स्पर्धेत 19 वर्षाखालील भारतीय तथा रणजी खेळाडूंचा भरणा
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे बी.जे. वाय .एम. टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या टी ट्वेन्टी च्या अंतिम सामन्यात भद्रावती ग्रेनेड क्रिकेट संघाने ब्लास्टर इलेव्हन क्रिकेट संघावर पाच गडी राखून विजय मिळविला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते.
भारतीय जनता युवा मोर्चा शाखा भद्रावती व आश्रय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बी. जे. वाय .एम. टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन स्थानिक मारोतराव पिपराडे मैदानावर करण्यात आले होते. यामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धेत 19 वर्षाखालील भारतीय संघातील एका खेळाडूचा तसेच जवळपास 15 रणजी खेळाडूंचा विविध संघाकडून सहभाग होता.
अंतिम सामन्यात ब्लास्टर इलेव्हन क्रिकेट संघाने 20 षटकात सर्व गडी गमावून 120 धावा केल्या. अतिशय संयमाने खेळत विजेत्या भद्रावती ग्रेनाईड संघाने विसाव्या शतकात पाच गडी राखून विजय संपादन केला .कमी स्कोअरच्या मॅच मध्ये गोलंदाज व फलंदाजांची खऱ्या अर्थाने जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली .
विजेत्या भद्रावती ग्रेनेड संघाला रोख एक लाख रुपये तर उपविजेत्या ब्लास्टर इलेव्हन संघाला 75 हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात .आले मॅन ऑफ द सिरीज देवेंद्र तरूलिया, मॅन ऑफ द मॅच दिनेश यादव, बेस्ट बॅट्समन देवेंद्र तरूलिया, बेस्ट बॉलर अभिषेक पाठक, बेस्ट यष्टिरक्षक बाळकृष्ण चव्हाण, बेस्ट बिल्डर अक्षर रॉय यांना सन्मानित करण्यात आले.
अंतिम सामन्याच्या पारितोषिक वितरणाला रवींद्र शिंदे, प्रदीप गुंडावार, संतोष आमने, विनोद पांढरे, भाजपाचे नरेंद्र जीवतोडे, विजय वानखेडे, सुधीर वर्मा, चंद्रकांत खारकर, सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, पो. उ. मुळे, अमित गुंडावार, इम्रान खान, कामरान व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भद्रावती ग्रेनेड संघाचे संघमालक प्रशांत शिंदे, संदीप शिंदे, नकुल शिंदे यांच्या सहित सचिन सरपटवार, सुनील महाले, अफजल भाई व विजयी संघातील खेळाडू कर्णधार सतीश कवराते, खुशाल पिंपळकर, ऋषभ राठोड, शुभम दुबे, मोहित, दिनेश यादव, इम्रान सिद्दिकी, संतोष कणकम, वरून पलदुनकर, धर्मेंद्र अहलावत, वैभव चांदेकर इत्यादी खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अमित गुंडावार, चंद्रकांत खारकर यांनी केले. संपूर्ण स्पर्धेकरिता तेजस कुंभारे, नाना हजारे, समीर बल्की, तेजस कुंभारे, प्रज्वल नामोजवार, शिवा पांढरे, विशाल ठेंगणे, मोनू पारधे, नाना हजारे, तवशिफ शेख, शिवा कवादार यांनी सहकार्य केले.