अर्जुनी मोरगाव तालुक्यात कवच-कुंडल अभियान शंभर टक्के यशस्वी करा. -उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.10 ऑक्टोबर:-
आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोज शनिवार ला covid-19 लसीकरणाचे कवच-कुंडल अभियान यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुनीमोरगाव आकाश अवतारे, तहसीलदार विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी निमजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७५ ग्राम समिती, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांची झूम मीटिंग दुपारी 12:00 वाजता आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व सरपंचांना विनंती करण्यात आली की, आपण आपल्या गावात 100% Covid-19 लसीकरणाचे कवच-कुंडल अभियान यशस्वी करावे. 100% लसीकरण कार्य पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात येईल. असेही यावेळी जाहीर करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका अर्जुनी मोरगाव सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच 100 % लसीकरण करण्यास प्रशासनास मदत करतील. असे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात covid-19 लसीकरणाचे कवच कुंडल अभियान हे शंभर टक्के यशस्वी होईल, यात शंका नाही.