Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नांदेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नांदेड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२

श्रीमती नरसाबाई संदुलवार यांचे निधन उद्या अंबाडी येथे अंत्यविधी

श्रीमती नरसाबाई संदुलवार यांचे निधन उद्या अंबाडी येथे अंत्यविधी



नांदेड(बालाजी सिलमवार):- मौजे अंबाडी ता.किनवट येथील मन्नेरवारलू समाजातील जेष्ठ महिला श्रीमती नरसाबाई बापूजी संदुलवार वय 95 वर्ष यांचे आज दुपारी तीन वाजता रिम्स हॉस्पिटल आदिलाबाद येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी उद्या गुरुवार ला अंबाडी ता. किनवट येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे 

श्रीमती नरसाबाई यांना काल अन्न पचनाचा त्रास झाला तेव्हा गावातील एका डॉक्टरनी त्यांना इंजेक्शन दिल्याचे कळते. नरासाआजीस त्रास अचानक वाढल्याने त्यांना किनवट हून आदिलाबाद येथे हलविण्यात आले.आदिलाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्युसमयी त्या ९५ वर्षाचे होत्या.श्रीमती नरसाबाई संदुलवार यांना दोन मुले नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.त्या सेवानिवृत्त वनअधिकारी श्री दासुजी संदुलवार,बालाजी देवस्थानचे सदस्य श्री लक्ष्मण संदुलवार यांचे मातोश्री तर लिंगी येथील सहशिक्षक श्री दत्तात्रय संदुलवाऱ सर,कृषि विभागातील नरेश संदुलवार,व्यंकटी संदुलवार,श्रीकांत संदुलवार यांची आजी होय.श्रीमती नरसांआज्जी यांच्या निधनाने संदुलवार परिवारावर शोककळा पसरला आहे.
*#भावपुर्ण श्रद्धांजली💐🙏🏻*

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

 अंबाडीत एक गाव एक गणपती | Ganeshotsav Festival

अंबाडीत एक गाव एक गणपती | Ganeshotsav Festival

अंबाडीत एक गाव एक गणपती अंतर्गत गणेशोत्सव शांततेत साजरा करा.- पो. नि. अभिमन्यू साळुंके 



किनवट (प्रतिनिधी):-

कोरोना कालावधी ओसरल्यामुळे यंदा ग्रामीण भागात गणेशोस्तव ठिकठिकाणी साजरा करण्यात येत आहे.यावर्षी किनवट पोलिस स्टेशन हद्दिमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.


जानेवारी  2021  ते एप्रिल 2022  मध्ये  मुदत  संपलेल्या,  मुदत संपणाऱ्या,नव्याने स्थापन झालेल्या  ग्रामपचायती  तसेच  मागील  निवडणूकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपचायती अशा किनवट तालुक्यातील एकुण 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषगाने  किनवट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये  गणेशोत्सवामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके हे आपल्या सहकाऱ्यांसह अनेक ठिकाणी गाव भेटी देवून सूचना करीत आहेत.


                दिनांक 1 सप्टेंबर रोजी आपल्या पोलिस स्टेशन अंतर्गत राजगड बिटमधील मौजे कमठाला,नीचपुर,अंबाडी तांडा,राजगड व अंबाडी येथे भेट देवून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून मार्गदर्शन केले.यावेळी अंबाडीचे माजी सरपंच श्री कैलाश सिलमवार यांनी अंबाडी ग्रामस्थाच्यावतीने पोलिस निरीक्षक श्री अभिमन्यू साळुंके साहेब यांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी बिट जमादार श्री पुंडलिकराव बोंडलेवाड यांचेही यावेळी श्री परमेश्वर मुराडवार यांनी सत्कार केला.

          यावेळी पोलीस निरीक्षक श्री साळुंके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबाडीत वास्तव्यास असलेल्या बौद्ध,गोंड, मन्नेरवारलू,परधान,भोई, बेलदार,मातंग,मराठा या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असून गावात एक गाव एक गणपती या संकल्पनेतून शांततेत दरवर्षी बसविणाऱ्या सवारी बंगला येथील बसविलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकार्यासह गावकऱ्यांचे कौतुक करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आपल्या हस्ते सत्कार केले.यावेळी त्यांच्यावतीने गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम आणि मिरवणूक शांततेत व्हावे व कुठलेही गालबोट लागू नये यासाठी सूचना  केल्या. 

           यावेळी अक्षय पंडलवार,गजानन बावणे, जुनघरे,यांच्यासह रामप्रसाद जैस्वाल,सुधीर काळुंके, रवी मुराडवार,अक्षय वानखेडे,पोषट्टी नक्कावार,निलेश कोतापेलिवार,भुमंना मिसालवार,विनोद जोगुलवार आदीं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मंगळवार, मे ११, २०२१

शासनाच्या कृषि विभागाकडून एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ

शासनाच्या कृषि विभागाकडून एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतक-यांना अनेक योजनांचा लाभ





शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक

खबरबात ऑनलाईन वृत्तसेवा नांदेड:-
(बालाजी सिलमवार)
दि. 9 : शेतक-यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता 15 मे पर्यंत अर्ज करायचा आहे.
        शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शिर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतक-यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक / लॅपटॉप / टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा. अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.
आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतक-यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
०००००००

गुरुवार, मे ०६, २०२१

 शिवणी येथे पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

शिवणी येथे पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध




किनवट :(प्रतिनिधी) बालाजी सिलमवार

 पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याच्या निषेधार्थ शिवणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 

 नुकतेच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे.याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. 

 तसे पाहिले तर निवडणुकीत कुणाचे तरी जय-पराजय होतच असतो.पराजय झाला म्हणून निराश व्हायचे नसते तसेच विजय झाल्यानंतर उन्माद करायचा नसतो. परंतु तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्या कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध म्हणून किनवट तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

           आज शिवणीत भाजपचे तालुका सरचिटणीस श्री बालाजी आलेवार यांच्या उपस्थीतीमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कोव्हिड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून भाजपाच्या पदाधिकारी यांना सोबत घेवून श्री आलेवार यांनी तोंडाला काळे मास्क व हाताला काळे रिबीन बांधून आपल्या भावना व्यक्त करून या घटनेचा निषेध करण्यात आला भाजपचे यावेळी भाजपचे श्री बालाजी किशनराव आलेवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते शंकर पटेकर भाजप युवक कार्यकर्ता नागेश बेलयवार युवा कार्यकारणी बुच्यागौड रेड्डीवार,राजू भुसिवाड, पवण कार्लेवांड,रवी मैदेवाड,सूर्यकांत कार्लेवांड,विनोद अनंतवार,श्रीकांत कट्टा,सदानंद रेकुलवाड,विनोद मेंढेवाड,आदी कार्यकर्त्यांनी शिवनीत निषेध व्यक्त केला.

शुक्रवार, एप्रिल ३०, २०२१

तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओचे टॉवर कार्यान्वित

तालुक्यातील शिवणी येथे रिलायन्स जिओचे टॉवर कार्यान्वित


                           

  किनवट प्रतिनिधी :-(बालाजी सिलमवार)

किनवट या आदिवासी तालुक्यातील शिवणी येथे आज दिनांक – ३०/०४/२०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजता RELIANCE JIO टॉवर चे उद्घाटन करण्यात आले.या उद्धाटन समारंभ शिवणी गावचे   ग्रामपंचायतीचे सरपंच  सौ.लक्ष्मीबाई  डूडूळे,उपसरपंच सौ.सुनिता संतोष जाधव,ग्रा.पं.सदस्य दिगांबर बोंदरवाड ग्रामविकास अधिकारी एस.बी.फुलारी महिला मंडळ अध्यक्षा श्री.कमलबाई रामचंद्रराव देशमुख व कृ.उ.बाजार समिती उपसभापती श्री.बालाजी किशनराव आलेवार ग्रा.पं.कर्मचारी दिनेश सायन्ना अष्टपैलू,नागेश गजाराम बेलयवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ग्रामस्थ किशन वानोळे,प्रकाश कार्लेवाड तसेच RELIANCE JIO कर्मचारी उपस्थित होते.
  या अनुषंगाने शिवणी परिसरातील बऱ्याच वर्षापासून इंटरनेट सुविधेच्या प्रतीक्षेत होती.लॉकडाउन काळात शालेय मुलासाठी ONLINE ONLINE CLASSES अशा बऱ्याच अडचणी होत्या,बँकिंग सेक्टर च्या अडचणी होत्या त्या आज दूर झाल्याचे आनंद ग्रामस्थमध्ये दिसून येत आहे त्यामुळे समस्त शिवणी गावातील ग्रामस्तांची अडचणी दूर केल्याबद्धल श्री.मा.मुकेश अंबानी व सुनील गोसावी (महाराष्ट्र CTO) यांना RELIANCERELIANCE JIO टॉवर चालू केल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

सोमवार, एप्रिल २६, २०२१

आदिवासी समाजसेवक काळाच्या पडद्याआड!स्व. सिलमवार काकांना श्रध्दांजली- जिल्हाध्यक्ष पपुलवाड

आदिवासी समाजसेवक काळाच्या पडद्याआड!स्व. सिलमवार काकांना श्रध्दांजली- जिल्हाध्यक्ष पपुलवाड




नांदेड(विशेष प्रतिनिधी):-
नांदेड जिल्ह्यातील आदिवासी मन्नेरवारलू समाजातील प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय विठ्ठलराव सिलमवार काकांना अखिल भारतीय आदिवासी मन्नेरवारलू संघटनेचे जिल्हाअध्यक्ष श्री रावसाहेब पपुलवाड पाटोदेकर यांनी श्रध्दांजली वाहिली.

किनवट तालुक्यांतील अंबाडी येथील मन्नेरवारलू समाजातील धडाडीचे खंबीर नेतृत्व,सर्वाचे आवडते नेतृत्व,आपल्या उतारवयामध्येही किनवट माहूर तालुक्यांतील समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर होते. किनवट तालुक्यामध्ये प्रथमच समाजावर होणाऱ्या अन्यायावर आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या विशाल मोर्चामध्ये श्री विठ्ठलराव सिलमवार काका सहभाग घेतला होता.मला त्याचे आजही काही गोष्टी आठवत आहे की चळवळीची सुरुवात प्रथम आम्ही केली त्यावेळी आपल्या विद्यार्थ्याच्या जात प्रमापत्रासाठी वेळप्रसंगी बलिदानही देऊ म्हणाले.त्यावेळी आमच्या सोबत या लढयामध्ये सिलमवार काका सोबत भांडरवार,अनिल तमडवार,राजू पालेपवाड हे ही होते.काकाच्या निधन झाल्याचे वार्ता कळताच आ.भा.म.स. सं.जिल्हाध्यक्ष श्री पाटोदेकर गुरुजी यांनी आपल्या सहकाऱ्यां समवेत मन्नेरवारलू समाजाचे प्रतिष्ठीत जेष्ठ समाजसेवक श्री विठ्ठलराव सिलमवार काकांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

बुधवार, मार्च २४, २०२१

जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

दिवशी प्रकरणाच्या ऐतिहासिक निकालामुळे मन्नेरवारलू समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनेकडून केले पोलीस प्रशासनाचे कौतुक.



नांदेड ः पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला नांदेडच्या मे. भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी मे.भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली.
भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना २० जानेवारीला घडली होती.
याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव ऊर्फ बाबुराव माळेगावकर उकंडु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर या प्रकरणी मन्नेरवारलू समाज संघटनेस विविध सामाजिक संघटने कडून  मराठवाड्यासह संबंध महाराष्ट्रातून नांदेड,परभणी,सोलापूर,जालना,यवतमाळ,पुणे जिल्हासह औरंगाबादेत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांच्याकडे आदिवासी मन्नेरवारलू समाजातील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जिवे मारणाऱ्या माथेफिरू ला फाशी ची शिक्षेकरिता खूप मोठ्या प्रमाणात निवेदने देण्यात आली व ठिकठिकाणी बाजारपेठे बंद ठेवण्यात आली त्यामुळे या प्रकरणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर,ना.अशोकराव चव्हाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी दिवशी येथे भेट देवून शिक्षेची मागणी केली होती व आदिवासी महासंघाची आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.

 याप्रकरणी भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी वेळेत तपास पूर्ण करून मे.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 
सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. 
फिर्यादी, साक्षीदाराचे साक्ष पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे याआधारे आरोपी बाबुराव माळेगावकर यास ४१ व्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 
या प्रकरणात सरकार तर्फे ॲड.रमेश राजुरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.स्वप्नील कुलकर्णी, अँड सलीम शेख यांनी मदत केली. सदरील निकालानंतर औरंगाबाद येथील मन्नेरवारलू समाजाचे रमेश छबिल्वाड,व्यंकटराव ठक्के,,रमेश मुंडलोड सदाशिव पपुलवार,राजूभाऊ सिलमवार,मारोती निलावाड,बी.जी बोगुलवाड,जवादवाड,सतीश इज्जपवार,शेखर राऊतवार,सत्या तोटावाड, साईनाथ इसानकर,बालाजी,तोटेवाड सर,  कर्णे,सुभाष मुपडे,पडलवार साहेब, हरिनाम कोमलवाड,शुभम माडे,कार्तिक गधपवाड,आईटवार,गोल्लेवार, उस्केमवार रवी कुरेवाड, गणेश सर्कलवाड आदी बांधवासह,संभाजी ब्रिगेडचे अजय कदम,प्रहार चे सतीश बोंतावार तथा विविध सामाजिक संघटनेस दिवशी (बु.) येथील  ग्रामस्थ समाधान व्यक्त करून मे.न्यायालयाचे तथा पोलीस प्रशासनाचे या ऐतिहासिक निकालाबद्धल कौतुक करीत आहेत.

बुधवार, फेब्रुवारी १०, २०२१

पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक

पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक

पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास अटक


नांदेड- तालुका कृषी अधिकारी कार्यालय धर्माबाद जि. नांदेड येथील कृषी पर्यवेक्षक श्री. दीपक शंकरराव हनवते( कोळीकर) वय 57 वर्ष यांनी तक्रारदारा यांना टीबक संच यावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाचेची मागणी करून सापळा कारवाईत पंचांसमक्ष स्वीकारली. ही कारवाई मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.
मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड, श्री. एसएल नितनवरे ला.प्र.वि. नांदेड ACB नांदेड टीम पोना किसन चिंतोरे , हनुमंत बोरकर ,पोकॉ अमरजीत सिंग चौधरी चालक पोना मारोती सोनटक्के यांनी केली.

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०२१

 खून करणाऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने दिड तासात पकडले

खून करणाऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने दिड तासात पकडले



नांदेड:दि.2- शंकर नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात मुंबईच्या लोखंडवाला कॉम्लेक्स मधून 15 वा आरोपी पकडून आणला आहे.खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याने जवळपास 20 लाख रुपये बँक घोटाळ्यातील विविध आरोपीना वळती करून दिले आहेत.


शंकर नागरी सहकारी बँकेचा 14 कोटी 46 लाख रुपयांचा घोटाळा त्यांच्या आयडीबीआय बँकेतील खाते हॅक करून करण्यात आला. याबाबतचा गुन्हा वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहे.या प्रकरणातील सर्वाधिक गुन्हेगार नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहेत.पण पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या कुशल नेतृत्वात बँक घोटाळ्याकडे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,विशेष तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांचेही भरपूर लक्ष आहे.सोबतच नांदेड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि अनेक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मेहनत घेत आहेत. कारण पोलीस विभाग एक टीम वर्कच असते.

या गुन्ह्यात आज पंधरावा गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.जाधव आणि पोलीस कर्मचारी लोखंडे आणि बालाजी केंद्रे यांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधून पकडून आणला आहे. त्याच्याकडे कर्नाटक बँकेचे धनादेश पुस्तक,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड आणि अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे सापडली आहेत.आज सकाळी पकडून आणलेल्या अभिजित अंदानी शेट्टी (45) यास वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बँक घोटाळ्यात पकडलेला हा 15 व्या क्रमांकाचा आरोपी आहे.

नांदेड पोलीस दलातील अनेक पोलीस पथके अद्याप देशातील विविध भागातील राज्यांमध्ये या प्रकरणातील आरोपींचा माग काढत आहेत.289 बँक खात्यांमध्ये बँकेतील रक्कम वळती झालेली आहे.बँकेचे खाते विक्री करण्याचा नवीन प्रकार या गुन्ह्यांमुळे समोर आला आहे.

मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

शेती विरोधी कायद्यांनी हिरावून घेतले शेतकऱ्याचे स्वातंत्र्य

शेती विरोधी कायद्यांनी हिरावून घेतले शेतकऱ्याचे स्वातंत्र्य




प्रा. डॉ. शैलजा बरुरे यांचे किसानपुत्रांच्या शिबिरात प्रतिपादन

नांदेड- प्रतिनिधी
भारतीय शेतकऱ्यांचे स्वतंत्र्यं शेती विरोधी कायद्याने हिरावून घेतले आहे अशा प्रकारचे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ. शैलजा बरुरे यांनी केले .त्या मराठवाडा स्तरीय किसानपुत्र आंदोलनाच्या विभागीय शिबिरांचे उद्घाटन करताना बोलत होत्या. हे शिबीर 14 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या शिबिराचा विषय शेतकरीविरोधी कायदे हा आहे.

प्रा. शैलजा बरुरे म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्था शोषणावर आधारित आहे. भारतीय शेतीला आजही महत्वाचे स्थान मिळत नाही. भारतीय शेतीला भांडवली शेती म्हणून गणले जात नाही. यामुळे शेती विकासामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच सामान्य शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त होते. प्रा. बरुरे यांनी शेती कायद्याचे दुष्परिणाम काय होतात याचा आढावा घेतला. भारतामध्ये सिलिंगचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा व आवश्यक वस्तू कायदा यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा वाईट परिस्थिती मध्ये शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी, महामारी अशा अनेक अडचणीवर मात करून शेती करतो परंतु यामुळे शेती फायदेशीर होत नाही. शेतीच्या समोरील सर्वात महत्त्वाचा अडथळा म्हणजे शेती विरोधी कायदे आहेत. शेतकरी विरोधी कायद्याचे उच्चाटन झाले तरच भारतीय शेती ही भांडवलप्रधान शेती म्हणून करता येईल. अशा प्रकारचे प्रतिपादन प्राध्यापिका डॉ बरूरे यांनी केले.

*सिलिंग कायदा रद्द करा- सुभाष कच्छवे*
या शिबिरामध्ये पहिल्या सत्रात कमाल शेतजमीन धारणा कायदा या विषयावर श्री सुभाष कच्छवे (परभणी) यांनी विचार मांडले. त्यांनी सुरुवातीला सिलिंग कायद्याचा संपूर्णपणे आढावा घेतला. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवर सिलिंगच्या कायद्याचा काय परिणाम होतो याचेही विवेचन केले. सिलिंगच्या कायद्याच्या उच्चाटनामुळे शेतीत व शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फरक पडेल. शेतकऱ्यांची लूट थांबेल. अशा प्रकारचे मत त्यांनी व्यक्त केले. या कमाल शेतजमीन धारणा कायद्याचे उच्चाटन करायचे असेल तर यासाठी संघटितपणे लढा उभा करावा लागेल. जोपर्यंत संघटितपणे लढा उभारला जाणार नाही तोपर्यंत शेतकरीविरोधी कायदे रद्द होणार नाहीत, असा संदेश दिला.

या शिबिराचे आयोजन श्री अंकुश खानसोळे, मयुर बागुल यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय नितीन राठोड यांनी दिला. तांत्रिक सहकार्य अस्लम सय्यद यांनी केले. या शिबिरासाठी मराठवाडा विभागातील विविध भागातील शिबिरार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर अमर हबीब, अनंत देशपांडे व इतर सर्व सन्माननीय व्यक्ती शिबिरासाठी उपस्थित होते.
संकलन- डॉ. विकास सुकाळे (नांदेड)

रविवार, एप्रिल ०५, २०२०

गुरुद्वारा बोर्डातर्फे भव्य घरपोच लंगर सेवा

गुरुद्वारा बोर्डातर्फे भव्य घरपोच लंगर सेवा




नांदेड दि. 5 एप्रिल
कोरोना वायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेने पुढाकार घेतले असून मागील सहा दिवसापासून शहरातील नागरिकांना घरपोच लंगर (अन्न दान ) करण्यात येत आहे. रोज हजारों लोकांना या अन्न दानाचा लाभ मिळत आहे.
नांदेड शहरात सध्या कलम 144 सुरु आहे. लॉक डाउन परिस्थितीत शहर बंद मध्ये नागरिकांना खाण्या पिण्याच्या वस्तूंसाठी लोकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशा वेळी गुरुद्वारा बोर्डाने नेहमी प्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध लंगर तयार करून वाटप सुरु केले आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदर सिंघ मिनहास, उपाध्याय स. गुरविंदर सिंघ बावा यांच्या मार्गदर्शनात  सचिव रविंदर सिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्र सिंघ मोटरावाले, अवतार सिंघ पहरेदार, अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी. पी. सिंघ चावला, कनिष्ठ अधीक्षक रविंद्र सिंघ कपूर  आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी लंगर सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. लंगर तयार करण्यासाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला असून पहाटे चार वाजता पासून जेवण तयार करण्याचे कार्य सुरु होत असून रात्र उशिरा पर्यंत लंगर प्रयत्न सुरु आहे.



लॉकडाऊनमुळे गरीब जनतेचे होत असलेले हाल करावा लागत असलेला अडचनीचा सामना हा खुप भयंकर असुन अनेकांचे हातावर असलेले पोट आज उपाशी आहे..कोनीही उपाशी राहु नये साठी गुरूव्दारा बोर्ड या सारख्या सर्वांसाठी अन्नछत्राचे काम करत आहे.
आपल्या प्रभागातील गरजु लोकांनाही लंगरची सोय व्हावी या हेतुने प्रभाग क्रमांक 10 चे धर्मरक्षक, जनसेवक सुशिलकुमार चव्हाण, मा. नगरसेविका सौ. श्रध्दा चव्हाण यांचे विनंतीवरून  आज पहाटेपासुनच शिवनगर,चंद्रनगर,सखोजीनगर या भागात लंगर सेवा घरपोच देण्यात आली  या वेळी लंगर वाटप करताना  गुरूद्वारा बोर्ड चे सर्व पदाधिकारी सदस्य कर्मचारी तथा धर्मरक्षक जनसेवक सुशिलकुमार चव्हाण, शहरात कुठेही लंगरसेवेची आवश्यकता असेल तर या नंबरवर संपर्क करावा असे अवाहन देवेंद्र सिंघ मोटरवाले यांनी केले आहे. 

8888100073

बुधवार, जून १३, २०१८

मोदींनी निरव मोदी व मेहुल चोक्सिला ३५ हजार कोटी दिले:राहुल गांधी

मोदींनी निरव मोदी व मेहुल चोक्सिला ३५ हजार कोटी दिले:राहुल गांधी

चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी संवाद मेळाव्यात 
राहुल गांधी यांचे वक्तव्य 
नागपूर/प्रतिनिधी:
केंद्रातील मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करतेय.भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार असून गरिबांच्या व सामन्यांच्या सर्व खिश्यातले पैसे हे उद्योग पतींच्या खिश्यात घालत आहेत,आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असून सुद्धा देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.याचा फायदा हा देशातील १०-१५ मोठ्या उद्योगपतींना भाजप सरकार करून देत आहे.देशातील गरीबांचा पैसा घेऊन पळालेले मेहुल चोक्सी व नीरव मोदी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत व दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन परदेशात पळाले.असा घणाघाती आरोप भा.रा.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी तसेच एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांचे सांत्वन करून शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी ते नांदेड या गावी आले होते.
पंतप्रधान मोदींनी नीरव मोदी सारख्या माणसाला ३५ हजार कोटी रुपये दिले यातीलच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधक शेतकरी माणसाला दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती,या 
भागातील युवक त्यांच्या कार्याने प्रेतीत झाला असता.जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा मदत केली पाहिजे, मदत करन्या इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे.असेही ते यावेळी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू,असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले.यावेळी मदत म्हणून खोब्रागडे कुटुंबियांना काँग्रेसतर्फे अडीच लाख वडेट्टीवार यांच्या वतीने देण्यात आले दिले. उद्या पाच लाखांची अधिक मदत दिली जाणार आहे. नरेश पुगलिया यांच्याकडून १ लाख मदत देण्यात आली.
'मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही.आज दररोज पेट्रोलचे दर का वाढताहेत ?, हा एवढा पैसा कुठे जातोय?'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान राहुल गांधी यांचे नांदेड येथे आगमन झाले त्यानंतर ते स्व.दादाजी खोब्रागडे यांच्या घराकडे सभामंडपांकडे प्रस्तान केले.यावेळी एचएमटी वाणाचे संशोधक स्व.दादाजी खोब्रागडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मौन देखील पाळण्यात आला. राहुल गांधी येताच "राहुल गांधी आगे बढो" "हम तुम्हारे साथ है"चे नारे देखील लावण्यात आले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व अ.भा. काँ. कमिटीचे महासचिव अशोक गहलोत ,विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,माजी खासदार नरेश पुगलिया,माजी खासदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार,प्रकाश देवतळे,अविनाश वारजुरकर, खोब्रागडे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
अखेर पुगलिया यांना मिळाला प्रवेश
राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी एकूण ६० जणांची यादी एसपीजी यंत्रानेला देण्यात आली होती.
मात्र सुरक्षेच्या नावाखाली फक्त २२ जणांचीच यादी मंजूर करण्यात आले व सुरक्षेच्या नावाखाली कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष राहुल गांधीयांच्या पासून दूरच ठेवण्यात आले.या ६० नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या यादीत माजी खासदार नरेश पुगलिया व राहुल पुगलिया यांचे देखील नाव होते,अखेर परियंत हे ओळखपत्र त्यांना मिळाले नव्हते अखेर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने पुगलिया यांना प्रवेश मिळाला.
एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केलेल्या वाणाची पाहणी करतांना राहुल गांधी







मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

अपघातात सात ठार

अपघातात सात ठार

लातूर : क्लूजर वाहनाने रस्त्यावर उभारलेल्या आयशर टेम्पोसह समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्लूजर वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार तर तेराजण जखमी झाले आहेत.

लातूर - नांदेड रस्त्यावर लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा (ता. लातूर) गावाजवळील एका पुलाच्या कडेला आज (मंगळवारी) पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला. जखमींवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

नांदेड-नागपूर महामार्गावर कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नांदेड-नागपूर महामार्गावर कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नांदेड- बामणी फाट्याजवळ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 2 खासगी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेडहून येणारी टाटा इंडिका आणि नांदेडच्या दिशेने जाणारी क्रुझर यांची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक नवनाथ नारायण घुगे (वय 44, रा. राशनवाडी ता. चाकूर जि. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इंडिका कारमधील सुरेंद्र शिवाजीराव जवळकर (वय 55, रा. पावडेवाडी, नांदेड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातामध्ये अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पावडेवाडी येथील रहिवाशी नांदेड येथून ऊमरखेडकडे इंडीका कारमधून (एम एच 26, एएफ 0770) जात होते. तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या राशनवाडी येथील काही प्रवाशी वर्धा येथील धनगर समाजाचा मेळावा आटोपून ऊमरखेड-नांदेड मार्गे लातूरच्या दिशेने जात होते. हदगांवपासून 16 किमी अंतरावर असलेल्या बामणी फाट्याजवळ टाटा इंडीका आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक जागीच ठार झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र जवळकर यांना गावकऱ्यांनी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालक काशीनाथ बालाजी शिरगिरे (वय 37, रा गोंडेवाडी ता. लोहा) व क्रुझर जिप मधील राजू कुंडलीक वागलवाडे ( वय 60, रा. राशनवाडी) गंभीर जखमी असून प्रथोमचारानंतर त्यांना उपचारांसाठी नांदेडमध्ये हलवण्यात आले. अपघाताची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.