कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवाअंतर्गत अतिरिक्त लस
वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत.*
चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आजादी का अमृत महोत्सव ७५ दिवस कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी अतिरिक्त लसटोचक अर्थात व्हॅक्सिनेटर मनुष्यबळासाठी चंद्रपूर जिल्हयाला रू.५७,७५,०००/- इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. (Covid19 Chandrapur corona)
दिनांक १५ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या ७५ दिवसांच्या कालावधीमध्येCOVID-19 कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवानिमीत्त सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रांवर १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्हयाला अतिरिक्त लसटोचक यांची आवश्यकता असल्याने एकूण रू. रू.५७,७५,०००/- निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा राज्य कुटूंब कल्याण यांना कळविले होते. वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा करून सदर निधी मंजूर करविला आहे. त्यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयात कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवाअंतर्गत १८ वर्षावरील पात्र नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस आता मोफत उपलब्ध होणार आहे.
COVID-19 vaccin
Covid19 Chandrapur corona
World Health Organization Coronavirus disease situation dashboard presents official daily counts of COVID-19 cases and deaths worldwide, .