भद्रावती :स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास व्याख्याता म्हणुन वासुदेव राठोड साहेब विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती भद्रावती यांना आमंत्रित करण्यात आले होते. विभागप्रमुख डॉ. राखुंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून सांगितली. "पंचायत समिती आणि लोककल्याणकारी योजना "या विषयावर बोलताना राठोड यांनी पंचायत समितीचे काम कसे चालते, कोणकोणत्या शासकीय योजना लोकांसाठी उपलब्ध आहेत याची सविस्तर व उपयुक्त माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. उमाटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत जागरूक असावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन बी ए भाग 2 ची विद्यार्थिनी पल्लवी आस्वले हिने तर आभारप्रदर्शन हर्षदा भोयर हिने केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.