Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विदर्भ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विदर्भ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी ०३, २०२३

धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय: नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale

धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय: नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale

धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय
नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन


नागपूर येथे भव्य विजयी सभा




गडचिरोली : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. नागपूर हा केंद्रीयमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचा गड समजला जातो. या गडात निवडणूक लढणे सोपे नव्हते. एकीकडे धनशक्ती उभी होती. तर, दुसरीकडे केवळ कार्यकर्त्यांची फौज होती. धनशक्तीकडून मतदारांना दररोज वेगवेगळी आश्वासने, आमीषे दिली जात होती. परंतु, नागपूर विभागातील सुजान शिक्षक मतदारांनी सर्व आमीषे धुडकावत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठिशी एकजुटीने उभे राहून विजयश्री खेचून आणला. हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा आहे. धनशक्तीविरोधात एकजूट जनशक्तीचा विजय असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील विजयानंतर सुयोगनगरातील सभागृहात आयोजित विजयी सभेत आमदार अडबाले बोलत होते. यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाने, खासदार बाळू धानोरकर, आमदार अॅड. अभिजित वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे, राजाराम शुक्‍ला, विमाशिचे अनिल गोतमारे, रमेश काकडे, अरविंद देशमुख, महेंद्र सालनकार, अविनाश बडे, किशोर कानेरे, हरणे, केशवराव ठाकरे, प्रभाकर पारखी, डॉ. गव्‍हाणकर, महाराष्ट्र राजय जुनी पेन्शन संघटनेचे वितेश खांडेकर उपस्थित होते.

आमदार अडबाले पुढे म्हणाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक महासंघाच्या माध्यमातून नागपूर विभागातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरूनही आंदोलने केली. परंतु, राज्य शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु, सुरुवातीपासूनच जुनी पेन्शनसाठी आम्ही आग्रही आहोत. ही मागणी पूर्ण होण्यासाठी आता सभागृहात लढा दिला जाईल. कालपर्यंत जुनी पेन्शन देऊच शकत नाही अशी भाषा करणारे निवडणूक काळात ही योजना केवळ आम्हीच देऊ शकतो, असे शिक्षकांना सांगत होते. या लोकांचा दुटप्पीपणा शिक्षक मतदारांनी चांगलाच ओळखला आहे. त्यामुळे माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून जिवाचे रान करून मेहनत घेतली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, जुनी पेन्शन योजनेचे कार्यकर्ते आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी परिश्रम घेतले. आता माझी जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

आमदार वंजारी यांनी, पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीत मला विजयी केले. आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांना विजय करीत इतिहास घडविला आहे. शिक्षक, पदविधरांच्या प्रश्नासाठी आम्ही दोघे मिळून सभागृहात लढा देणार असल्याचे सांगितले. यावेळी मान्‍यवरांची भाषणे झालीत.
संचालन विठ्ठल जुनघरे यांनी तर आभार अनिल गोतमारे यांनी मानले. यावेळी विमाशी व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गुरुवार, फेब्रुवारी ०२, २०२३

दृष्टीव्यंग शिबीरात 45 बालकांचा मोफत उपचार | Eye Health News Government hospital in Gondia, Maharashtra

दृष्टीव्यंग शिबीरात 45 बालकांचा मोफत उपचार | Eye Health News Government hospital in Gondia, Maharashtra


गोंदिया | बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात (Bai Ganga Bai Women Hospital, Gondia ) 2 फेब्रुवारी 2023 रोजी जन्म जात दृष्टीदोष (आरओपी) तिराळेपण यावर  नागपूर येथील प्रख्यात  सुरज नेत्रपेढीच्या  अनुभवी नेत्र चिकित्सक मार्फत मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन डी इ आई सी या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप उपचार केंद्रात होते. 

 या कॅम्प चे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बाई गंगाबाई महिला व बाळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर तसेच डी इ आय सी चे बालरोग तज्ञा डॉ प्रदीप गुज्जर डॉ त्रिपाठी मॅनेजर श्री पारस लोणारे तसेच समुपदेशक श्री अजित सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. 

या कॅम्प मध्ये आर बी इस के च्या माध्यमातून संदर्भ सेवा दिलेल्या दृष्टी व्यंग असलेल्या बालकांना नेत्र तज्ज्ञांनी उपचार केले तसेच  विशेष करून ज्या नवजात शिशुना एस एन सी यु मध्ये अनेक दिवस उपचार घ्यावा लागला होता अशा बाळांना नेत्र तज्ञा मार्फत आर ओ पी करिता स्क्रिनिंग करून घेण्यात आली.

तसेच ज्या लहान बालकांना डोळ्याची  नजर तिरपी आहे. तिराळेपणा आहे त्यांना शस्त्रक्रिया करून पूर्ववत नजर प्राप्त करण्यासाठी मोफत वैद्यकीय सल्ला व समुपदेशन  देण्यात आले  गोंदिया जिल्ह्यातून विविध तालुक्यातून  माता पालक आपल्या बाळाला घेऊन गंगाबाई कॅम्पस मधील  डी इ आय सी मध्ये घेऊन आले होते. या मोफत शिबिरांत सुमारे 45 बालकांचा विशेष तपासणी व मोफत उपचार करण्यात आले. कॅम्प चे संयोजन डी इ आई सी केंद्राचे मॅनेजर श्री पारस लोणारे व समुपदेशक अजित सिंग यांनी केले . 
कॅम्प यशस्वी करण्यासाठी या केंद्राचे  श्री अमित शेंडे, रोशन कुर्वे, प्रकुर्ती मनोहर, पूजा बैस, तसेच रिता नेवरे व शालिनी यादव यांनी परिश्रम घेतले .

Government hospital in Gondia, Maharashtra
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Kavikulguru Kalidas of Sanskrit University

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन | Kavikulguru Kalidas of Sanskrit University


Kavikulguru Kalidas of Sanskrit University
Kavikulguru Kalidas of Sanskrit University


Kavikulguru Kalidas of Sanskrit University | कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कृती समितीच्या वतीने आजपासून परीक्षेवरील कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात परीक्षा विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून त्यांनी परीक्षा संबंधित काम करणे बंद केले आहे. 


विश्वविद्यालयाच्या उर्वरित 17पदांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन संरचना लागू करावी, आश्र्वासित प्रगती योजना लागू करावी, 58 महिन्यांची थकबाकी द्यावी तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अनेकदा आश्वासन दिले परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने, संयमाचा कडेलोट होऊन सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालय कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे.


ककासंवि च्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी आज परिसरात घोषणा दिल्या. परीक्षा कामकाजावरील बहिष्कार हे पहिले पावूल असून हा बहिष्कार आता सुरूच राहणार असल्याचे कृती समिती अध्यक्ष श्री राजीव रंजन मिश्रा यांनी स्पष्ट केले. 16 फेब्रुवारी ला एक दिवस लाक्षणिक संप होईल आणि 20 फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार आहे. आता सरकारने कृती करावी आम्हाला चर्चा नको असा स्पष्ट पावित्रा सर्वांनी घेतला असल्याने हे आंदोलन यशस्वी होईल असा विश्वास श्री मिश्रा यांनी व्यक्त केला आहे .
श्री राजीव रंजन मिश्रा
अध्यक्ष, कृती समिती
श्री प्रमोद भाऊ काटोले यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

श्री प्रमोद भाऊ काटोले यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

  

 गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेत राहून लोकांच्या सामाजिक समस्या सोडण्याचे काम सामाजिक कार्यकर्ता या नात्याने करत आले आहेत लोकांच्या भेटीगाठी लोकांसोबत जाऊन त्यांच्या विविध समस्यावर शिवसेनेच्या माध्यमातून तोडगा काढून सोडवण्याचे काम आज पर्यंत प्रमोद भाऊंनी केले आहे त्यामध्ये त्यांच्या कामाची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांना आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या पदी नियुक्ती दिली त्यामध्ये विविध विभागाची जबाबदारी देऊन म्हणजे शिवशक्ती वाहतूक सेना तसेच शिवशक्ती जनरल कामगार सेना शिवशक्ती उद्योग सेना शिवशक्ती चित्रपट सेना या सर्वांचा पदभार देऊन तळागळातील सामान्य लोकांना तसेच गरीब लोकांच्या समस्या या माध्यमातून सोडवण्यात येईल शिवशक्ती वाहतूक सेनेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक बाबतीत जी समस्या आहे ती सुळसुळीत करण्याकरिता व कुठेही गर्दी न होता आपली वाहने सरळ मार्गाने जातील याकरिता शिवशक्ती वाहतूक सेना सहकार्य करेल दुसरा शिवशक्ती जनरल कामगार सेना कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही त्यांच्या पगाराचा प्रश्न असो नोकरीच्या प्रश्न असो इतर कुठलाही कामगाराबाबतीत प्रश्न असेल तो तातडीने शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल त्यानंतर शिवशक्ती उद्योग सेना च्या सहकार्याने बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यात येईल व बेरोजगारांना रोजगार देण्यात येईल कोणावरही उपासमारीची पाळी येऊ नये याकरिता सदैव शिवशक्ती उद्योग सेना तत्पर राहील शिवशक्ती चित्रपट सेनेच्या माध्यमातून चित्रपट गृहाची तपासणी केली जाईल तसेच कुठे चित्रपट शूटिंग असेल व त्यांना चित्रपट शूटिंग करते वेळी अडचण येत असेल तेही सहकार्य शिवशक्ती चित्रपट सेनेच्या माध्यमातून करण्यात येईल ही सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून कोणावरही अन्याय होणार नाही असे प्रमोद भाऊ काटोले यांनी आपल्या भाषणात सांगितले म्हणून मला हे चार पदभार सांभाळण्याकरिता देण्यात आले आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली प्रथमच नागपूर शहरात आगमन झाले रेल्वे स्टेशनवर आगमन होतात शिवशक्ती वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रमोद भाऊ काटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले व शिवशक्ती जनरल कामगार शिवशक्ती वाहतूक सेना शिवशक्ती उद्योग सेना शिवशक्ती चित्रपट सेनेच्या विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या त्याप्रसंगी उपस्थित असलेले शिवशक्ती वाहतूक सेनेचे कार्यकर्ता समीर देशमुख किंग खान क्रांती डोके राहुल कोल्हे महेंद्र कुमार चव्हाण अंकित मस्करे प्रशांत शेट्टी राहुल देशमुख विशाल गवारे प्रमोद कारलेवार अनिल नाकाडे धोटे गुरुजी सुबोध पाठक अनिल ढवळे सुनील भोयर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Appointment of Shri Pramod Bhau Katole as Vice President of Maharashtra State

       कार्यकर्त्याच्या सोबत त्यांनी गणेश टेकडी विघ्नहर्ता यांचे दर्शन घेऊन पुढील कार्यकर्ता वाटचाल सुसोळीत व्हावी व शिवशक्ती जनरल कामगार शिवशक्ती वाहतूक सेनेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यात यश यावं याकरिता विघ्नहर्ता समोर मनोकामना पूर्ण व्हावी 
             आज ताजुद्दिन बाबाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने शहरात व मोठ्या ताजबागात होत आहे हे औचित्य पाहून श्री प्रमोद भाऊ ने मोठ्या ताजबाग मध्ये जाऊन ताजुद्दीन बाबाचे दर्शन घेतले त्यावेळेस त्यांच्यासोबत शिवशक्ती वाहतूक सेना शिवशक्ती जनरल कामगार सेनेचे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते ताजुद्दीन बाबाला प्रार्थना करून नागपूर शहरात वाहतुकीच्या बाबतीत समस्या जास्तीत जास्त भेसाळत असल्यामुळे शिवशक्ती वाहतूक सेना शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून वाहतुकीची समस्या सुळसुळीत करण्यात येईल  
               थोड्याच वेळात शिवशक्ती वाहतूक सेना व शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या कार्यालय दिघोरी पोहोचल्यानंतर उपस्थित असलेल्या शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाऊचे अभिनंदन करून मिठाई वाटप केली व भाऊंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की गरीब जनतेच्या समस्या ग्रामीण भागातील वाहतुकीच्या समस्या शहरातील वाहतुकीच्या समस्या हर चौकात वाहतुकीची समस्या जाणवतो कारण जात असताना रोड क्रॉस करते वेळी वाहतुकीमुळे कोणाचा अपघात होऊ नये वाहतूक कशी सुटत होईल याबाबत शिवशक्ती जनरल कामगार सेनेच्या माध्यमातून पोलीस कमिशनरला निवेदन देण्यात येईल असे आश्वासन उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना दिले तसेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही भाऊंनी सांगितले व शिवशक्ती जनरल कामगार सेनेचा विजय असो नेहमी सेना गोरगरिबांच्या व सामाजिक सेवेच्या कामाकरता कटिबद्ध राहील अशी मी अपेक्षा पूर्ण करतो

बुधवार, फेब्रुवारी ०१, २०२३

बनावट देशी दारू निर्मिती कारखाना प्रकरण; जिल्ह्याधिकाऱ्यानी काढले महत्वाचे आदेश Chandrapur Daru karkhana

बनावट देशी दारू निर्मिती कारखाना प्रकरण; जिल्ह्याधिकाऱ्यानी काढले महत्वाचे आदेश Chandrapur Daru karkhana

चंद्रपूर (Chandrapur) दि. 1 : मूल तालुक्यातील चितेगाव येथे बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यावर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मोठे रॅकेट उघडकीस आणले तसेच इतर बाबी जप्त केल्या. याप्रकरणी तातडीने कारवाई करून फरार असलेल्या नागरिकांना त्वरीत अटक करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्या. 

duplicate alcohol


बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यासंदर्भात नोंदविलेल्या गुन्ह्याबाबत जिल्हाधिका-यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील तसेच दुय्यम निरीक्षक तथा तपास अधिकारी संदीप राऊत यांची बैठक घेऊन गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी केली. तसेच फरार असलेल्या लोकांना त्वरीत अटक करून कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. या प्रकरणात समावेश असलेल्या लोकांवर एमपीडीए व मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम 93 नुसार कारवाई करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले.


मूल तालुक्यातील चितेगांव शेतशिवारात अरूणा मरसकोल्हे यांच्या मालकीच्या ए.व्ही.जी. गोट फार्म (शेळी पालन केंद्र) परिसरात बनावट देशी दारू तयार करून विकली जात असल्याची माहिती चंद्रपूर येथील उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने आज चितेगाव शेतशिवारात पाहणी केली. गोट फार्मचच्या आवारात देशी दारू संबंधी काही साहीत्य आढळून आले. त्यामुळे पोलिस पथकाने गोटफार्मच्या दोन्ही खोल्यांची कसुन पाहणी केली असता एका खोलीत बनावट देशी दारू तयार करण्याचा मिनी कारखानाच उघडकीस आला. त्यामध्ये पाच ते सहा प्लास्टिक ड्रम मध्ये दारू निर्मिती साठी स्पीरीट आढळून आले. Chandrapur Daru karkhana



सिन्टेक्सच्या दोन मोठ्या टाकी पैकी एका टाकीमध्ये तयार केलेली बनावट दारू सापडली. बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याकरीता लहान आणि मोठ्या प्लास्टिकच्या बाटल्या, त्यावर चिकटवण्या करीता संञा लिहीलेले स्टीकर बाँक्स. प्रवरा देशी दारू प्रवरानगर जि. अहदनगर लिहीलेले खरड्याचे मोठे खोके, दारूला संत्राचा वास येण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आँरेज इसेन्स फ्लेवरच्या बाटल्या असे एकुण १६ लाख ५० हजाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरात मोठी टोळी गुंतल्याचा संशय उत्पादन शुल्क् विभागाने वर्तविला आहे. ज्या गोट फार्मच्या ठिकाणी बनावट देशी दारू निर्मितीचा अवैद्य मिनी कारखाना उजेडात आला. Chandrapurkar liquor


शनिवार, जानेवारी २८, २०२३

उत्कृष्ट अधिकारी म्हणून संजय हजारे यांचा सत्कार

उत्कृष्ट अधिकारी म्हणून संजय हजारे यांचा सत्कार

*सहकारी पणन महासंघाच्या आढावा बैठकीत सत्कार*



ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या मुंबई येथे झालेल्या 64 व्या आढावा बैठकीत चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय वामनराव हजारे यांचा सन 2021-22 मधिल कार्यालयीन कामात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल,उत्कृष्ठ अधिकारी म्हणुन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतिने राज्याचे सहकार मंत्री डॉ. अतुल सावे व सुधाकर तेलंग (भा.प्र.से.) व्यवस्थापकिय संचालक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.Sanjay Hazare 

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामकाजासंदर्भात नुकतीच सुधाकर तेलंग (भा.प्र.से.) व्यवस्थापकिय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 2021 22 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची६४ वी आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जगन्नाथ भोसले मार्ग मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री डॉ. अतुल सावे, माजी राज्यमंत्री सतीश पाटील, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, आबासाहेब काळे, पणन विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे, पणन माजी संचालक मोहन अंधारे, भागवत धस, सर व्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर, नागपूर जिल्हा पणन अधिकारी राजेश तराळे, सहकारी संस्थांचे पदाधिकारी पणन महासंघातील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
 सभासद, सहकारी संस्थाचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना रास्त दराने कृषी निविष्ठांचा पुरवठा करणे, नाफेड व भारतीय खाद्य महामंडळाच्यावतीने राज्यात खरेदीचे कामकाज करणे, शेतमाल व कृषी निविष्ठा साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध करणे, विविध योजना राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचा, विक्रमी कडधान्य खरेदी करणाऱ्या खरेदी व्रिकी सहकारी संघांचा, खत विक्री करणाऱ्या संस्थांचा तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात चन्द्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय  हजारे यांच्या सन 2021-22 मधिल कार्यालयीन कामकाजाची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने संजय हजारे यांना उत्कृष्ठ अधिकारी म्हणून स्मृतिचिन्ह , प्रशस्तीपत्र श्रीफळ देऊन सत्कार केला . जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Sanjay Hazare chandrapur Maharashtra India 
पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा

पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी येथे वार्षिकोत्सव उत्साहात साजरा


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
रमेश शिक्षण संस्था कुडेगाव द्वारा संचालीत पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहळी ता-लाखांदूर जि-भंडारा येथे दिनांक-२३ ते २५  जानेवारी २०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. २३ जानेवारी २०२३ ला दुपारी १२ वाजता वार्षिकोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला.याप्रसंगी उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. नरेशजी मेश्राम सचिव र.शि.स. कु., उद्घाटक  म्हणून मा.नितीनजी पुगलिया इंडोफॉर्म ट्रॅक्टर अँड इक्विपमेंट नवेगाव बांध,स्वागताध्यक्ष  सुनीलभाऊ कापगते उपाध्यक्ष शा. व्य. समिती, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव, मा मनोजजी बन्सोड,मा संजयजी बन्सोड,मा सुरजजी चचाने,मा देवेन्द्रजी झोडे,मा संजयजी परशुरामकर,मा हिरालाल गजभिये,मा मोतीरामजी कुंभरे,सौ केवणाबाई परशुरामकर, सौ प्रज्ञाताई मेश्राम,मा राजेशजी नाकाडे,मा धनराजजी डोंगरवार, मा उज्वलजी नाकाडे,मा भालचंद्र चुटे मुख्या.,शाळेचे माजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सत्कारमूर्ती मा काशीरामजी कापगते,मा व्यंकटजी कुंभरे, मा कैलासजी परतेके,मा शालीकजी धोटे उपस्थित होते.सदर उद्घाटन सोहळ्यात चारही सत्कारमूर्तींचा शाल श्रीफळ देऊन प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार केला गेला.सदर कार्यक्रमाला समस्त विद्यार्थी, बहुसंख्य पालक आणि गावकरी उपस्थित होते.
 यानंतर प्रमुख अतिथींनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि गावकरी मंडळींना मार्गदर्शन केले.यानंतर सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२४ जानेवारी २०२३ ला दुपारी विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक आणि बौद्धिक स्पर्धा पार पडल्या.तसेच सायंकाळी ६ वाजेपासून विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.२५ जानेवारी २०२३ ला सकाळी ११ वाजता महिला मेळावा तसेच महिलांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता यात मा. सविताताई उपरीकर सरपंचा सानगडी, सौ अस्मिताताई लांडगे सरपंचा पिंपळगाव,सौ गीताताई परशुरामकर उपसरपंचा पिंपळगाव यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले आणि दुपारी २ वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पडला.त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन दिले गेले.सदर वार्षिकोत्सवात मुख्याध्यापक भालचंद्र चुटे यांचा शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार केला गेला. तसेच शाळेतील उपक्रमशील शिक्षक खुशाल डोंगरवार यांचा ग्रामपंचायत आणि गावकरी यांनी त्यांच्या कार्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री खुशाल डोंगरवार सर ,प्रास्ताविक श्री भालचंद्र चुटे सर आणि आभार प्रदर्शन सुनीलजी  कापगते यांनी यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री किशोर शहारे, कु.अनुराधा रंगारी,कु.शिल्पा मेश्राम तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि माता पालक संघाचे  श्री दुर्गेश कुडेगावे, श्री कृष्णाजी कोराम, श्री राहुलजी जनबंधु, श्री विनोदजी शहारे, श्री संजयजी बन्सोड,श्री  विनोद शहारे,सौ आशा परशुरामकर, सौ सरोज परशुरामकर, सौ वंदना जोशी, सौ प्रियंका परशुरामकर,सौ रिता परतेके,सौ मिनाक्षी गजभिये, सौ हेमलता परशुरामकर, सौ मनीषा परशुरामकर, सौ मोतिका परशुरामकर,सौ रजनी जनबंधु, सौ दुर्गा परशुरामकर,  तुळशीराम बागडे, श्री रमेश शहारे,श्री प्रमोद परशुरामकर सौ चंपाबाई बागडे,सौ शेवंताबाई शहारे,समस्त पालक आणि मतापालक तसेच सर्व शालेय मंत्रिमंडळ आणि विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न केले. अशाप्रकारे वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला गेला.

शुक्रवार, जानेवारी २७, २०२३

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन








संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
येथील भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, जिल्हा संपर्क प्रमुख, भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनी मोर. तालुका भाजपा चे माजी अध्यक्ष, नवेगांवबांध ग्रामपंचायत चे माजी सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर. चे संचालक, एक मनमिळाऊ व निस्वार्थ जनतेची अहोरात्र सेवा करनारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नवेगांवबांध निवासी रघुनाथ हगरुजी लांजेवार यांचे आज दि.27 जानेवारी रोज शुक्रवार ला दुपारी  2:30 वाजता भंडारा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षाचे होते. उद्या दि.28 जानेवारी रोज शनिवार ला सकाळी 10.00 वाजता नवेगांवबांध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे मृत्युपश्च्यात पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा परिवार आहे. 
भाजपाचे जेष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधनाने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांतील भारतिय जनता पक्षाची प्रचंड हाणी झाली असुन,पक्षाने एक तळमळीचा व निष्ठावावान नेता गमावल्याची प्रतिक्रिया माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली आहे.

गुरुवार, जानेवारी २६, २०२३

 डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण"  occasion of Makar Sankranti Armori

डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण" occasion of Makar Sankranti Armori


मकरसंक्रातीनिमित्त पार पडला आगळावेगळा हळदी कुंकू

बालिका दिनानिमित्त रुग्णालयात जन्मलेल्या बाळांची संक्रातीनिमित्त लूट

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन

अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमचा उपक्रम



गडचिरोली (दिनांक २६ जानेवारी) : Makar Sankrantiमकरसंक्रांती म्हटली की,‎ महिलांचा जिव्हाळ्याचा विषय‎ येतो. संक्रांतीनिमित्त महिला‎ आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम‎ ठेवत वाण म्हणून एकमेकींना‎ भेटवस्तू देतात. या पारंपारिक पद्धतीमध्ये‎ थोडा बदल करत अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमने आगळावेगळा उपक्रम आयोजित केला. रुग्णालयात आजवर उपचारासाठी आलेल्या महिला, विविध आजारासाठी शस्रक्रिया झालेल्या रुग्नांना एकत्रित आणत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर (Dr. Sheelu Chumurkar) यांनी "आरोग्याचे वाण" वाटले. विशेष म्हणजे वाण म्हणून एखादी भेटवस्तू न देता व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक गोळ्या आणि औषधी वितरित केली.




स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे आजार बळावतो. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त आरमोरी येथील अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होममध्ये २५ जानेवारी रोजी "आरोग्याचे वाण" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वसुधा कोपुलवार, शकुंतला गंटावार, सेवानिवृत्त शिक्षिका चव्हाण, बघमारे यांची उपस्थिती होती. Makar Sankranti

यावेळी डॉ. शिलू चिमुरकर यांनी सर्व महिलांना आरोग्यासाठी तीळ-गुळाचे महत्व, दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी आणि निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपचारासाठी आलेल्या महिला, प्रसूती झालेल्या स्तनदा माता आणि विविध आजारावर शस्रक्रिया झालेल्या महिला रुग्नांना व्हिटॅमिन, कॅल्शिअम गोळ्या आरोग्याचं वाण म्हणून देण्यात आले. बालिका दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात जन्मलेल्या दोन बाळांची संक्रातीनिमित्त लूट करण्यात आली.




आरमोरी येथील वडसा मार्गावर असलेल्या अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची मागील ४ महिन्याआधी सुरवात झाली. प्रारंभीपासून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन आरोग्यसेवा दिली जात आहे. या भागात आरोग्याची अत्याधुनिक सुविधा नव्हती. त्यामुळे इथल्या रुग्णांना दूरच्या मोठ्या शहरात जावे लागायचे. मात्र, अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची स्थापना झाल्यापासून इथल्या रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. तेव्हापासून आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या नक्षलग्रस्त भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागलीत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी अवघ्या ४ महिन्यात आतापर्यंत ११ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यातील ८ शस्त्रक्रिया या गर्भाशयाशी निगडित होत्या. महिलांना अनेक कारणांमुळे गर्भपिशवी साफ करावी लागते. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळून महिलांना जीवनदान देण्याचे काम डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले. महिलांना अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तारखा चुकणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे आदी समस्यांचे निराकरण त्यांनी केले.  
Makar Sankranti



मंगळवार, जानेवारी २४, २०२३

News पोर्टलधारकांनी समजून घेतले ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र Journalist Devnath Gandate |

News पोर्टलधारकांनी समजून घेतले ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र Journalist Devnath Gandate |

- डिजिटल मीडिया कार्यशाळेत शिकले बातम्यांचे की-वर्ड 

 - पोर्टलधारकांनी समजून घेतले ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र 


- भविष्यातील पत्रकारितेवर डिजिटल मीडिया कार्यशाळा

 गडचिरोली (Gadchiroli) : डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक पत्रकार देवनाथ गंडाटे (Devnath Gandate) यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. 


गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, बिटनिहाय ऑनलाईन पत्रकारिता आणि ब्लॉगिंग, ऑनलाईन रोजगाराची संधी आणि उत्पन्नाची साधने, बातम्यामध्ये  की-वर्ड कसे वापरावे, ऑनलाईन ट्रॅफिकमधील फरक आणि सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियातील फरक, वेबसाईटनिर्मितीचे तंत्र आणि भविष्यातील पत्रकारितेवर सखोल मार्गदर्शन केले. 



याप्रसंगी देवनाथ गंडाटे यांनी सांगितले की, डिजिटल मीडियातील बारकावे आणि ओळख जर नसेल तर आजचा पत्रकार मागे पडतो. ज्यांना तंत्रज्ञान अवगत आहे, ते  रोजगाराची संधी निर्माण करीत आहेत. लिखाणाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास वेबपोर्टलमधूनही कमाई साधता येते, हे उदाहरणासह पटवून दिले. यावेळी डिजिटल मीडिया कायदा आणि नोंदणी कशी करावी, याची माहिती देण्यात आली. 



मागील २० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत देवनाथ गंडाटे यांचे "डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. यानिमित्त गडचिरोलीतील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी ऍड. मनीष कासर्लावार यांनी प्रास्ताविक केले. समारोपीय कार्यक्रमात पुढील महिन्यात शुभारंभ होऊ घातलेल्या माय खबर २४ ( My Khabar24 ) या नवीन मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आणि भविष्यात पत्रकाराना रोजगार कसा मिळेल. याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रीतम मडावी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमंत सुरपाम यांनी केले. आयोजनासाठी धर्मदास मेश्राम यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. 



कार्यशाळेत वरिष्ठ पत्रकार जयंत निमगडे, प्रवीण चन्नावार, किशोर खेवले, राजू सहारे, क्रिष्णा शेंडे, मिलिंद खोंड यांच्यासह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   


Journalist Devnath Gandate | Digital media workshop | SEO | digital marketing | techniques | online traffic | keywords for news etc.

सोमवार, जानेवारी २३, २०२३

आसगावात झडकला पारेषणचा वार्ताफलक

आसगावात झडकला पारेषणचा वार्ताफलक

भंडारा:
नागपूर पारेषण झोन भंडारा विभागांतर्गत १३२ के. व्ही. उपकेंद्र आसगाव येथे वार्ताफलकाचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे शंकरराव पहाडे, तर उद्घाटक म्हणून कार्यकारी अभियंता किशोर भोयर, प्रमुख अतिथी उपमहामंत्री संजय दंडारे, कार्यसमिती सदस्य दत्ताजी धामणकर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते वार्ताफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला वीज वितरण कंपनीचे लाखांदूर उपविभाग व भंडारा विभागीय

कार्यालयातील पारेषणचे सभासद प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून संतोष जाधव यांनी भंडारा विभागात सर्व उपकेंद्रात महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे वार्ताकलक लावण्यात येणार असल्याचे सांगून, या फलकावर कंपनीतील घडामोडी लिहाव्या, जेणेकरून सर्वसाधारण सभासदांनाही घडामोडींची माहिती मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन विभागीय सचिव विनोद पेशने यांनी, तर आभारपदर्शन सर्कल सेक्रेटरी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ परेशान नागपूरचे विलासकुमार लेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नरेंद्र भुरे, विजय कुभंलकर व आसगाव उपकेंद्रातील सर्व कर्मचारी तथा सुरक्षारक्षकांनी सहकार्य केले.

रविवार, जानेवारी २२, २०२३

जुन्या वादातून काठीने मारहाण; वृद्ध जागीच ठार | Breaking News

जुन्या वादातून काठीने मारहाण; वृद्ध जागीच ठार | Breaking News

जुन्या वादातून काठीने मारहाण; वृद्ध जागीच ठार | Beating with a stick from an old argument; The old man was killed on the spot

उमेश तिवारी/कारंजा घाडगे Wardha Breaking News
तालुक्यातील सावल येथे आज दि,22 रविवार ला सकाळी साडेआठच्या दरम्यान गावातील वृद्ध इसमाचा काठीने मारहाण केल्याने जागीच मृत्यू झाला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

विश्वनाथ देशमुख 


सावल येथील एकमेकांच्या घराशेजारी राहत असलेले मृतक विश्वनाथ देशमुख वय 66 वर्ष व अशोक बोवाडे यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून गुराढोराच्या कारणावरून वाद सुरू होता या वादानेच आज अशोक बोवाडे यांनी पुन्हा वादाला सुरुवात केली हा शाब्दिक वाद वाढत गेला व रागाच्या भरात अशोकने काठीने वृद्ध विश्वनाथ देशमुख यांना भर रस्त्यात डोक्यावर मारहाण केली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

मृतकाचा नातू आरोपीच्या घरासमोर नेहमी खेळत होता. या कारणावरून काल, दि. 21 ला दोघांमध्ये संध्याकाळच्या सुमारास सुद्धा वाद झाला होता. परंतु, त्यावेळी मृतकाचा मुलगा मोहन हा घरी असल्याने त्याने हा वाद शांत केला व वडिलांना घरी आणले होते. परंतु अशोक रात्रभर राग मनात ठेवून झोपी गेला व आज सकाळी उठताच त्याने पुन्हा वादाला सुरुवात केली यावेळी मुतकाचा मुलगा मोहन हा दूध डेरी वर दूध घेऊन गेला होता. नेमकी हीच संधी साधून त्याने मृतकाला काठीने डोक्यावर मारहाण केली व रस्त्यावर ढकलले, यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून आरोपी अशोक बोवाडे याला ताब्यात घेत अटक केली. 

घटनेचे गांभिर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके, तळेगाव पोलीस निरीक्षक गजभिये, कारंजाचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन मानकर, विनोद वानखेडे, लीलाधर उकंडे, किशोर कडू, नितेश वैद्य, गुड्डू थुल, हांदवे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत हे करत आहे. 

शनिवार, जानेवारी २१, २०२३

मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एक ठार, तर एक गंभीर

मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एक ठार, तर एक गंभीर

नवेगावबांध-कोहमारा मार्गावर मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक.एक ठार,तर एक गंभीर

अपघातात नेमीचंद वलथरे यांचे दुःखद निधन.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ जानेवारी:-
नातेवाईकाच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहून स्वगावी परतणाऱ्या एका मोटर सायकल चालकाचे अपघाती दुःखद निधन झाले.रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. मृतकाचे नाव नेमीचंद बादशहा वलथरे राहणार सावरटोलाअसे असून, मागे स्वार असलेला चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नी व वृद्ध आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यूने साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.

सदर दुर्घटना दिनांक 20 जानेवारी च्या सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान नवेगावबांध- कोहमारा मार्गावरील येथील भारत गॅस गोदामाच्या जवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार,काल दिनांक 20 जानेवारीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील रहिवासी नेमीचंद बादशाह वलथरे वय 52 वर्षे हे आपल्या चुलत भाऊ भोजराम रामजी वलथरे वय 48 वर्षे दोघेही राहणार सावरटोला हे,भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मोहघाटा येथून स्वतःच्या मोटरसायकल एमएच 35,एक्स 5779 ने फुटाळासौंदड येथे आपल्या मुली,जावई व नातवांना भेटून कोहमारा मार्गे स्वगावी सावरटोला येथे परत येत असताना, नवेगावबांध-कोहमारा या मार्गावर सायंकाळी 6.15 ते 6.30 वाजता नवेगावबांध येथील भारत गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच 35,जी 7393 ला जबर धडक दिली.या अपघातात मोटरसायकल चालक नेहमीचं वलथरे व त्यांचे भाऊ भोजराम वलथरे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, ये जा करणाऱ्या लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नेमीचंद वलथरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर दुसरे गंभीर जखमी भोजराम वलथरे यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर ते गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.देवलगाव येथील सुदाम शेंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल.अशा स्थितीत धोकादायक व निष्काळजीपणाने उभे करून ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचे रिपटेकलेस पार्किंग लाईट न लावता उभे ठेवल्याने मोटरसायकल चालक नेमीचंद वलथरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.तसेच फिर्यादीचे भाऊ भोजराम वलथरे गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरले.ट्रॅक्टर चालकावर फिर्यादी केशव रामजी वलथरे राहणार सावरटोला यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नवेगावबांध येथे अपराध क्रमांक 09/2023 कलम 283,337,338,304(अ), भादवि सहकलम222/177 मोटार वाहन कायदा अव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना घनमारे हे करीत आहेत.मृतक नेमीचंद वलथरे यांच्यावर शवविच्छेदनानंतर सावरटोला येथील स्थानिक स्मशान घाटावर शोकाकुल गावकरी आप्तेष्ट व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. मृतक नेमीचंद यांच्या मागे आई,पत्नी,तीन मुली आहेत.मृतक नेमीचंद यांच्या अपघाती निधनाने वलथरे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वडीलाच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नीने व वृद्ध मातेने टाहो फोडला. वलथरे कुटुंबीयांचा एकमेव आधारवड या अपघाताने हिरावून घेतला.

मृतक नेमीचंद हे त्यांच्या कुटुंबीयांचे एकमेव आधार होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब दुःखाच्या महासागरात बुडून गेले आहे. त्यांची मोठी मुलगी वैष्णवी 12 कला शाखेतून संग्रामे विद्यालयातून इयत्ता बारावीला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. उद्या दिनांक 22 जानेवारीला विद्यालयाच्या वार्षिक उत्सवात गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात तिचा सत्कार करण्यात येणार आहे.परंतु तिचा हा गौरव बघायला वडील ह्यात नाहीत.याचे दुःख तिला आहे, तर दुसरी मुलगी तेजस्विनी ही सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. वडिलांच्या अकाली, अपघाती निधन झाल्याने या दोन्ही मुलीवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सावरटोला गावावर शोककळा पसरली आहे.
चारचाकी दुभाजकाला धडकली; प्रॉपर्टी बिल्डर ठार; इतर सहकारी जखमी The four-wheeler hit the divider; Property builder killed; Other colleagues injured

चारचाकी दुभाजकाला धडकली; प्रॉपर्टी बिल्डर ठार; इतर सहकारी जखमी The four-wheeler hit the divider; Property builder killed; Other colleagues injured


Accident
Accident


संजय नागपुरे/कारंजा (घाडगे)
कारची दुभाजकाला धडक,, 1 ठार 3 जखमी। कारंजा(घा)--- नागपूर येथील काही बिल्डर प्रॉपर्टी च्या कामाने अमरावती येथे जात असताना महामार्गावरील ठाणेगाव जवळ त्यांची टोयोटा गाडी दुभाजकाला धडकली यात 1 जण जागीच ठार झाला तर इतर 2 जण जखमी आहे, ही घटना दि,20 शुक्रवार ला दुपारच्या सुमारास घडली.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्या व गाडी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊन पडली, टोयोटा गाडी क्र,MH- 04 CB-9681 या गाडीचा चालक मृतक चंदन विजय प्रसाद, रा, बेलतरोडी नागपूर, हिरालाल अग्निहोत्री, सुरेश कुसरकर सर्व रा, नागपूर हे गाडीतून प्रवास करत होते, गाडीतील इतर प्रवाशी हे जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे, कारंजा पोलीसात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

शुक्रवार, जानेवारी २०, २०२३

गडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा Workshop on Digital Media in Gadchiroli on Saturday

गडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा Workshop on Digital Media in Gadchiroli on Saturday



गडचिरोली : शनिवार, दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता येथील बळीराजा पॅलेस, चामोर्शी रोड येथील संविधान सभागृह येथे न्यूज पोर्टल आणि डिजिटल मीडियासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत उपस्थितांना डिजिटल मीडिया तज्ज्ञ व पत्रकार श्री. देवनाथ गंडाटे (Devnath Gandate) मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचे महत्त्व, ऑनलाइन जाहिरात कमाईच्या टिप्स, Google AdSense कसे स्थापित करावे, न्यूज पोर्टल आणि त्यांच्याशी संबंधित कायदे, आदी विषयावर मार्गदर्शन होणार आहेत. या शिवाय संवाद चर्चा होईल. 

VNX आणि My Khabar 24 या न्यूज पोर्टलने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. 

 या कार्यशाळेत डिजिटल मीडिया पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

गुरुवार, जानेवारी १९, २०२३

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण | Maratha Seva Sangh calendar

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण | Maratha Seva Sangh calendar

होणार पुरोगामी विचारांचा प्रसार


संजीव बडोले प्रतिनिधी | नवेगावबांध दि.१९ जानेवारी:-
मराठा सेवा संघाच्या (Maratha Seva Sangh) येथील कार्यालयात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सुनील तरोणे यांच्या हस्ते मराठा सेवा संघाचे २०२३ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे दि.१९ जानेवारी रोज गुरुवारला दुपारी दोन वाजता लोकार्पण करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला पाहुणे म्हणून, प्रामुख्याने शिवश्री किशोर तरोणे, शिवश्री अमरनाथ मेंढे, पिंपळगाव शिवश्री लैलेस शिवणकर, शिवश्री जयंत झोडे, शिवश्री युवराज तरोणे, शिवश्री कालिदास पुस्तोडे उपस्थित होते.
सदर प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनात सदर दिनदर्शिका ही फक्त तारीख दाखवण्यापूर्तीच नाही, तर शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा घराघरापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली. 

विविध साहित्यिकांचे लेख व संपर्क क्रमांक तसेच जनजागृती पर कीर्तनकार व प्रवचनकार व्याख्याते यांचे मोबाईल क्रमांक व नावे या ठिकाणी दर्शविलेले आहेत. ही दिनदर्शिका गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचा प्रचार, प्रसार करण्यास महत्त्वपूर्ण कामाची ठरेल, असे मत सुनील तरोणे यांनी व्यक्त केले.  (Maratha Seva Sangh
वाहनचालकों को किया जागरूक; टोल प्लाजापर चलाया गया 34 सड़क सुरक्षा सप्ताह | Toll Plaza

वाहनचालकों को किया जागरूक; टोल प्लाजापर चलाया गया 34 सड़क सुरक्षा सप्ताह | Toll Plaza





कारंजा (घाडगे)/उमेश तिवारी
वाहन चालकों को किया जागरूक:
टोल प्लाजा पर चलाया गया 34 सड़क सुरक्षा सप्ताहपर मंगलवार को खुर्सापार पोलीस चौकी के के अधिकारी निलेश भिलावी, नांदगाये व रवींद्र वैद्य के ओरिएंटल टोलकर्मियों ने 34 सड़क सुरक्षा के अंतर्गत जागरूकता कार्यक्रम आयोजितमंगलवार को कारंजा टोल प्लाजा पर 34 सुरक्षा सप्ताह के 7 दिन आयोजित कार्यक्रम में कारंजा टोलके व्यवस्थापक रवींद्र वैद्य ने कहा कि सड़क सुरक्षा सप्ताह का उद्​देश्य वाहन चालकों व आम नागरिकों को यातायात नियमों के प्रति जागरूक कर सड़क दुर्घटनाओं में कमी लाना है।



उन्होंने मौजूदा लोगों से सड़क सुरक्षा सप्ताह अभियान के साथ जुड़ने की अपील की। उन्होंने कहा कि जीवन से जरूरी कुछ नहीं है। अपने परिवार से संबंधित जिम्मेदारियों को समझें और यातायात के नियमों का शत-प्रतिशत पालन करें। यदि सड़क पर कोई घायल व्यक्ति दिखता है तो उसकी मदद अवश्य करें और एंबुलेंस को सूचना देने के साथ ही उसे उपचार को अस्पताल जरूरी पहुंचाएं।इस दौरान खुर्सापार पोलीस चौकी के उपनिरीक्षक निलेश भिलावे ने बताया कि सड़क सुरक्षा सप्ताह हम सभी को सड़क सुरक्षा नियमों एवं यातायात नियमों का अनुपालन करना चाहिये। शराब पीकर या मोबाइल फोन पर बात करने के दौरान कभी वाहन नहीं चलाना चाहिए, क्योंकि ऐसे वक्त में दुर्घटना की संभावना अधिक हो जाती है। दुपहिया वाहन चालकों को हेलमेट व चार पहिया वाहन चालकों को सीट बैल्ट का प्रयोग जरूर करना चाहिए।







इस दौरान टोलकर्मियों ने वाहनों पर पंप्लेट्स आदि का वितरण कर लोगों को जागरूक किया। इस मौके पर ओरिएंटल रुटिंग अधिकारी शैलेश भांगे, हरीश नासरे, देवचंद ढोबाळे, नागेश ढोबाळे आदि मौजूद रहे।

बुधवार, जानेवारी १८, २०२३

वन अकादमीच्या प्रशिक्षणार्थी वनधिकाऱ्यानी जाणून घेतला चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास | Forest Academy Gond history of Chandrapur

वन अकादमीच्या प्रशिक्षणार्थी वनधिकाऱ्यानी जाणून घेतला चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास | Forest Academy Gond history of Chandrapur





वन अकादमी व इको-प्रोचा संयुक्त उपक्रम

चंद्रपूर: इको-प्रो व वन अकादमी चंद्रपूर यांच्या वतीने वन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी वनाधिकारी यांचा चंद्रपूर किल्ला परकोटावरून हेरीटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी चंद्रपूर शहरातील गोंडकालीन इतिहास जाणून घेतला.

चंद्रपूर शहरातील गोंडकालीन इतिहास जाणुन घेत परकोटावरून पदभ्रमण करीत अनेक स्मारकांना भेटी दिल्या. (Forest Academy Gond history of Chandrapur)


कोण झाले सहभागी
इको-प्रो तर्फे किल्ला स्वच्छता अभियानानंतर सुरू करण्यात आलेल्या हेरीटेज वॉक या चंद्रपूर किल्ला परकोट व ऐतिहासिक स्मारक भेटीतून चंद्रपूरचा इतिहास पर्यटकांनासमोर ठेवला जातो. या उपक्रमात यंदा वन अकादमी मध्ये प्रशिक्षणार्थी असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्या बॅचसोबत वनाधिकारी यांनी सुध्दा सहभाग घेतला होता. यात प्रामुख्यान ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक नंदकिशोर काळे, वनअकादमीचे उप संचालक अविनाशकुमार, पियुषा जगताप, चंद्रपूरचे विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी सहभागी झाले होते.


चंद्रपुरात फिरण्यासारखे

सर्वप्रथम रामाळा तलाव Ramala Lake येथे शहरातील विविध स्मांरकाची प्रर्दशनी असलेल्या जागेवर ऐतिहासिक माहिती देण्यात आली. त्यांनर बगड खिडकी ते अंचलेश्वर गेटपर्यत किल्लावरून पदभ्रमण करीत किल्ला परकोटा सोबत गोंडकालीन इतिहास, इको-प्रो चे स्वच्छता अभियानची माहिती जाणून घेत सदर पदभ्रमण अंचलेश्वर गेट लगत असलेले अंचलेश्वर मंदीर व गोंडराजे समाधीस्थळ येथे समारोप करण्यात आला. याठिकाणी गोंडराजे बिरशहा यांची समाधी व परिसरातील विविध गोंडराजे यांची समाधी विषयी माहीती तसेच अंचलेश्वर मंदिराची निर्मीती व इतिहास सुध्दा यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी पर्यटकांना सांगण्यात आला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
चंद्रपूर जिल्हा वाघ-वन्यप्राणी, Wildlife sanctuary जंगल याशिवाय ऐतिहासिक वारसा लाभलेल्या असल्याने चंद्रपरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे Tadoba andhari Tiger Reserve india आहे. याविषयी अधिक प्रचार प्रसार झाल्यास चंद्रपूर शहरातील वैभवशाली व गौरवपूर्ण इतिहासांची माहिती पर्यटकांना मिळू शकेल, अशी प्रतिक्रीया उपस्थित वनाधिकारी यांनी दिली.  


इको-प्रो Eco Pro ने सातत्यपुर्ण केलेली स्वच्छता व पर्यटन विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न उल्लेखनीय असून, यासाठी सर्व स्तरातुन प्रयत्न झाल्यास चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होऊ शकते, अशी भावना सहभागी पर्यटकांनी व्यक्त केली.

मंगळवार, जानेवारी १७, २०२३

आकाशवाणी मराठी प्रादेशिक बातमीपत्र | १७ जाने, २०२३  #airaurangabadnews #airpunenews #akashvanipunebatmya

आकाशवाणी मराठी प्रादेशिक बातमीपत्र | १७ जाने, २०२३ #airaurangabadnews #airpunenews #akashvanipunebatmya



 


विधान परिषदेच्या नाशिक आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासह अन्य बातम्यांसाठी https://www.khabarbat.in/