Kavikulguru Kalidas of Sanskrit University |
Kavikulguru Kalidas of Sanskrit University | कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कृती समितीच्या वतीने आजपासून परीक्षेवरील कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात परीक्षा विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून त्यांनी परीक्षा संबंधित काम करणे बंद केले आहे.
विश्वविद्यालयाच्या उर्वरित 17पदांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन संरचना लागू करावी, आश्र्वासित प्रगती योजना लागू करावी, 58 महिन्यांची थकबाकी द्यावी तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने अनेकदा आश्वासन दिले परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने, संयमाचा कडेलोट होऊन सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालय कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे.
ककासंवि च्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी आज परिसरात घोषणा दिल्या. परीक्षा कामकाजावरील बहिष्कार हे पहिले पावूल असून हा बहिष्कार आता सुरूच राहणार असल्याचे कृती समिती अध्यक्ष श्री राजीव रंजन मिश्रा यांनी स्पष्ट केले. 16 फेब्रुवारी ला एक दिवस लाक्षणिक संप होईल आणि 20 फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार आहे. आता सरकारने कृती करावी आम्हाला चर्चा नको असा स्पष्ट पावित्रा सर्वांनी घेतला असल्याने हे आंदोलन यशस्वी होईल असा विश्वास श्री मिश्रा यांनी व्यक्त केला आहे .
श्री राजीव रंजन मिश्रा
अध्यक्ष, कृती समिती