बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीचा इतिहास घडविला - प्रभाकर दहिकर
बोळदे येथे धम्मचक्र वर्धापनदिन साजरा
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.20 ऑक्टोबर:
सामान्य माणसाला जन्म देणे सोपे आहे, पण जीवन देणे फार कठीण काम आहे. लाखो लोकांना दीक्षा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी या जगात ऐतिहासिक धम्मक्रांतीचा इतिहास घडविला हे कोणी नाकारु शकणार नाही. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिकर यांनी केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मुन्नाभाई नंदागवळी यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश चिमणकर, दादाजी चिमणकर, मंगलमूर्ती रामटेके, डिलक्स सुखदेवे, ग्रामसेवक शरद चिमणकर, अनिल चिमणकर, चंद्रशेखर रामटेके, मनोज रामटेके, मेश्राम, ज्ञानू प्रधान, रुपलाल चिमणकर, डोंगरे, आदी मान्यवर प्रामुख्याने होते.
प्रबुद्ध पंचशील बौद्ध समाज बोळदे येथे दि. १४ आक्टोबर सायंकाळी ०६.०० वाजता धम्मध्वज ध्वजारोहण करण्यात आले. तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माळार्पण करण्यात आले. नंतर समतावादी रॅली गावात काढण्यात आली व सहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रम संचालन व आभार धम्मदीप मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी शुभम हुमणे, रमण रामटेके, शैलेश रामटेके, विशाल मेश्राम यांनी परिश्रम घेतले.