Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

भद्रावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भद्रावती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै ०२, २०२३

वडिलाने पेन्शनचे पैसे न दिल्याने उचलले हे पाऊल

वडिलाने पेन्शनचे पैसे न दिल्याने उचलले हे पाऊल


शिरीष उगे ( भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : बापाने आपल्या पेन्शन मधील पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात मुलाने आपल्या बापाला मोगरी व दगडाच्या सहाय्याने जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगर येथे दि. १ रोज शनिवारला घडली. या घटनेत वडील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुरज गुलाब दाते याला अटक केली आहे.

गुलाब लक्ष्मण दाते वय 72 वर्षे हे भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगरात राहतात. त्यांचा मुलगा सुरज दाते हा त्यांना नेहमी पेन्शनचे पैसे मागायचा मात्र त्याचे वडील गुलाब दाते हे त्याला पेन्शनचे पैसे देण्यास नकार देत होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपी सुरज दाते याने आपले वडील गुलाब दाते यांना पेन्शनचे पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गुलाब दाते हे झोपून असताना मुलगा सुरज याने लाकडी मोगरी व दगडाच्या साह्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरज दिते याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२

आगामी उत्सव शांततेत साजरे करण्याकरिता शांतता कमिटीची बैठक

आगामी उत्सव शांततेत साजरे करण्याकरिता शांतता कमिटीची बैठक

शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती :- आगामी सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावे याकरिता पोलीस स्टेशन भद्रावती येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार गोपाल भारती, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपमुख्य अधिकारी जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, सुरज गावंडे, प्रफुल चटकी, खेमचंद हरियानी, विनय बोधी डोंगरे, जयदेव खाडे, मुनाज शेख , विशाल बोरकर, अमित नगराळे, पवन हुरकट,शंकर मून, रोहन कुटेमाटे, डॉ शकील शेख महावितरण चे प्रतिनिधी , पत्रकारानं तर्फे पी .जे. टोंगे, विवेक सरपटवर, विनायक येसेकर, संदिप जिवने, दिलीप मांढरे, राजू गैनवार, यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
या महिन्यात गांधी जयंती, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ईद यासोबतच इतर शासकीय व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावे याकरिता उत्सवा दरम्यान शहरातील ट्राफिक सुरडीत ठेवणे, बुधवार ला होणारे आठवडी बाजारातील रस्त्यांवर लागणारे हाथ रिक्षे नियंत्रित ठेवावे, शोभा यात्रांना अडथळा होऊनये याकरिता लोंबकडलेले विजेचे व दूरचित्रवाहिन्यांचे तार व्यवस्तीत करावे तसेच बाहेरील कोणी अनोळखी व्यक्ती या होनाऱ्या उत्सवात येऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अश्यांची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात यावी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्या यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी महिला आयोगाने घेतली तातडीने दखल

आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी महिला आयोगाने घेतली तातडीने दखल

आश्रमशाळेच्या ५३ वर्षीय अधीक्षकाने केला आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्‍कार |


भद्रावती (जि. चंद्रपूर) (khabarbat Chandrapur ) । तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेच्या ५३ वर्षीय अधीक्षकाला आठवीतील विद्यार्थिनीवर बलात्‍कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण भद्रावती (Bhadrawati) पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र गांभीर्य लक्षात न घेता संस्थाचालक प्रकरण दडपू पाहत होते. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस (Hinganghat Police)ठाण्यात पोहोचल्यावर रविवारी उघडकीस आले. दरम्यान या घटनेची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली असून तातडीने कारवाई करून अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना (Police Chandrapur) दिलेले आहेत.

मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस अधिकारी यांना पत्र पाठवले आहे.



पीडितेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी ते हिंगणघाट शहरात राहायला आले. त्यांनी आपल्या १३ वर्षीय मुलीला गमाबाई निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. काहीच दिवसांत मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगून शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यामुळे मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरमालकीनीने मुलीला प्रकृतीबाबत सहज विचारणा केली. त्‍यातून मुलीसोबत काही तरी अनुचित प्रकार घडल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठण्यात आले. Shashkiy Ashram Shala


तक्रारीनंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत इटनकर यास अटक केली. घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे हे प्रकरण वळवण्यात आले आहे. दरम्यान, आमदार समीर कुणावार (Samir Kunawar) यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्‍हणत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.





भद्रावती, महाराष्ट्र, भारत

rape victim

rape statistics in india

गुरुवार, ऑगस्ट ०४, २०२२

उद्याला लोकनेते अँड मोरेश्वर टेमुर्डे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व भव्य नागरी सत्कार

उद्याला लोकनेते अँड मोरेश्वर टेमुर्डे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व भव्य नागरी सत्कार


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: स्थानीक श्री मंगल कार्यालयात येत्या शुक्रवारी ५ ऑगस्टला महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते ऍड. मोरेश्वर टेमुर्डे यांचा "सहस्रचंद्रदर्शन सोहळा" आयोजित करण्यात आला आहे. योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळ भद्रावती सह शहरातील विविध सामाजिक संस्था एकत्रित येऊन हा सोहळा आयोजित केला आहे.

 शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सी.एल.थूल (रिटायर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, मुंबई) राहतील. प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे माजी आमदार तथा शेतकरी नेते मा. पाशा पटेल उपस्थित असतील. तरी या कार्यक्रमाला भद्रावती परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकनेते ऍड मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब सहस्रचंद्रर्शन सोहळा समितीचे चंद्रकांत गुंडावार, रवींद्र शिंदे, प्रशांत शिंदे, धनराज आस्वले, गिरीश पद्मावार, जयंत टेमुर्डे, पुरुषोत्तम मते, पांडुरंग टोंगे, माधव कौराशे, प्रशांत कारेकर, सुभान सौदागर, नागो बहादे, बाळा पडवे, सुधीर सातपुते, प्रेमदास आस्वले, सुखदेव साठे, विठ्ठल मांडवकर, लक्ष्मण बोढाले, एड. भूपेंद्र रायपुरे, ज्ञानेश्वर डुकरे, विठ्ठल बदखल, अण्णा कुटेमाटे, राजू बोरकर, सुशील देवगडे, विजय सातपुते, भाविक तेलंग, अजय रामटेके, सुषमा शिंदे, सुनिता खंडाळकर, किरण साळवी, मंदा वरखडे, विलास गुंडावार, विलास भिवगडे, डॉ. प्रेमचंद, एड. शेख, बबन शंभळकर, पंढरीनाथ गायकवाड, गुलाब पाकमोडे, डॉ. ज्योति राखुंडे, डॉ प्रकाश तितरे, डॉ.घोसरे यांनी केले आहे.
विज पडून गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी

विज पडून गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

: नगर पालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणी लगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक वीज गर्जनेसह अचानक आलेल्या पावसात वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना दि.३ ऑगस्टला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

संजय काशिनाथ चालखुरे (५५) रा. बरांज मोकासा असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव असून विकास डाखरे (२२) रा.बरांज मोकासा असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही चीचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत होती. अचानक झालेल्या वीज गर्जनेच्या पावसात ही घटना घडली. मृत गुराख्याचे प्रेत उत्तरीय तपासणीस ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. मृतक हा आपल्या आईकडे राहत असून पत्नी सोडचिठठी देऊन गेली. त्यास एक मुलगी असून मागील वर्षी लग्न होऊन आपल्या सासरी आहे. त्याच्या मृत्यूमुळे गावात एकच शोककळा पसरली.

लोकमान्य विद्यालयात लॊकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

लोकमान्य विद्यालयात लॊकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी





शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

येथील लोकसेवा मंडळातर्फे संचालित येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात लोकमान्य टिळक यांची १०२ वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोणारा येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गोरंटीवार, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. मृण्मयी कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सहसचिव नामदेवराव कोल्हे, सदस्य संजय पारधे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या आशालता सोनटक्के आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वती माता, लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.मृण्मयी कुळकर्णी यांनी आपल्या कीर्तनातून लोकमान्य टिळकांचे चरित्र व कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच लोकमान्य टिळकांचे चरित्र सर्वांनी वाचावे असे आवाहन केले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.विनोद गोरंटीवार, डॉ. महाकाळकर आणि चंद्रकांत गुंडावार यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यिनींनी स्वागत गीत सादर केले. 
     
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या आशालता सोनटक्के यांनी केले. संचालन प्रा. अस्मिता झुलकंटीवार यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक रुपचंद धारणे यांनी मानले. शिक्षिका कु. प्राजक्ता चिखलीकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
      कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, विद्यालयाचे आजी-माजी शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

शुक्रवार, जून १७, २०२२

शिंदे विद्यालयाचे सुयश ; विध्यार्थिनीनेचं मारली बाजी ; सानिया कांबडे प्रथम

शिंदे विद्यालयाचे सुयश ; विध्यार्थिनीनेचं मारली बाजी ; सानिया कांबडे प्रथम

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती चा निकाल 98 76 टक्के लागला असून उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील 30 विद्यार्थी प्रवीण श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ,कुमारी सानिया कांबळे या विद्यार्थिनीने 86.60/% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. कुमारी साक्षी ठावरी हिने 86.40% गुण घेऊन विद्यालय द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे .तर कु सृष्टी कौरासे 86. 20 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. 14 विद्यार्थ्यांनी 80% च्या वर घेऊन नैपुण्य प्राप्त केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे ,संस्थेचे सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे,सहसचिव डॉ. विशाल शिंदे,प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे ,पर्यवेक्षक श्री ताजने सर, उमेश पाटील, नंदनवार, देशमुख, सुभाष कोल्हे, आसुटकर , लांबट सर अनंत चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

बुधवार, मे १८, २०२२

विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न

विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न

शिरीष उगे ( भद्रावती प्रतिनिधी)
       स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या बी. ए. भाग एक व दोन च्या क्रमीक अभ्यासक्रमावर आधारित  सामाजिक परिवर्तन तसेच स्थलांतरण, विस्थापन आणि पुनर्वसन समस्येवर प्रबोधनात्मक व्याख्यानमाला समाजशास्त्र अभ्यास मंडळामार्फत  संपन्न  करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक लोकमान्य महाविद्यालय वरोराच्या सी एच बी प्रा.प्रीती पोहाने हजर होत्या. सदर कार्यक्रमाच्या प्रथम  सत्रात सामाजिक परिवर्तन या विषयावर आधारित व्याख्यानाचे प्रास्ताविक भाषण समाजशास्त्र  विभाग प्रमुख प्रा. अमोल वा.ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन तृप्ती काकडे यांनी केले आणि तनिषा कुटेमाटे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले. 
         सदर व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात प्रीती पोहाने यांनी स्थलांतरण, विस्थापन आणि पुनर्वसन समस्येवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. स्थलांतरण हे अकस्मात घडून येते, तर पुनर्वसनासाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागतो. असे विचार प्रा. अमोल ठाकरे यांनी प्रातविक भाषणातुन मांडले. या सत्रात  संचालन सुजाता उगे हिने तर पवन चौखेनी आभार मानले.

गुरुवार, एप्रिल ०७, २०२२

“त्या” तरूणीची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्या : भद्रावतीच्या संतप्त महिलांची मागणी

“त्या” तरूणीची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्या : भद्रावतीच्या संतप्त महिलांची मागणी

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती : भद्रावती येथे सोमवारी (4 एप्रिल) ला सकाळी अकराचे सुमारास सुमारे 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळून आल्यानंतर तब्बन तिन दिवसाचा कालावधी होऊनही " ना आरोपी मिळाले, ना तरूणीची ओळख पटली. त्यामुळे निदर्यीपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भद्रावती येथील शेकडों महिलांनी महिलांनी केली. आज बुधवारी (6 एप्रिल) ला सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गाने कैंडल मार्च कॅंडल् मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय आरोपींचा शोध लागला नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा महिलांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास भद्रावती येथील ढोरवासा ते पिपरी मार्गावरील सरकारी आयटीआय जवळील शेतशिवारात एका तरूणीचा डोके नसलेला मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. शेतमालकाला मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली. घटना होऊन तिन दिवसाचा कालावधी झाला. मात्र त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. तसेच आरोपींचा शोध लागलेला नाही. किंबहुना या घटनेशी संबंधीत एकही पुरावा पोलिसांच्या हाती गवसलेला नाही. भद्रावती आणि चंद्रपूर पोलिस या घटनेचा तपास करीत असताना आरोपी आणि त्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आज बुधवारी भद्रावती येथील संतप्त झालेल्या महिला रस्यिासवर उतरल्या. कॅडलमार्च काढून आरोपींचा शोध घेऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास भद्रावती शहरातील नागमंदिरापासून महिलांनी त्या तरुणीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी कँडल मार्च काढला. शहरातील शेकड़ों महिला कैंडल मार्च आंदोलनात सहभागी झाल्या. हातात कँडल घेऊन शहरातील मुख्य मार्गाने निघालेला कॅडल मार्च भद्रावती शहराच्या स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ विसावला. नारी के सम्मान मे भद्रावती मैदान मे, नारी शक्ती जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणांनी भद्रावती शहर दणाणून गेले होते.

मंगळवार, मार्च २२, २०२२

विवेकानंद महाविद्यालयात  तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन

विवेकानंद महाविद्यालयात तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती :स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या  कार्यक्रमास व्याख्याता म्हणुन वासुदेव राठोड साहेब विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती भद्रावती यांना आमंत्रित करण्यात आले होते. विभागप्रमुख डॉ. राखुंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून सांगितली. "पंचायत समिती आणि लोककल्याणकारी योजना "या विषयावर बोलताना  राठोड यांनी पंचायत समितीचे काम कसे चालते, कोणकोणत्या शासकीय योजना लोकांसाठी उपलब्ध आहेत याची सविस्तर व  उपयुक्त माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. उमाटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत जागरूक असावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन बी ए भाग 2 ची विद्यार्थिनी पल्लवी  आस्वले हिने तर आभारप्रदर्शन हर्षदा भोयर हिने केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बुधवार, मार्च १६, २०२२

निळकंठराव शिंदे  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोपिय कार्यक्रम

निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोपिय कार्यक्रम


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती : चिरादेवी- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय , भद्रावती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत दिनांक १५ मार्च  २०२२ ला  चिरादेवी येथील शिबिराचा समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष. डॉ  एल.एस.लड़के , प्राचार्य नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती प्रमुख अतिथी धनराज आस्वले माजी प्राध्यापक बहरीन गल्फ,  निरुपला ताई मेश्राम सरपंच, चिरादेवी, दीपालीताई मोरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे, किशोरजी  भोयर,  हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे यानी राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात आयोजित केलेले बौद्धिक मार्गदर्शक, सामाजिक कार्यक्रम तसेच केलेला सामाजिक कार्याचा आढावा  मांडला. त्या नंतर  श्री.धनराजजी आस्वले यांनी  जिद्द आणि चिकाटी  च्या सहाय्याने आपण जीवनामध्ये  कसे यशस्वी होऊ शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात  डॉ  एल.एस.लड़के यानी शिबिरातील विद्यार्थ्यांना खरे शिक्षण म्हणजे काय आणि आपण त्याचा  उपयोग जीवन जगतांना कसा करायचा याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन प्रा. कुलदिप भोंगळे यानी केलें. या कार्यक्रमाला रासेयो विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व धनश्री घुगुल तसेच सुहानि बच्छावत, जाई पांढरे हे माजी विद्यार्थी  देखील उपस्थित होते.

सोमवार, मार्च १४, २०२२

भद्रावती येथे जागतिक ग्राहक दिन थाटात संपन्न

भद्रावती येथे जागतिक ग्राहक दिन थाटात संपन्न


*ग्राहक पंचायत चळवळीचे कार्य प्रेरणादायी - न्यायाधीश अतुल अळशी

*शेकडो ग्राहकांनी घेतला कार्यशाळेचा लाभ

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून दिनांक १३ मार्च २०२२ रोज रविवारला ग्राहकांना जागृत करण्यासाठी, ग्राहकांचे हक्क समजून सांगण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी जागतिक ग्राहक दिनी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते.

ग्राहक पंचायत भद्रावती कडून माननीय न्यायाधीश अतुल अळशी, डॉक्टर नारायण मेहरे, डॉक्टर नामदेव उमाटे, श्रीमती कीर्ती गाडगीळकर, वैशाली बोरकर यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक माननीय न्यायाधीश अतुल अळशी, ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा चंद्रपूर यांची उपस्थिती होती. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ ज्याच्यावर ग्राहक तक्रार निवारण आयोग चालते तो शेवटी असतो, प्रथम ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांचे चळवळीतून ग्राहक जागृती होत असून ग्राहकांना कायद्याचे मूलभूत माहितीचे संरक्षण हक्काबाबत सहायता लाभत असते, त्यामुळे ग्राहक पंचायतीचे कार्य हे प्रेरणादायी असुन ही चळवळ अधिक गतिमान करण्यास नागरीकांनी सक्रिय सहभाग योगदान द्यावे. असे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण आयोग चंद्रपूर चे अध्यक्ष तथा न्यायाधीश अतुल अळशी यांनी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळा प्रसंगी भद्रावती येथे केले. साहेबांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याबद्दल जमलेल्या सर्व नागरिकांना माहिती दिली. ग्राहकांचे अधिकार, फसवणूक झाल्यास तक्रार कोठे आणि कशी द्यायची याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉ. नारायण मेहरे, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत यांनी ग्राहक पंचायती चा इतिहास, ग्राहक पंचायतीची निर्मिती, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक पंचायतीची भूमिका आणि ग्राहक पंचायतीचे निर्माता माननीय स्वर्गीय बिंदुमाधव जोशी साहेब यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ग्राहकांनी स्वतः जागृत राहून स्वयम् लढा देण्याकरिता तयार करण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले पाहिजे तसेच शेतकरी बांधवांच्या अनेक प्रश्नांकडे लक्ष देऊन शोषणमुक्त समाज तयार करावा असे त्यांनी सांगितले.

ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती कीर्ती गाळगीडकर यांनी ऑनलाइन होणारी फसवणूक यावर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या कंपनीतून ऑनलाईन वस्तू विकत घेताना काय काळजी घ्यावी आणि फसवणूक झालीच तर दाद कुठे आणि कशी मागायची याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नामदेव उमाटे साहेब यांनी ग्राहक पंचायत भद्रावतीच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी ग्राहक पंचायत भद्रावती ला नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे अनेक लोक हिताचे कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे या विद्यालयाला लोक विद्यालय असे डॉक्टर नामदेव उमाटे यांनी संबोधिले. तसेच विवेकानंद महाविद्यालय येथे कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिकांचे, पाहुण्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. ग्राहक पंचायत भद्रावती चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार यांनी भद्रावती ग्राहक पंचायतीच्या केलेल्या कार्याची माहिती दिली. ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पुरूषोत्तम मते यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक पंचायत च्या कार्याची सविस्तर माहिती दिली. सहारा क्रेडिट सोसायटीच्या आलेल्या जनसमुदायाला प्रविण चिमुरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करत तक्रार कशी दाखल करायची, कागदपत्रे आणि उपस्थित ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. सुदर्शन तनगूलवार यांनी आभार प्रदर्शन केले. तर कार्यक्रमाचे संचालन सदानंद आगबत्तनवार अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, चंदनखेडा यांनी केले.

जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वामन नामपल्लीवार, पुरुषोत्तम मत्ते, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर, मोहन मारगोनवार, तामगाडगे, गुलाब लोणारे, सुदर्शन तनगूलवार, मोहनिश नगराळे, प्रमोद भोयर, प्रशांत चिलबुले तसेच विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे डॉ. रमेश पारेलवार, कल्याणी लेडांगे, सुषमा बावणे, वामण अंड्रस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.

सोमवार, मार्च ०७, २०२२

विवेकानंद महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांतर्फे  निरोप समारंभ

विवेकानंद महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या विद्यार्थ्यांतर्फे निरोप समारंभ

शिरिष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांतर्फे नुकताच निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्रातील नामवंत प्रा. धनराज आस्वले, नागोबा बहादे, प्रकाश सातपुते, डॉ. विजय टोंगे, डॉ. सुधीर आष्टुनकर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य उमाटे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगाराच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रा.आस्वले यांनी तीनही शाखेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे जाहीर केली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिनत पठाण, आरती श्रावणे, कल्याणी गायकवाड व दिनेश धारा या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र लांबट, प्रास्ताविक प्रा.आर.डी. मालेकर व आभारप्रदर्शन प्रा.के.एन. कापगते यांनी मानले. कार्यक्रमाला कला, विज्ञान व एमसीव्हीसी शाखेतील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भद्रावती ग्रेनेड संघ विजयी

लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत भद्रावती ग्रेनेड संघ विजयी



स्पर्धेत 19 वर्षाखालील भारतीय तथा रणजी खेळाडूंचा भरणा
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे बी.जे. वाय .एम. टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या टी ट्वेन्टी च्या अंतिम सामन्यात भद्रावती ग्रेनेड क्रिकेट संघाने ब्लास्टर इलेव्हन क्रिकेट संघावर पाच गडी राखून विजय मिळविला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चा शाखा भद्रावती व आश्रय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बी. जे. वाय .एम. टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन स्थानिक मारोतराव पिपराडे मैदानावर करण्यात आले होते. यामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धेत 19 वर्षाखालील भारतीय संघातील एका खेळाडूचा तसेच जवळपास 15 रणजी खेळाडूंचा विविध संघाकडून सहभाग होता.
अंतिम सामन्यात ब्लास्टर इलेव्हन क्रिकेट संघाने 20 षटकात सर्व गडी गमावून 120 धावा केल्या. अतिशय संयमाने खेळत विजेत्या भद्रावती ग्रेनाईड संघाने विसाव्या शतकात पाच गडी राखून विजय संपादन केला .कमी स्कोअरच्या मॅच मध्ये गोलंदाज व फलंदाजांची खऱ्या अर्थाने जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली .
विजेत्या भद्रावती ग्रेनेड संघाला रोख एक लाख रुपये तर उपविजेत्या ब्लास्टर इलेव्हन संघाला 75 हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात .आले मॅन ऑफ द सिरीज देवेंद्र तरूलिया, मॅन ऑफ द मॅच दिनेश यादव, बेस्ट बॅट्समन देवेंद्र तरूलिया, बेस्ट बॉलर अभिषेक पाठक, बेस्ट यष्टिरक्षक बाळकृष्ण चव्हाण, बेस्ट बिल्डर अक्षर रॉय यांना सन्मानित करण्यात आले.

अंतिम सामन्याच्या पारितोषिक वितरणाला रवींद्र शिंदे, प्रदीप गुंडावार, संतोष आमने, विनोद पांढरे, भाजपाचे नरेंद्र जीवतोडे, विजय वानखेडे, सुधीर वर्मा, चंद्रकांत खारकर, सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, पो. उ. मुळे, अमित गुंडावार, इम्रान खान, कामरान व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भद्रावती ग्रेनेड संघाचे संघमालक प्रशांत शिंदे, संदीप शिंदे, नकुल शिंदे यांच्या सहित सचिन सरपटवार, सुनील महाले, अफजल भाई व विजयी संघातील खेळाडू कर्णधार सतीश कवराते, खुशाल पिंपळकर, ऋषभ राठोड, शुभम दुबे, मोहित, दिनेश यादव, इम्रान सिद्दिकी, संतोष कणकम, वरून पलदुनकर, धर्मेंद्र अहलावत, वैभव चांदेकर इत्यादी खेळाडू उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अमित गुंडावार, चंद्रकांत खारकर यांनी केले. संपूर्ण स्पर्धेकरिता तेजस कुंभारे, नाना हजारे, समीर बल्की, तेजस कुंभारे, प्रज्वल नामोजवार, शिवा पांढरे, विशाल ठेंगणे, मोनू पारधे, नाना हजारे, तवशिफ शेख, शिवा कवादार यांनी सहकार्य केले.

सोमवार, फेब्रुवारी २८, २०२२

भाकपा तर्फे केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थनात धरणे आंदोलन

भाकपा तर्फे केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थनात धरणे आंदोलन

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती:- भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एकात्मिक बरांज कोळसा खान प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी दि.३ मार्चला दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाचे प्रांगणात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
     कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लि. बंगलोर प्रणित एकात्मिक बरांज खुली कोळसा खानच्या किलोनी ब्लॉकमध्ये येत असलेल्या नगर परिषद क्षेत्रातील चिंचोर्डी येथील शेतजमिनीचे संपादन अथवा खरेदी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रबंधनाकडे केली आहे. जर या शेतजमिनी संपादित अथवा खरेदी न केल्यास इच्छामरणाची मागणी प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.त्याअनुसंगाने प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या कुटुंबासह खान क्षेत्रात दि.३ मार्चला सामूहिक इच्छामरण घेणार आहेत.  त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दि.३ मार्चला दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयाचे प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२

विंजासन रोडवरील कुंभारबोढी तलाव वाचविण्याची ईको-प्रोची मागणी

विंजासन रोडवरील कुंभारबोढी तलाव वाचविण्याची ईको-प्रोची मागणी

* ऐतिहासिक शहरातील ऐतिहासिक पानस्थळ व जैवविविधता संवर्धित करा


शिरीष उगे(भद्रावती प्रतिनिधी) :
स्थानिक विजासन रोड लगत असलेली प्राचीन बोढी ले-आऊट मालकातर्फे बुजविण्याचे काम चालू आहे. जैवविविधतेच्या अनुषंगाने हे करणे चुकीचे आहे. त्यामुळे सदर बोढी बुजविण्याचे काम त्वरीत बंद करुन भविष्यात भुजल साठा अबाधित रहावा करीता शहरातील पानथळ संवर्धित करण्याची मागणी ईको-प्रो द्वारे करण्यात आली आहे.
भद्रावती शहरात अनेक पुरातन तलाव, मामा तलाव, बोडी अस्तित्वात आहे. यामुळे शहारातील भुजल पातळी राखून तर आहेच मात्र पर्यावरण अबाधित राखले जात आहे. या तलावा मधे विविध प्रजातींच्या पक्षांचा वावर आहे, ज्यात स्थानिक पक्षांसोबतच प्रवासी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असल्याची नोंद आहे. शहरातील काही तलावांचा वापर हे प्रवासी पक्षी प्रजनना करिता वापरतात मात्र मागील काही वर्षात या तलावांची परिस्तिथी वाईट झाली आहे. काही तलावांचे लेआऊट मधे रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. एका तलावाचे रूपांतर लेआऊट मध्ये यशस्वीरित्या केल्यामुळे या बिल्डर लॉबी चे मनोबल वाढले आहे त्यांनी आता तलावांचे रूपांतर लेआऊट मध्ये करण्याचा सपाटा लावला आहे.
नैसर्गिक रित्या कुठेही पाणी जमा होत असेल त्यास पानथड असे संबोधल्या जाते आणि असे पानथड़ नष्ट करणे बेकायदेशीर आहे.
       आज दिनांक ११ /२/२०२२ ला स्थानिक विजासन रोड लगत असलेली प्राचीन बोढी बुजविण्याचे काम चालू आहे. जैवविविधते च्या अनुषंगाने हे करणे चुकीचे आहे. जैवविवीधता कायदा २००२ नुसार असे करणे गुन्हा आहे. सदर कृत्य करणाऱ्या बिल्डर लॉबी वर त्वरित गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक इको-प्रो संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप जीवने यांनी केली आहे.
----------------------------------------------
सदर खासगी मालमत्ता असल्याने तशी पालिका प्रशासनाकडे अडविण्याची तरतूद नाही. तरीही माहिती घेतली असता त्या तलावाचे आरक्षण अजून बदलले नसल्याने संबधीत ले-आऊट मालकाला नोटीस देण्यात येईल.
- सूर्यकांत पिदुरकर,
मुख्याधिकारी
न.प. भद्रावती
----------------------------------------------

शहरांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने तलाव, पाणस्थळे अत्यंत महत्वाचे आहे, पूर्वीपासुनच ही तलाव फक्त रोजगारच देत नव्हती, तर एकंदरीत जैवविवीधता, स्थानिक पर्यावरण व मानवांच्या दृष्टीने, महत्वाचे होती. अशाप्रकारे ही तलाव रहिवाशी स्थानासाठी वापर होऊन हा तलावांचा नैसर्गिक वारसा नष्ट होतो आहे. भद्रावती ऐतिहासिक नगरी असुन ऐतिहासिक वारसा सोबतच तलावाच्या रूपाने नैसर्गिक वारसा सुध्दा या शहराने जोपासला आहे. हळू हळू एक-एक तलाव नष्ट होत आहे.  भद्रावती शहरातील सर्वच तलावाच्या संवर्धनासाठी नगरपालिकेने त्वरीत हस्तक्षेप करीत संवर्धनाच्या दॄष्टिने आवश्यक प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनकड़े पाठवावे.
- बंडू धोत्रे
अध्यक्ष
ईको-प्रो, चंद्रपुर

सोमवार, जानेवारी २४, २०२२

दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा

*मराठी भाषा समृद्ध करणे ही  प्रत्येकाची जबाबदारी ...डॉ. ज्ञानेश हटवार
 
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
      : दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय दीपक शर्मा दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी ,प्रथम श्रेणी, भद्रावती  हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री माननीय चैतन्य कुलकर्णी साहेब सह दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, भद्रावती तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्ञानेश हटवार सचिव वि. सा. संघ शाखा भद्रावती, डॉ.  सुधीर मोते अध्यक्ष वि. सा. संघ  शाखा भद्रावती, एडवोकेट कुणाल 
पथाडे अध्यक्ष, तालुका बार असोसिएशन भद्रावती हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
 डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मार्गदर्शन करताना, "मराठी ही आपली मातृभाषा असून तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे . मराठी भाषेचे संवर्धन झाले तरच महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहील" असे मत व्यक्त केले.  तर डॉ. सुधीर मोते यांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेतील समृद्ध असलेला म्हणींचा ठेवा व त्याचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री.  दीपक शर्मा यांनी मराठी भाषेचा अवीट गोडवा सांगितला. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   एडवोकेट श्री. सुरतेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एडवोकेट कुमारी खडसे यांनी केले .
कार्यक्रमाला तालुका बार असोसिएशनचे सर्व सदस्य, न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील श्री अरुण वाडगुरे व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

शनिवार, जानेवारी १५, २०२२

पतीकडून पत्नी व मुलीवर धारदार चाकूने वार पत्नीचा मृत्यू ; पतीला अटक गुन्हा दाखल

पतीकडून पत्नी व मुलीवर धारदार चाकूने वार पत्नीचा मृत्यू ; पतीला अटक गुन्हा दाखल

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:भद्रावती तालुक्यातील माजरी येथे चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीसह मुलीला धारदार चाकूने वार करून गंभीर जख्मी केल्याची घटना गुरुवारी (ता.१३) दुपारी माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना कॉलनीत ब्लाक – १० मधील क्वार्टर नंबर – ७७ मध्ये घडली.
                रामप्यारे साहानी (४३ ) असे आरोपीचे नाव असून, माजरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी साहानी हा वेकोलि माजरीच्या खुल्या खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून पत्नी सुमन (३६) व एक मुलगी सिमरन (१७) मुलगा करण (१५) व आलोख (१३) यांच्यासह वेकोलिच्या कुचना कॉलनीत ब्लॉक – १० मधील मधील क्वार्टर नंबर – ७७ मध्ये राहत होता.
वीरेंद्र साहानी याला पत्नी सुमन हिच्या चारित्र्यावर संशय होता. हे मुलं माझे नाही असे म्हणून नेहमी भांडण करत होता. गत अनेक दिवसांपासून ताे पत्नीला याच कारणावरून मारहाण करीत हाेता़. दरम्यान, गुरुवारी दुपारी दाेघांमध्ये प्रचंड वाद झाल्यानंतर पती वीरेंद्र साहानी याने पत्नी सुमनच्या छातीवर व पोटात चाकूने सपासप पाच वार केला.या मारहाणीत मूलगी सिमरन हिलासुद्धा पोटात चाकुने वार करून रक्तबंबाळ केले.पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने हे हत्याकांड घडवून आणले. घटनेनंतर त्याच अवस्थेत त्यांना सोडून आपल्या क्वार्टरच्या वरुन उडी मारून वसाहतीची भिंत ओलांडून आरोपी तेथून पसार झाला. दरम्यान जख्मी अवस्थेत सुमन व मूलगी सिमरन ब्लॉक मधील तळमजल्यातील क्वार्टरच्या समोर येवून खाली पडली. त्याच दरम्यान शेजारच्या लोकांनी धाव घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडलेल्या सुमन व सिमरनला वेकोलि माजरीच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरु असताना पत्नी सुमन हिचा मृत्यु झाला. दरम्यान मूलगी सिमरन गंभीर जख्मी असल्याने तिला उपचाराकरिता वेकोलिच्या रुग्णालयातून चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालय कुबेर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. सद्या सिमरनची प्रकृति बरी असल्याची माहीती आहे. आरोपी वीरेंद्र साहनी हे आपल्या घरात खूनी खेळ खेळून वसाहतीची भींत ओलांडून विसलोन गावाच्या रेलवे मार्गाने पसार होत असताना माजरी पोलिसांनी कुचना येथील काही युवकाच्या साहाय्याने सिनेस्टाइलने त्याच्या पाठलाग करून त्याला पकडले.

               या प्रकरणी आरोपी विरुद्ध ३०२, ३०७ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपीला आज भद्रावतीच्या न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीचा चंद्रपुरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.
               याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नीपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विनीत घागे करीत आहे

बुधवार, डिसेंबर २९, २०२१

पदावर गेल्यावर विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार करु नये : माजी मुख्याध्यापक जी.एम. गावंडे

पदावर गेल्यावर विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार करु नये : माजी मुख्याध्यापक जी.एम. गावंडे


जिल्हा परीषद शाळेत 'उत्सव मैत्रीचा' स्नेहमिलन सोहळा-२०२१ संपन्न


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: विद्यार्थ्यांनी शाळेत शिकून मोठे झाल्यावर, विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असतांना भ्रष्टाचार करु नये. प्रामाणिकपने, शिस्तीने आपले आयुष्य जगावे, असे प्रतिपादन स्थानिक जिल्हा परीषद शाळेचे माजी मुख्याध्यापक जी.एम. गावंडे यांनी केले.
स्थानिक जिल्हा परीषद शाळा येथे सत्र १९९६ मधे दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी त्यांच्या बैचला २५ वर्षे पुर्ण होत असल्यानिमित्ताने 'उत्सव मैत्रीचा' हा स्नेहमिलन सोहळा शाळेच्या परीसरात नुकताच आयोजित केला.
यावेळी व्यासपिठावार स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष विदयमान मुख्याध्यापक मोडक सर, विशेष अतिथी माजी मुख्याध्यापक गावंडे सर, प्रमुख अतिथी पवार सर, हजारे सर, सावरकर सर, भोयर सर, गोवर्धन सर, धांडे सर, किटे मॅडम, भालेराव मॅडम, संगीडवार मॅडम आदी उपस्थित होते.
यानिमित्ताने शाळेतील माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला साउंड सिस्टीम यंत्र भेट देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांनीही मनोगतांमधून शाळा व शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रध्दांजली देण्यात आली.
        यावेळी सर्वच शिक्षक व विद्यार्थी भावूक झाले होते. सोहळ्याला माजी विद्यार्थ्यांमधे डॉ. मनोज हक्के, महेंद्र हक्के, मुन्ना बांबोळे, रविकांत वरारकर, अभय टोंगे, विजय इन्गोले, महेंद्र माणुसमारे, आशिष मडावी, अनुप पाटील, सतीश जुनघरे, संदिप पाचभाई, सुरेंद्र हनुमंते, विश्वास ताकसांडे, कुंदन नांदेकर, सुधीर चौधरी, विवेक चन्ने, रूचिका बोढे-बेलेकर, निलेश बांदुरकर, सतिश पिदुरकर, वैशाली महाकारकर, नम्रता धानोरकर, विना हेपट, उज्वला उमाटे, सीमा झाडे, रेखा ठेपाले, अर्चना मत्ते, शितल खोब्रागडे, प्रतिभा खानोरकर, वंदना दिवसे, अर्चना तिडके, अश्विनी शेंडे, उर्मिला पिदुरकर, तारा खडसे, जितू साखरकर, किरन वनकर, महेश कांबडे, कीर्ती घोंनमोडे, उमेश कांबडे, दिनेश वंजारी, भीमराव शिवगडे, गणेश नागपुरे, किर्ती पांडे, विजय लांडे, मनिषा जिवतोडे, राजु उके, दिनकर बेलेकर, गणेश पेंदरे, अमोल खोब्रागडे, जगदिश पढाल, कमलेश कदम, रंजना उमरे, संदीप ढेंगळे, प्रविण सरोदे, मनोज वैद्य, प्रशांत टिपले, राखी सहारे, मनोज काले, सपना रोडे, सारीका डांगे, संजय शेंडे, वैशाली कोल्हे मंथनकर, सुहास गोगुलवार, घनशाम गोहोकर, वर्षा कोल्हे, रवि रामटेके, मनोज मोडक, आदी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
           सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. मनोज हक्के, संचालन प्रा. रविकांत वरारकर, वैशाली महाकारकर तर आभार नम्रता धानोरकर यांनी मानले. अत्यंत भावुक वातावरणात कार्यक्रम पार पडला.

रविवार, डिसेंबर २६, २०२१

संताजीच्या रथयात्रेचे भद्रावतीत जल्लोषात स्वागत

संताजीच्या रथयात्रेचे भद्रावतीत जल्लोषात स्वागत


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मगाव असलेल्या सदुंबरे येथून निघालेली संताजीची रथयात्रा संपुर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत आहे. या रथयात्रेत निमित्त " समाज जोडो अभियान" हा उद्देश ठेवून ही रथयात्रा मागील अठरा दिवसापासून महाराष्ट्रात विविध भागात भ्रमण करत आहे. आज भद्रावती येथे संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी यावेळी ढोल-ताशांच्या आवाजात, संत जगनाडे महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमत होतं. या रथयात्रेचे स्वागत संताजी स्नेही मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर गाठे, सचिव श्री सुरेश मस्के, कार्यकारिणी सदस्य व असंख्य समाजबांधवांनी केले. स्वागत झाल्यानंतर भद्रावती येथील संताजी नगर मध्ये असलेल्या संताजी मंदिरापर्यंत ही रथयात्रा पोहोचली. यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते.
संताजीच्या मंदिरात रथयात्रे सोबत असलेले श्री नरेंद्रजी चौधरी रथयात्रेचे प्रणेते, लाल चौधरी सेवा आघाडी तथा संपर्कप्रमुख, श्रीहरी सातपुते विभागीय अध्यक्ष युवा आघाडी,संजय खाटीक विभागीयसचिव, गजानन अगळे, ईश्वर डुकरे या मान्यवरांच्या हस्ते संताजी चे पूजन करून समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
रथयात्रेचे प्रणेते श्री नरेंद्रजी चौधरी यांनी मार्गदर्शन करताना समाजाने एकत्र होणे ही काळाची गरज असून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, ओबीसी आरक्षणासाठी, आपण रस्त्यावर उतरले पाहिजे असे मार्गदर्शन केले. तर श्री गजानन आगळे यांनी की संताजी महाराज नसते तर तुकारामाची गाथा आपल्याला दिसली नसती, त्यांना ती मुखोद्गत असल्या मुळे त्यांनी ती लिहून काढली असे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी स्नेही मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर गाठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधीर मोते तर आभार प्रदर्शन सौ सुनीता बेलखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानेश हटवार, पुरुषोत्तम नैताम, विनोद बाळेकरमकर, गोपाल गायकवाड, सुधीर पारधे, योगेश खोबरागडे, प्रशांत झाडे, महिला भगिनी इत्यादी अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले.