Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

Chanadrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Chanadrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, सप्टेंबर १९, २०२३

 आमदार किशोर जोरगेवारांच्या घरी बाप्पांचे आगमन

आमदार किशोर जोरगेवारांच्या घरी बाप्पांचे आगमन

जोरगेवार कुटुंबीयांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोपासली
 गणेश उत्सवाची परंपरा, यंदा 93 वे वर्ष

चंद्रपूर:
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणराया विराजमान झाले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांनी गणेश मुर्तीची विधीवतरित्या स्थापना केले. यंदा हे त्यांचे ९३ वे वर्ष असुन जोरगेवार कुटुंबियांची दुसरी पिढी हि परंपरा चालवत आहे.


गणेशोत्सवाची महती जोरगेवार कुटुंबीयांनी मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चर्तुथी निमित्त त्यांच्या घरी गणराया विराजमान झाले. त्यांच्या या उत्सवाला ९३ वर्षांची पंरपरा असुन स्वातंत्रपुर्व काळापासुन ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहे.

रविवार, सप्टेंबर ०३, २०२३

 शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी कार्यालयात 'बैठा सत्‍याग्रह

शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी कार्यालयात 'बैठा सत्‍याग्रह

प्रलंबित समस्‍यांबाबत 'विमाशि' संघाचा आक्रमक पवित्रा
चंद्रपूर:
जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत शिक्षणाधिकारी (मांध्य.) जि.प. चंद्रपूर यांच्या कार्यालयात आमदार तथा विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात शिक्षक दिनी ५ सप्‍टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेपासून बैठा सत्‍याग्रह विमाशि संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्‍च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍या निवारणार्थ २४ मे २०२३ राेजी सहविचार सभा घेण्यात आली होती. त्‍यात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आश्‍वासन दिले होते. मात्र, अजूनही अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आलेले नाही. याबाबत त्‍यांना वारंवार सांगूनही टाळाटाळ केली जात आहे. जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निकाली निघत नसल्‍याने शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याप्रती तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन समस्‍याग्रस्‍त कर्मचाऱ्यांसह बैठा सत्‍याग्रह करीत असल्‍याबाबतचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्‍त (शिक्षण), शिक्षण संचालक (माध्य.) पूणे, शिक्षण उपसंचालक, नागपूर तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सादर केलेले आहे.

 आयुक्‍तांकडे निवेदन पोहोचताच त्‍यांनी तात्‍काळ दखल घेत शिक्षण उपसंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्‍यावर शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षण उपसंचालकांनी आमदार सुधाकर अडबाले यांना सत्‍याग्रह मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आमदार अडबाले यांनी बैठा सत्‍याग्रह कोणत्‍याही परिस्‍थितीत मागे न घेण्याचा निर्णय घेतल्‍याने शिक्षण विभाग धास्‍तावून सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या मागे लागले अाहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍या निवारणार्थ होणाऱ्या बैठा सत्‍याग्रहात शिक्षक-शिक्षकेत्तर तथा समस्‍याग्रस्‍त शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्‍थित राहण्याचे आवाहन महा. राज्‍य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, मंजुषा धाईत, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंटीवार, शालीक ढोरे, नितीन जीवतोडे, सोनाली दांडेकर, वसुधा रायपुरे, दिपक धोपटे, मारोतराव अतकरे, अध्यक्ष (ग्रामीण) सतीश अवताडे, कार्यवाह (ग्रामीण) अनिल देरकर, मुकेश खोके, बशीर सर, प्रशांत कष्टी, शरद डांगे, शहर अध्यक्ष जयंत टोंगे, शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, देवेंद्र बलकी, बंडूजी वांढरे, दादाराव श्रीरामे, शकील सर, रवि येसांबरे, प्रभाकर ढवस व सर्व सदस्‍यांनी केले आहे.

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत

डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत

नागपूर:
ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ ऍड अंजली साळवे आणि भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनने दाखल केलेल्या याचिकेमुळे ओबीसींना न्याय मिळेल असा विश्वास डॉ ऍड अंजली साळवे यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरु झाली आणि त्यापाठोपाठ देशाच्या इतरही राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील डॉ ऍड अंजली साळवे यांनी 2019 सालापासून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी विविध स्तरावर आंदोलने आणि निवेदनेच नव्हे तर विधिमंडळात ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करून तो केंद्राकडे पाठवण्याची मागणी करत केंद्र जर ओबीसी गणना करत नसेल तर ती राज्यांनी करावी ही मागणी लावून धरली त्याला प्रतिसाद म्हणून 2020 ला तत्कालीन राज्य सरकार द्वारे ओबीसी जनगणना ठराव पारित झाला, परंतु केंद्राने तो फेटाळून लावला. डॉ साळवे यांनी कित्येक खासदारांमार्फत ओबीसी जनगणनेचा लढा संसदे पर्यंत पोहोचवित सर्वोच्च न्यायालयात देखील आपला लढा सुरु केला.

जनगणना कायद्यानुसार देशातील राज्यनिहाय लोकसंख्येची माहिती एकत्रित करणे, तसेच वर्ग, जाती, उपजाती आणि तत्सम माहिती सरकारद्वारे गोळा करणे अपेक्षित आहे व त्याआधारे जनतेसाठी शासकीय योजनांची आखणी, धोरण निश्चिती, त्यांचे नियोजन व अंमलबजावणी करायची असतांना सरकार जवळ मागासवर्गीय घटकांचा नेमका आकडाच नसतांना इतकी वर्षे कोणत्या आधारावर या घटकांसाठी नियोजन केले जात आहे हे एक कोडंच असल्याचे मत डॉ साळवे यांनी व्यक्त केल आहे.

मागासवर्गीयांना केवळ वोट बँक म्हणून वापरलं जातं आहे, परंतु त्यांची नेमकी संख्या किती आहे, याबाबत कोणीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्याचे शल्य आहेत, भारतीय राज्य घटना तसेच जनगणना कायद्यानुसार इतर मागासवर्गिय घटकांची जनगणना होणे अपेक्षित असतांना अनुसूचित जाती - जमाती सोबतच इतर मागासवर्गियांची सुद्धा स्वतंत्र जनगणना होणे अपेक्षित आहे. इतर मागासवर्गियांच्या जनगणनेच्या घटकांचा मुद्दा जनगणनेत दुर्लक्षित केल्या जात असल्याने दिवंगत ऍड भगवान पाटील व इतरांनी दाखल केलेल्या 2001 व 2011 च्या याचिकेला पुनर्जीवित करण्यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये मध्यस्थ म्हणून मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता, उच्च न्यायालयात त्यांचे सहकारी ऍड अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

ओबीसी जनगणनेची न्यायालयीन लढाई अधिक सशक्त व्हावी यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटने सोबत काही कायदेशीर डावपेचा अंतर्गत मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. सोबतच इतर राज्याच्या ओबीसी जनगणनेची प्रकरणे मा.सर्वोच्च न्यायालयात एकत्र असल्याचे डॉ. साळवे यांनी सांगितले. ओबीसी घटकांचा समावेश जनगणनेच्या प्रश्नावली नमुन्यात होईस्तोवर प्रस्तावित जनगणनेला स्थगिती देण्यात यावी सोबतच यासंदर्भात इतरही योग्य वाटत असेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निगर्मित करण्याची प्रार्थना या अर्जात त्यांनी केली आहे.

ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसी (व्हीजे, एनटी, डिएनटी, एसबीसी) चा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ अशी पाटी लावा मोहिम सुरु करणा-या डॉ साळवे यांच्या प्रयत्नांना सामान्य ओबीसी नागरिकांकडून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत असून या मोहिमेचे लोण आता विदर्भासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. मंडल आयोगाच्या शिफ़ारसीनुसार माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारने ओबीसीसाठी लागू केलेल्या आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर डॉ ऍड अंजली साळवे यांची ओबीसी जनगणना 2021, न्यायालय, संसद, विधीमंडळ, पाटी लावा ही मोहीम ऐतिहासिक ठरली आहे. प्रस्तावित जनगणनेत इतर मागासवर्गिय घटकांची स्वतंत्र गणना झाल्यास आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या उपेक्षित घटकांना जनगणनेत यथोचित स्थान मिळेल व लोकसंख्येच्या अनुपातात त्यांना त्यांचा हक्क मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
 ४७ मोकाट गायींची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी

४७ मोकाट गायींची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी

चंद्रपूर:
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४७ गायींना / म्हशी पकडुन त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशनची गोशाळा येथे करण्यात आली आहे.

मोकाट जनावरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कठोर कारवाई करण्याची सुरवात करण्यात आली आहे.

मागील महिन्यापासुन मनपाच्या पथकाने नागपूर रोड, राष्ट्रवादी नगर, तुकूम, बंगाली कॅम्प, बागला चौक, गांधी चौक बाजार,दाताला रोड रामसेतु इत्यादी परिसरात कारवाई करत मोकाट असलेली ४७ जनावरे पकडण्यात आली आहे. त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशन येथे करण्यात आली सर्व मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बुधवार, जुलै २६, २०२३

राज्‍यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

राज्‍यात १५ ऑगस्टपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकीत 
प्रश्‍नावर शिक्षणमंत्र्यांचे उत्तर
चंद्रपूर : राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १५ ऑगस्टपासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असे सभागृहात सांगितले. यामुळे टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. उच्‍च श्रेणी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्‍या पदोन्नतीचे पद व विस्‍तार अधिकारी व सहायक शिक्षकांची पदे कधी भरणार? व जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर नियुक्‍ती करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विचारला.

शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. आता कोर्टाने स्थगिती हटविली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हापरिषद बिंदुनामावली कायम करून १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित करणार आहे. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला प्रसिध्द होईल. त्यानंतर ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान नेमणुका देण्यात येईल. त्यानंतर २१ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरदरम्यान जिल्हा पातळीवर समुपदेशन करण्यात येईल. राज्यातील शिक्षकांची रिक्‍त पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू होत आहे. तथापि, मा. न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास अंतरीम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन तसेच पदभरतीसंदर्भात कार्यवाही करणे सद्य:स्थितीत शक्य नाही, असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर सांगितले.
तसेच जिल्‍हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्‍वावर करण्यात येणारी नियुक्‍ती ही तात्‍पुरत्‍या स्‍वरुपाची असून शिक्षकभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर नियुक्‍ती राहणार असल्‍याची माहिती तारांकीत प्रश्‍नावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकभरतीची अनेक दिवसांपासून राज्‍यातील सुशिक्षीत बेरोजगार आतूरतेने वाट बघत हाेते. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया १५ ऑगस्‍टपासून सुरू होणार असल्यामुळे टीईटी धारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवार, जुलै २४, २०२३

अंधाधुंध फायरिंग में भाजयुमोर्चा के जिल्हा उपाध्यक्ष की पत्नी की मौत

अंधाधुंध फायरिंग में भाजयुमोर्चा के जिल्हा उपाध्यक्ष की पत्नी की मौत


चंद्रपुर/राजुरा:
महाराष्ट्र के चंद्रपूर जिल्हे के राजुरा कस्बे का सोमनाथपुर इलाका रविवार के शाम फिल्मी स्टाइल फायरिंग से दहल गया. इसी क्षेत्र में रहने वाले चंद्रपुर जिले के भाजपा युवा मोर्चा के जिला उपाध्यक्ष सचिन डोहे के घर पर अज्ञात व्यक्ति ने सचिन डोहे की पत्नी पूर्वाषा सचिन डोहे, उम्र 27 वर्ष की गोली मारकर हत्या कर दी।

प्राप्त जानकारी के मुताबिक, हत्यारों का निशाना लल्ली शेरगिल था, हमलावर लल्ली को मारने के लिए गये थे लेकिन लल्ली जान बचाने के लिए वाह से भागते हुए सचिन के घर पोहचा.

हत्यारे उसके पीछे भाग रहे थे, उन्होंने दो राउंड फायरिंग की। चीख सुनकर सचिन की पत्नी बाहर आई और हत्यारो ने अंदाधुंद फायरींग की। वो दो राऊंड सचिन की पत्नी के सिने मे लगीं और वो वहीं गिर गईं.

गोलीबारी में लल्ली शेरगिल घायल हो गया, बताया जा रहा है कि यह गोलीबारी कोयला तस्करी के कारण हुई है. दोनों को गंभीर हालत में अस्पताल में भर्ती कराया गया। जांच के बाद डॉक्टरों ने पूवर्शा डोहे को मृत घोषित कर दिया। इस घटना से पूरा जिला हिल गया है और राजुरा कस्बे में तनावपूर्ण स्थिति पैदा हो गई है.

पूर्वशा भायुमो जिला उपाध्यक्ष सचिन डोहे की पत्नी हैं। सचिन उस वक्त अपने चाचा के साथ काम से बाहर गये थे।घटना में पूर्वाशा की अकारण मौत हो जाने पर दुख व्यक्त किया जा रहा है।सुधीर मुनगंटीवार ने सुझाव दिया है कि पुलिस को जल्द से जल्द कार्यवाही की रिपोर्ट सौंपनी चाहिए.

रविवार, जुलै २३, २०२३

 चंद्रपूर:२ सख्ख्या भावांनी मिळून ९ घरे फोडली

चंद्रपूर:२ सख्ख्या भावांनी मिळून ९ घरे फोडली

चंद्रपूर:
२ सख्ख्या भावांनी मिळून ९ घरी दरोडा टाकल्याची माहीती चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना
समोर आली. चोरी केलेलं सोन दुकानात विक्रीसाठी नेत असल्याची भनक पोलिसांना लागली आणि
पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या अशा ९
ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिला. त्यानंतर पोलिसांनी या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, रोख असा सुमारे ६ लाख आठ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रभु सुब्रमण्यम सानिपती, राकेश सुन्रमण्यम सानिपती अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.

पडोली पोलिस ठाणे हद्दीतील वांढरी फाटा येथील श्रीकांत सुनील अधिकारी हे कुटुंबीयांसह हॉलमध्ये झोपी गेले होते. चोरट्याने हॉलच्या समोरील दरवाजाला कडी लावून बेडरूमच्या खिडकीची ग्रील वाकवून प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लॉकर उघडून १ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे सोने, चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. ही घटना १७ जूनला उघडकीस आल्यानंतर पडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पडोली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली,रामनगर, चंद्रपूर शहर, भद्रावती येथून घरफोडीच्या घटनांबाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी प्रभु सुब्रमन्यम सानिपती, राकेश सुत्रमन्यम सानिपती या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा वांढरी फाटा येथील घरफोडोसह भद्रावती, दुर्गापूर, वरोरा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.

मंगळवार, जुलै १८, २०२३

अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद

अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद


चंद्रपूर, दि. 18 : चंद्रपूर जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना 19 जुलै 2023 रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले असून नागरिकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत 07172- 251597 आणि 07172- 272480 या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.


पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस - 
हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

 Weather Update

 येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे - तर याच काळात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 तर पुण्यात पुढील 4 दिवस सलग ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे - याशिवाय मुंबईमध्येही पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 
येत्या 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार* - 

शनिवार, मार्च २५, २०२३

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभागी 
होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर:
 भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार, उद्योजकांना सहभागी होण्याकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. तसेच विविध कंपन्या व उद्योजकांना सहभागी होण्यासाठी www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून या लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

रोजगार मेळावा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्या करीता उमेदवारांना एन.एस.डी.सी.च्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधित उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे. वेगवेगळया झोनमध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लड, युरोप, पश्चिम आणि दक्षिण आशिया, जपान, आस्ट्रेलिया, न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकित उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहे. यामध्ये ऑटोमोटीव्ह, कृषी, कारपेंटर, बांधकाम, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन, फॅसिलीटी मॅनेजमेंट, फूड आणि बेव्हरेज, हेल्थ केअर, हॉस्पीटॅलीटी, आयटी, लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस, प्लंबर, रेफ्रिरेजेशन, रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड, वेल्डर आदी क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जॉब फेअरची प्रक्रिया व कालावधी
स्क्रीनिंग व भाषा चाचणीचा ऑनलाइन दिनांक 20 ते 27 मार्च 2023, उमेदवाराची ऑनलाइन मॅपिंग दि. 28 मार्च ते 10 एप्रिल 2023, तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फे-या दि. 11 ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फे-या दि. 8 ते 15 मे 2023 कालावधीत पार पडणार आहे. समारोपीय समारंभ दि.26 मे 2023 रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान 2 हजार उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एन.एस.डी.सी.मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीकरीता एनएसडीसीच्या व्यवस्थापक पंघोरी बोरगोएन यांच्या 9599495296 भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा pangkhuri.borgohain@nsdcindia.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


चंद्रपूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 28 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती 
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले-स्टोअर मधुन महास्वयंम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंटवर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करुन फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-चंद्रपूर या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आयअॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगईन करुन दि. 28 ते 31 मार्च 2023 रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हॉट्सॲप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग आदींच्या माध्यमातुन संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
  प्रदूषण कमी करा, पिकांची नुकसानभरपाई द्याआमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत मागणी

प्रदूषण कमी करा, पिकांची नुकसानभरपाई द्याआमदार सुधाकर अडबाले यांची विधानपरिषदेत मागणी

चंद्रपूर : 
जिल्ह्यातील उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. परंतु, संबंधित यंत्रणेकडून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांत चंद्रपूर शहर व जिल्ह्यात प्रदूषणाच्या समस्येने गंभीररूप धारण केले आहे. यामुळे अनेक नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे प्रदूषणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण तातडीने कमी करून पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत केली आहे.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर शहराच्या सुमारे २५ किलोमीटरच्या परिसरात सर्वाधिक उद्योगधंदे आहेत. यात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या खाणी, कोलवॉशरिज, एमआयडीसी, स्पॉन्ज आयर्न, सिमेंट कारखाने यांचा समावेश आहे. या उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया न करता सोडण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास या उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना शद्ध हवा मिळणे कठीण झाले आहे. यासोबतच प्रदूषणामुळे परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे.

परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषण तातडीने कमी करून पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार अडबाले यांनी केली आहे.

सभापतींनी दिले बैठक घेण्याचे निर्देश
आमदार सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची गंभीरता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यांसदर्भात तातडीने बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. तर, मंत्री दीपक केसरकर यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी, सिमेंट कारखाने यासह अन्य दोन अशी एकूण चार ठिकाणे निर्धारित करून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच पिकांच्या नुकसानभरपाईसंदर्भात तातडीने चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले

शुक्रवार, नोव्हेंबर ०४, २०२२

कांग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी १५ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

कांग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी १५ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत होणार सहभागी



जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे
  रामू तिवारी यांचे आवाहन
चंद्रपूर : 
काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबरपासून ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना १५ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यातून यात्रेत सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येत आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात, ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान हिंगोली जिल्ह्यात, १५ ते १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, १६ ते १८ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि १८ ते २० नोव्हेंबर रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे. भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किमीचा प्रवास ही काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून माजी पालकमंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. चंद्रपूर शहरात तरुणांची बाइक रॅली काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. तिवारी यांनी केले आहे.
 
सामाजिक संस्था, इच्छुकांनी करावा संपर्क

 

भारत जोडो यात्रा ही देशाच्या इतिहासातील पहिलीच यात्रा आहे. या यात्रेत केवळ काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्तेच नाही, तर देशावर प्रेम करणारा प्रत्येक भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्था, इच्छुक नागरिकांना या यात्रेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी शहरातील कस्तुरबा चौकातील चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. तिवारी यांनी केले आहे

गुरुवार, ऑक्टोबर १३, २०२२

 सलग तिसऱ्या वर्षी चंद्रपूर शहराला ३ स्टार मानांकन

सलग तिसऱ्या वर्षी चंद्रपूर शहराला ३ स्टार मानांकन

चंद्रपूर:
“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित केलेल्या नामांकनामध्ये चंद्रपूर शहराचा ३ स्टार मानांकन देऊन गौरव करण्यात आला आहे. चंद्रपूर शहराने २०२०,२०२१ व २०२२ असे सलग ३ वर्ष ३ स्टार मानांकनाचा दर्जा राखला आहे.

कचरामुक्त शहराच्या दृष्टीने स्वच्छतेचे नियमीत काम महानगरपालिकेतर्फे केले जात आहे. शहरातील सर्व परिसरात घंटागाडीच्या माध्यमातुन कचरा गोळा करणे, कचरा विलीगीकरण करणे सफाई कर्मचाऱ्यांद्वारे विविध पाळ्यात दिवसरात्र केले जाते. कचरामुक्त शहर राखण्याच्या दृष्टीने नागरिकांचा मोठा सभाग सुद्धा लाभत आहे.

शहरांसाठी कचरामुक्त तारांकित क्रमवारीचे प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रमांतर्गत नगरे /शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या आणि या कामाला ओळख देण्याच्या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. कचरामुक्त शहराच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित केलेल्या तारांकित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची पूर्वकल्पना न देता प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी करत असताना नागरिकांशी सहजपणे संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छता अँपवरही नागरिकांच्या प्रतिसादाची नोंद घेण्यात आली होती.
15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


चंद्रपूर(खबरबात):
  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथील सोहळा पाहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक 15 व 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चंद्रपूर शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनाकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सादर करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) व कलम 36 अन्वये दि. 15 ऑक्टोंबरचे 7 वाजेपासून ते 17 ऑक्टोबर 2022 च्या 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील स्थळे सर्व वाहनाकरीता पार्किंग स्थळे म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

ही आहेत वाहनाकरीता पार्किंग स्थळे:

नागपूर रोडने दिक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांनी त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण व जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान येथे पार्क करावीत. तसेच शहरातून दिक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता सेंट मायकल स्कूल मैदान व सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक), वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दिक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियमच्या मागे) ‌व जीवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था(मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे), मुल रोड, बंगाली कॅम्प व तुकूम या परिसरातून येणाऱ्या वाहनांकरिता कृषी भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टँड ही स्थळे पार्किंग स्थळे म्हणून जाहीर करण्यात आली असून या ठिकाणी नागरिकांनी व अनुयायांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करावीत. असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

बुधवार, ऑक्टोबर ०५, २०२२

कोंबड्यांवर ताव मारणारा बिबट चंद्रपूरच्या जूनोणा येथून जेरबंद

कोंबड्यांवर ताव मारणारा बिबट चंद्रपूरच्या जूनोणा येथून जेरबंद

 

चंद्रपूरच्या जुनोना गावात मागील महिनाभरापासून दहशत माजवणारा बिबट अखेर वनविभागाने जर बंद केला आहे.. हा बिबट्या गावात येऊन कोंबड्यांवर ताव मारत असल्याचे गावकरी सांगतात. आणि त्यामुळे सर्व गावकरी हैराण झालेले होते.तसेच गावात भीतीचे वातावरण देखील पसरले होते. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी दहशत मजविनाऱ्या बिबट्याला जेर बंद करण्याचे आदेश दिले होते. आठवडाभरापूर्वी लोहारा येथील देखील अशाच प्रकारची घटना घडली होती.

बुधवार, सप्टेंबर २८, २०२२

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकारिणीत मोठे फेरबदल; नवीन जिल्हाध्यक्ष कोण? #khabarbat #india #live

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकारिणीत मोठे फेरबदल; नवीन जिल्हाध्यक्ष कोण? #khabarbat #india #live



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानंतर संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीत खांदेपालट करताना राहुल बालमवार व मनदीप रोडे असे दोन जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आले असून सचिन भोयर यांच्याकडे चंद्रपूर महानगर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. राहुल बालमवार आणि मनदीपभाऊ रोडे यांना जिल्हा प्रमुखपदी बढती मिळाली आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी तीन विधानसभा विभागून देण्यात आल्या आहेत. शहर अध्यक्ष रोडे यांच्याकडे आता राजुरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर विधानसभेचा कार्यभार राहील. रोडे यांच्या जागेवर भोयर यांना शहर अध्यक्षपद मिळाले आहे. तर जिल्हाध्यक्ष दिलीप रामडेवार यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.


राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर सर्वच कार्यकारण्या बरखास्त होईल, असे संकेत मिळाले होते. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचालीसुद्धा सुरू झाल्या आहेत. मात्र, या फेरबदलात नव्यांना संधी न देता जुन्या पदाधिकाऱ्यांनाच नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Watch video on YouTube here: https://youtu.be/CDwuJUuQds0

बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२

 गणरायाला निरोप देतांना गणेश मंडळांसाठी विसर्जनस्थळी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करा - आ. किशोर जोरगेवार

गणरायाला निरोप देतांना गणेश मंडळांसाठी विसर्जनस्थळी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करा - आ. किशोर जोरगेवार


इरई नदीवरील घाटाची केली पाहणी, उपाययोजनांचा घेतला आढावा

चंद्रपूरातील गणेश विसर्जनाची भव्यता मोठी असते. त्यामूळे त्या दिवशी प्रशासनाची जबाबदारी अधिक असणार आहे. त्यामुळे वेळेत विसर्जनस्थळी नियोजितरित्या काम करत गणरायाला निरोप देण्यासाठी येणार असलेल्या गणेश मंडळांसाठी विसर्जनस्थळी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.

आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई नदीवरील दाताळा घाटाची पाहणी करत येथील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, अभियंता विजय बोरीकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेता अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, बंगाली समाज शहर संघटक विश्वजित शाहा, हरमन जोसेफ, आदिंची उपस्थिती होती.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर यंदाचा गणेश उत्सव भव्यरित्या सुरु आहे. हिच भव्यता विसर्जनाच्या दिवशीही असणार आहे. यंदा सार्वजनिक मंडळांना रामाळा तलावा ऐवजी इरई नदी येथे विसर्जन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली आहे. सदर ठिकाणी विसर्जनाकरिता येणाऱ्या गणेश मंळडांना कोणत्याही अडचणी येणार नाही. असे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्या.
सदर मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, अतिरिक्त लाईट, स्ट्रिट लाईटची व्यवस्था करण्यात यावी, सुरक्षेच्या दृष्टिने येथे आपत्ती व्यवस्थापनेच्या तुकड्या तैणात करण्यात याव्यात, गणेश मंडळांना मुर्ती विसर्जना करिता अधिक वेळ लागणार यासाठी सहा ठिकाणी असलेल्या विसर्जन गेटवर उत्तम व्यवस्था करण्यात यावी, वाहतुकीची नियोजित व्यवस्था करण्यात यावी गणेश भक्तांच्या सोयी सुविधांकडे विषेश लक्ष देण्यात यावे असे निर्देश यावेळी आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला दिले आहे.

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

Chandrapur Covid-19 Patient   2 नवीन रुग्ण बाधीत आढळले

Chandrapur Covid-19 Patient 2 नवीन रुग्ण बाधीत आढळले


Chandrapur News

चंद्रपूर - 24 तासात जिल्ह्यात 17 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच आज 183 संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली. यातील 2 नवीन रुग्ण बाधीत आढळले. जिल्ह्यात एकूण 32 बधितांवर उपचार सुरू आहे. 

Chandrapur Covid-19 Patient   

News34 MH34

COVID-19 cases in India:

𝐂𝐎𝐕𝐈𝐃-𝟏𝟗 𝐓𝐞𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞. For more details visit: icmr.gov.in #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona

गुरुवार, ऑगस्ट १८, २०२२

 Covid-19 | चंद्रपूर जिल्‍हयाला ५७ लक्ष ७५ हजार रू. निधी मंजूर |

Covid-19 | चंद्रपूर जिल्‍हयाला ५७ लक्ष ७५ हजार रू. निधी मंजूर |

कोविड व्‍हॅक्‍सीन अमृत महोत्‍सवाअंतर्गत अतिरिक्‍त लस

वन व सांस्‍कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.*

चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचे औचित्‍य साधत आजादी का अमृत महोत्‍सव ७५ दिवस कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी अतिरिक्‍त लसटोचक अर्थात व्‍हॅक्सिनेटर मनुष्‍यबळासाठी चंद्रपूर जिल्‍हयाला रू.५७,७५,०००/- इतका निधी उपलब्‍ध करण्‍यात आला आहे. वन व सांस्‍कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे. (Covid19 Chandrapur corona)





दिनांक १५ जुलै २०२२ ते ३० सप्‍टेंबर २०२२ या ७५ दिवसांच्‍या कालावधीमध्‍येCOVID-19  कोविड व्‍हॅक्‍सीन अमृत महोत्‍सवानिमीत्‍त सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना त्‍यांचा प्रिकॉशन डोस मोफत देण्‍यात येणार आहे. ही मोहीम राबविण्‍यासाठी चंद्रपूर जिल्‍हयाला अतिरिक्‍त लसटोचक यांची आवश्‍यकता असल्‍याने एकूण रू. रू.५७,७५,०००/- निधीची आवश्‍यकता असल्‍याचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी अतिरिक्‍त संचालक आरोग्‍य सेवा राज्‍य कुटूंब कल्‍याण यांना कळविले होते. वन व सांस्‍कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्‍या अनुषंगाने पाठपुरावा करून सदर निधी मंजूर करविला आहे. त्‍यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात कोविड व्‍हॅक्‍सीन अमृत महोत्‍सवाअंतर्गत १८ वर्षावरील पात्र नागरिकांना त्‍यांचा प्रिकॉशन डोस आता मोफत उपलब्‍ध होणार आहे.  

COVID-19 vaccin



Covid19 Chandrapur corona
World Health Organization Coronavirus disease situation dashboard presents official daily counts of COVID-19 cases and deaths worldwide, .