किराणा दुकान आणि माॅलमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला गावखेड्यापासून शहरापर्यंत प्रचंड विरोध होत आहे. अनेक महिलांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी २९ जूनपर्यंत आपले म्हणणे नोंदविता येतील.
सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी केले आहे. अधिसूचनेचा मसूदा http://stateexcise.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.