Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०७, २०२२

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून महाकाली मंदिर परिसरात भाविकांसाठी व्यवस्था | Mahakali Mandir Chandrapur



चंद्रपूर । चैत्र पौर्णिमेनिमित्त महाकाली यात्रा दि. 7 एप्रिल पासून सुरू झाली असून, यात्रेदरम्यान माता महाकालीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील तसेच इतर राज्याबाहेरून भाविकांच्या सुविधेसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. 


चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीच्या यात्रेत दूरवरून भाविकगण चंद्रपुरात दाखल झाले असून, येथे येणारे भाविक झरपट नदीत पवित्र स्नान करतात. त्यासाठी गौतमनगर बैल बाजारपासून झरपट नदी पात्रातील इकॉर्निया अड़विण्याकरीता ताटव्याचे बांध तयार करण्यात आले. 


महानगर पालिकेने मंदिर परिसरातील भिंतीला लागून असलेल्या जागेची आखणी करून दुकाने लावण्याकरीता दुकान धारकांची रीतसर नोंदणी सुरु केली. पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था करून पाणी 24 तास सुरळीत सुरू ठेवण्याची दक्षता घेतली आहे.  तसेच महाकाली मंदिर परिसरात साफसफाई व स्वच्छता ठेवण्यात येत आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने स्वच्छता, निर्जंतुकीकरण, फवारणी करण्यात आली आहे. वेळोवेळी कचरा उचलण्यासाठी सफाई कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. नदीच्या काठावर तसेच यात्रा परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आली असून, अग्निशामक सेवा 24 तास यात्रा परिसरात तैनात करण्यात आली आहे. भाविकांकरीता प्रसाधनाची व स्वच्छता गृहाची व्यवस्था, मंदिर परिसरात आरोग्य पथक ठेवण्यात आले असून, आवश्यक औषधोपचारासह ॲम्ब्युलन्सदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.