भद्रावती : भद्रावती येथे सोमवारी (4 एप्रिल) ला सकाळी अकराचे सुमारास सुमारे 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळून आल्यानंतर तब्बन तिन दिवसाचा कालावधी होऊनही " ना आरोपी मिळाले, ना तरूणीची ओळख पटली. त्यामुळे निदर्यीपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भद्रावती येथील शेकडों महिलांनी महिलांनी केली. आज बुधवारी (6 एप्रिल) ला सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गाने कैंडल मार्च कॅंडल् मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय आरोपींचा शोध लागला नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा महिलांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास भद्रावती येथील ढोरवासा ते पिपरी मार्गावरील सरकारी आयटीआय जवळील शेतशिवारात एका तरूणीचा डोके नसलेला मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. शेतमालकाला मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली. घटना होऊन तिन दिवसाचा कालावधी झाला. मात्र त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. तसेच आरोपींचा शोध लागलेला नाही. किंबहुना या घटनेशी संबंधीत एकही पुरावा पोलिसांच्या हाती गवसलेला नाही. भद्रावती आणि चंद्रपूर पोलिस या घटनेचा तपास करीत असताना आरोपी आणि त्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आज बुधवारी भद्रावती येथील संतप्त झालेल्या महिला रस्यिासवर उतरल्या. कॅडलमार्च काढून आरोपींचा शोध घेऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
सायंकाळी सातच्या सुमारास भद्रावती शहरातील नागमंदिरापासून महिलांनी त्या तरुणीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी कँडल मार्च काढला. शहरातील शेकड़ों महिला कैंडल मार्च आंदोलनात सहभागी झाल्या. हातात कँडल घेऊन शहरातील मुख्य मार्गाने निघालेला कॅडल मार्च भद्रावती शहराच्या स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ विसावला. नारी के सम्मान मे भद्रावती मैदान मे, नारी शक्ती जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणांनी भद्रावती शहर दणाणून गेले होते.