मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांची धडक
पवार कुटुंबीयांना अखेर मिळाला न्याय
नागपूर महामार्गावरील ताडाळी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेट कंपनीमध्ये कार्यरत वाहन चालक अतुल पवार याची वाहन चालवताना प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मनसे महिला आघाडी सुनीता गायकवाड यांच्या नेतृत्वात शेकडो महिला पदाधिकाऱ्यानी इंडियन ऑइल कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयावर धडक देत मृतक व पवार कुटुंबीयांना आर्थिक मदत करा, अशी मागणी रेटून धरली.
कंपनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अखेर कंपनी व्यवस्थापन नमले आणि पवार कुटुंबीयांना त्यांनी आर्थिक मदत देण्याची मागणी मान्य केली.
मनसेच्या महिला आघाडी प्रमुख सुनिता गायकवाड यांच्या पुढाकाराने अखेर पवार कुटुंबीयांना न्याय मिळाला.आता मृत अतुल पवार यांच्या पत्नीला कंपनी व्यवस्थापनाकडून दरमहा पाच हजार रुपये तर त्यांच्या चिमुकल्या मुलीच्या नावे विवाहासाठी आर्थिक मदत व्हावी,यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून केंद्र शासन पुरस्कृत सुकन्या योजना काढली जाणार आहे तर भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी मध्ये दरमहा 1000 रुपयातची एलआयसी काढण्याची बाब कंपनी व्यवस्थापनाने मान्य केली मनसेने केलेल्या या आंदोलनामुळे कंपनी व्यवस्थापनाने मागण्यांची पूर्तता केली असून, आता पवार कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत होणार आहे या आंदोलनात शेकडो मनसेच्या महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.