नवरात्र उत्सव संबंधाने पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे दुर्गा,शारदा मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.६ ऑक्टोबर:-
राज्यात कोविड-१९ कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा दुर्गा,शारदा मातेच्या मुर्तीची स्थापना करून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी यांचे समक्ष पोलीस स्टेशन डुग्गीपार चे ठाणेदार सचीन वांगडे यांनी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे दुर्गा शारदा मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची दि.६आक्टोंबर २०२१ रोजी सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करून अध्यक्ष व पदाधिकारी यांची आगामी नवरात्र,दसरा उत्सव साजरा करण्यासंबंधी बैठक आयोजित केली.
सदर बैठकीत अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी व डुग्गीपार पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचीन वांगडे यांनी उपस्थित दुर्गा शारदा मंडळाचे अध्यक्ष,पदाधिकारी यांना कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवरात्र उत्सव दरम्यान सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आगामी नवरात्र उत्सव संबंधाने शासनाचे दि. ४आक्टोंबर २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत असताना सामाजिक दुरावा राखून शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यासंबंधाने जास्त गर्दी न करता दुर्गा, शारदा मातेची मूर्ती जास्त मोठी ठेवता , नागरिकांना अवाजवी वर्गणी न मागता विनाकारण डि.जे.,मोठे पंडाल न उभारता, मिरवणूका न काढता, उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करु नये, जेणेकरून सामान्य जनतेला आर्थिक अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तसेच दुर्गा, शारदा मातेच्या मुर्तींचे विसर्जन नदी, तलावात न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यात विसर्जन करावे, याबाबत सुचेना दिल्या.दुर्गा, शारदा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी आपल्या मंडळातर्फे स्वयं प्रेरणेने गरजु लोकांची मदत करावी व सामाजिक जनजागृती करावी याबाबत मार्गदर्शन करून सदर उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, नरेंद्र गावंड तहसीलदार सडक अर्जुनी, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, हद्दीतील पोलीस पाटील,दुर्गा, शारदा मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.