राऊत, जयेश कापगते, रामदास बोरकर, संजीव बडोले यावेळी उपस्थित होते. आरंभी वृक्ष पूजा करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
टायगर फार इंडिया अंतर्गत रॅली ऑन व्हील चा शुभारंभ 28 सप्टेंबरला छत्तीसगड राज्यातील जिल्हा मंगोली स्थित अचनकमर व्याघ्र संरक्षण प्रकल्पातून झाला. उदंती सीतानदी, गाझियाबाद, इंद्रावती बिजापूर, ताडोबा अंधेरी व्याघ्र संरक्षण प्रकल्प चंद्रपूर असा प्रवास करीत, ही रॅली नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे १ आक्टोंबर वन्यजीव सप्ताहाच्या प्रसंगी पोहोचली. पेंच, बोर, व्याघ्रप्रकल्प असा प्रवास करीत या रॅलीचा समारोप अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे 6 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
दिवसेंदिवस देशातील वाघांची घटणारी संख्या हा चिंतनाचा विषय झाला आहे. आपण सर्व मिळूनच वाघांचे संरक्षण व संवर्धन करू शकतो. ही जबाबदारी आपल्या खांद्यावर असून, व्याघ्र संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधानाची भावना बाळगावी. सर्वांनी आत्मचिंतन करून जंगलाच्या, व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या प्रेमात माणसं पडावी. तरच आपण आपल्या कार्यात यशस्वी होऊ.
वन सेवेत काम करण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली. हे आपले भाग्य आहे.असे प्रतिपादन ताडोबा अंधेरी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. एस. भागवत यांनी केले.देशातील विविध व्याघ्र संरक्षण प्रकल्पात समन्वय साधावा, तेथील अडीअडचणीची जाणीव व्हावी, देशांतर्गत व्याघ्र संरक्षण प्रकल्पात समन्वय साधला जावा, प्रकल्पात काय वैविध्य आहे. याची आपसात माहिती व्हावी, प्रकल्पाअंतर्गत वैचारिक व व्यवस्थापनाच्या पातळीवर देवाण-घेवाण व्हावी. हा या रॅली ऑन व्हील चा उद्देश असल्याचे भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले.व्याघ्र संरक्षण प्रकल्पात व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृतीवर जास्त भर दिला जाईल. असे आपल्या प्रास्ताविकातून नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या उपसंचालक पुनम पाटे यांनी मांडले.
व्याघ्र संरक्षण प्रकल्प, विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन विभाग प्रादेशिक व राष्ट्रीय उद्यान च्या वतीने येथे रॅली काढण्यात आली.व्याघ्र संरक्षण ,वसुंधरा व पर्यावरण यांच्या संवर्धनाची जागृती, वन्य प्राण्यांचा गमती साठी होणारा छळ, पशुपक्षी यांचे संवर्धन, बदलणाऱ्या पर्यावरणाचे स्वरूप याविषयी विक्रम फडके आणि चमू यांच्या असर फाउंडेशन भंडारा च्या वतीने जनजागृतीपर कला पथकाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी व्याघ्र संरक्षण शपथ घेतली.नवेगाव राष्ट्रीय उद्यान राखीव चे वनक्षेत्र अधिकारी व या कार्यक्रमाचे आयोजक सचिन डोंगरवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक अरविंद बडगे यांनी केले.कार्यक्रमाला नवेगाव नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प,नवेगाव राष्ट्रीय उद्यान, विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन विभाग प्रादेशिक चे सर्व अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

