Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

gondiya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
gondiya लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

निधनवार्ता -  कान्होलीचे भोजराज दोनोडे यांचे दुःखद निधन

निधनवार्ता - कान्होलीचे भोजराज दोनोडे यांचे दुःखद निधन


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध ता.२१.
भोजराज लव्हाजी दोनोडे (वय ४९ वर्षे) ग्रामपंचायत सदस्य राहणार कान्होली यांचा २० ऑक्टोबर रोज बुधवारला रात्री०८.४५ वाजे उपचारा दरम्यान नागपुर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पाथिक शरिरावर आज दिनांक २१ ऑक्टोबर रोज गरुवारला स्थानिक मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी ,दोन मुली व मोठा आप्तपरिवार आहे.
गोंदिया पोलीस दलाची शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांना श्रद्धांजली

गोंदिया पोलीस दलाची शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांना श्रद्धांजली



राष्ट्रीय पोलीस शहीद दिनाचे कान्होली ,नवेगावबांध येथे आयोजन


संजीव बडोले / प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.21ऑक्टोबर:-

राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त गोंदिया पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोंबर रोज गुरुवारला पोलीस ठाणे नवेगावबांध अंतर्गत मौजा कान्होली व नवेगावबांध येथे पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.,शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहीले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चीचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंगनडोह गावाजवळील पुलावर 20 जानेवारी 2003 ला नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात कान्होली येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम राहिले हे शहीद झाले होते. 21 ऑक्टोबरला भारतात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृती जागवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने दरवर्षी शहीद दिन पाळला जातो.

गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी जालंधर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिस दलाच्या वतीने मौजा कानोली येथील चौकात असलेल्या शहिद दीपक सखाराम रहीले पोलीस उपनिरीक्षक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, 2 मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाला शहिद दिपक रहिले यांचे मातोश्री सुभद्राबाई रहिले, त्यांच्या मोठ्या भगिनी लताबाई थेर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, प्राचार्य राठोड उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगावबांध येथेही पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या मातोश्री सुभद्राबाई राहिले त्यांच्या मोठ्या भगिनी लताबाई थेर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. ठाणेदार हेगडकर यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. ठाणेदार जनार्दन हेगडकर, प्राचार्य राठोड यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शहिद पोलीस उपनिरीक्षक दीपक राहिले यांच्या बलिदाना विषयी स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका ए.आर. कुथिरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पोलीस हवालदार तुलावी यांनी मानले. कार्यक्रमाला कान्होली येथील गावकरी, विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी, गावकरी, आबालवृद्ध महिला-पुरुष नवेगावबांध पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

बुधवार, ऑक्टोबर २०, २०२१

 शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयं रोजगाराची संधी - किशोर तरोणे

शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयं रोजगाराची संधी - किशोर तरोणे

 शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयं रोजगाराची संधी - किशोर तरोणे






 


संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.२० ऑक्टोबर:-

उषा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी दिल्ली व अफार्म पूणे आणि ग्राम विकास संस्था भंडाराच्या वतीने शिलाई शिक्षीका प्रशिक्षणाचे आयोजन रुखमा महिला महाविघालय नवेगावबांध येथे आयोजीत करण्यात आले.त्यात उद्घाटन प्रंसगी शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून, महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळतअसुन उषा कंपणी कडून सिलाई मशिन दुरुस्तीचे काम.नवनवीन डिझाईनचे ब्लाउज या प्रशिक्षणातून मिळाल्यानंतर ह्या प्रशिक्षणातील महिला सक्षम अशी ब्लाऊज डिझायनर बनेल आणि ती महिला इतरांना सुद्धा शिकवेल त्यातून, मिळालेल्या रकमेतून त्या आपल्या कुंटुबाचा आधार बनेल.असे वक्तव्य जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी काढले.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, रुखमा महिला महाविद्यालयाचे संस्थापिका वैशालीताई बोरकर , संस्थापक एकनाथ बोरकर तसेच उषा शिलाई इंटरनॅशनल लिमिटेड महाराष्ट्राचे समन्वयक परेश नागपूरे पूणे, ' ट्रेनर सुनयना रणदिवे मुंबई.ट्रेनर वर्षा मते हे उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास संस्था भंडाराचे संचालक दिलीप  बिसेन तर आभार किशोर रंगारी समन्वयक यांनी मानले.कार्यकम यशस्वीतेसाठी सर्व २० प्रशिक्षणार्थी तसेच रुखमा महीला महाविद्यालय नवेगावबांध चे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले .

बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीचा इतिहास घडविला  - प्रभाकर दहिकर

बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीचा इतिहास घडविला - प्रभाकर दहिकर

बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीचा इतिहास घडविला  - प्रभाकर दहिकर 

 बोळदे येथे धम्मचक्र वर्धापनदिन साजरा






संजीव बडोले  प्रतिनिधी.


नवेगावबांध ता.20 ऑक्टोबर: 

 सामान्य माणसाला जन्म देणे सोपे आहे, पण जीवन देणे फार कठीण काम आहे. लाखो लोकांना दीक्षा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी या जगात ऐतिहासिक धम्मक्रांतीचा इतिहास घडविला हे कोणी नाकारु शकणार नाही. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिकर यांनी केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मुन्नाभाई नंदागवळी यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश चिमणकर, दादाजी चिमणकर, मंगलमूर्ती रामटेके, डिलक्स सुखदेवे, ग्रामसेवक शरद चिमणकर, अनिल चिमणकर, चंद्रशेखर रामटेके, मनोज रामटेके, मेश्राम, ज्ञानू प्रधान, रुपलाल चिमणकर, डोंगरे, आदी मान्यवर प्रामुख्याने होते. 

प्रबुद्ध पंचशील बौद्ध समाज बोळदे येथे दि. १४ आक्टोबर सायंकाळी ०६.०० वाजता धम्मध्वज ध्वजारोहण करण्यात आले. तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माळार्पण करण्यात आले. नंतर समतावादी रॅली गावात काढण्यात आली व सहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 

कार्यक्रम संचालन व आभार धम्मदीप मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी शुभम हुमणे, रमण रामटेके, शैलेश रामटेके, विशाल मेश्राम यांनी परिश्रम घेतले. 

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

गोंदियात धानशेतीवर दोन दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रम |

गोंदियात धानशेतीवर दोन दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रम |


केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने गोंदियात धानशेतीवर दोन दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रमाचे आयोजन


नागपूर | 13 ऑक्टोबर 2021
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयच्या अंतर्गत नागपूरच्या सिवीललाईन्स स्थित नवीन सचिवालय भवन येथील केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र (आर.सी.आई.पी.एम.सी.) नागपूरतर्फे धानशेतीवर दोन दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रमाचे आयोजन गोंदीया जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्र हिवरा, येथे दिनांक 11 व 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.डी. चौहान, कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदिया. आणि तालुका कृषी अधिकारी श्री.डी.एल. तुमडाम होते.

एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल आर.सी.आई.पी.एम.सी.चे प्रमुख डॉ.ए.के. बोहरिया यांनी टोळ नियंत्रणावर माहिती दिली . जेव्हा शेतात गरज असेल तेव्हा एकाच वेळी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या खर्चामध्ये बचत करता येईल आणि पर्यायाने कमी पर्यावरणीय प्रदूषण होईल आणि या व्यतिरिक्त, कीटक रसायनांविरूद्ध हानिकारक कीटकांच्या आत निर्माण झालेली प्रतिकारशक्ती तेथे राहणार नाही. कमीतकमी रसायनांचा वापर करून आपल्या पिकांचे कीटकांपासून संरक्षण करू शकता. आणि याद्वारे शुद्ध अन्नधान्य आणि अन्नधान्य शेतकरी मिळवू शकतात असे डॉ. बोहरिया यांनी सांगितल

आर.सी.आई.पी.एम.सी.चे उपसंचालक डॉ शिवाजी हरिदास वावरे यांनी सांगितले की, रासायनिक कीटकनाशकांचा वापर नेहमी पिकांमध्ये सिद्ध आणि सुरक्षित स्वरूपात केला पाहिजे. डॉ.मनीष मुंडे सहाय्यक संचालक, यांनी धानामधील कीटकांची ओळख आणि व्यवस्थापनाबद्दल आपले मत व्यक्त केले. डॉ सुरेश नायक, गिरीश, छाया पासी, यांनीही कार्यक्रमात तांत्रिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा आणि ट्रायकोग्रामाच्या वापराबद्दल तंत्र समजावून सांगितले . कार्यक्रमाला हिवरा गावातील शेतकरी उपस्थित होते.


केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र नागपुर क्षेत्रीय कार्यालय द्वारा धान पर दो दिवसीय मानव संसाधन विकास आधारित कार्यक्रम का गोंदिया में आयोजन

केंद्रीय एकीकृत नाशीजीव प्रबंधन केंद्र नागपुर (क्षेत्रीय कार्यालय), भारत सरकार, कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, (कृषि सहकारिता एवं किसान कल्याण विभाग), वनस्पति संरक्षण संगरोध एवं संग्रह निदेशालय की तरफ से धान पर दो दिवसीय मानव संसाधन विकास पर आधारित कार्यक्रम आयोजित किया गया । इस कार्यक्रम का आयोजन कृषि विज्ञान केंद्र गांव हिवरा, तालुका एवं जिला गोंदिया में दिनांक 11से 12 अक्तुबर तक किया गया.

इस कार्यक्रम के मुख्य अतिथि श्री आर.डी. चौहान, कृषि विज्ञान केंद्र, गांव- हिवरा, जिला- गोंदिया । तथा तालुका कृषि अधिकारी श्री डी.एल.तुमडाम उपस्थित थे। श्री चौहान ने बताया कि, धान में एकीकृत नासीजीव प्रबंधन के बारे में तथा आर.सी.आई.पी.एम.सी. कार्यालय के कार्यालय प्रमुख डॉ ऐ. के. बोहरिया उप निदेशक (कीट विज्ञान) ने किसानों तथा पेस्टिसाइड डीलरों का आई पी एम के बारे में विशेष ध्यान आकर्षित किया । टिड्डी नियंत्रण पर भी व्याख्यान दिया,और बताया कि आई पी एम की चार विधियां के बारे में जैसे की नंबर 1) व्यवहारिक पद्धति 2) यांत्रिक पद्धति 3) जैविक पद्धति 4) रासायनिक पद्धति को किसनो के स्तर पर लागू करवाना है। जिसके दौरान यह बताया गया कि खेत में जब जरूरत हो जहां जरूरत हो उसी समय रसायन कीटनाशकों का उपयोग करना।जिससे किसानों को अनेक फायदे होंगे। तथा फसल की लागत में कमी होगी,वातावरण प्रदूषण कम होगा, और मानव संबंधित रोग कम होंगे। और इसके अलावा जो हानिकारक कीटों के अंदर प्रतिरोधक क्षमता कीट रसायनों के प्रति पैदा हो जाती थी वह नहीं हो होगी । कम से कम रसायन का प्रयोग करके अपनी फसलों को कीड़ों से बचा सकते हैं । और इससे हमें शुद्ध अनाज एवं खाद्यान्न मिल सकेंगे ।

इसके बाद आरसीआईपीएमसी, नागपुर से उपनिदेशक डॉ शिवाजी हरिदास वावरे ने बताया कि फसलों में हमेशा प्रमाणित एवं सुरक्षित रूप में रासायनिक कीटनाशक का उपयोग करना चाहिए। उसके बाद डॉ. मनीष के मुंडे सहायक निदेशक, ने धान में लगने वाले कीटों की पहचान एवं उनके प्रबंधन के बारे में अपने विचार व्यक्त किए । तथा डॉ सुरेश नायक श्री गिरीश, कुमारी छाया पासी, श्री एसएस टॉक एपीपीओ इत्यादि ने कार्यक्रम में तकनीकी गतिविधियों में भाग लिया तथा ट्राइकोडर्मा तथा ट्राइकोग्रामा के उपयोग के बारे में किसानों को तकनीकी के बारे में बताया और इस प्रकार कार्यक्रम संपन्न हुआ. 

 Two day human resource development based program on paddy farming in Gondia