नांदेड दि. 5 एप्रिल
कोरोना वायरस विरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेने पुढाकार घेतले असून मागील सहा दिवसापासून शहरातील नागरिकांना घरपोच लंगर (अन्न दान ) करण्यात येत आहे. रोज हजारों लोकांना या अन्न दानाचा लाभ मिळत आहे.
नांदेड शहरात सध्या कलम 144 सुरु आहे. लॉक डाउन परिस्थितीत शहर बंद मध्ये नागरिकांना खाण्या पिण्याच्या वस्तूंसाठी लोकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशा वेळी गुरुद्वारा बोर्डाने नेहमी प्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून विविध लंगर तयार करून वाटप सुरु केले आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदर सिंघ मिनहास, उपाध्याय स. गुरविंदर सिंघ बावा यांच्या मार्गदर्शनात सचिव रविंदर सिंघ बुंगाई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्र सिंघ मोटरावाले, अवतार सिंघ पहरेदार, अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी स. डी. पी. सिंघ चावला, कनिष्ठ अधीक्षक रविंद्र सिंघ कपूर आणि इतर अधिकारी तसेच कर्मचारी लंगर सेवेसाठी परिश्रम घेत आहेत. लंगर तयार करण्यासाठी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला असून पहाटे चार वाजता पासून जेवण तयार करण्याचे कार्य सुरु होत असून रात्र उशिरा पर्यंत लंगर प्रयत्न सुरु आहे.
लॉकडाऊनमुळे गरीब जनतेचे होत असलेले हाल करावा लागत असलेला अडचनीचा सामना हा खुप भयंकर असुन अनेकांचे हातावर असलेले पोट आज उपाशी आहे..कोनीही उपाशी राहु नये साठी गुरूव्दारा बोर्ड या सारख्या सर्वांसाठी अन्नछत्राचे काम करत आहे.
आपल्या प्रभागातील गरजु लोकांनाही लंगरची सोय व्हावी या हेतुने प्रभाग क्रमांक 10 चे धर्मरक्षक, जनसेवक सुशिलकुमार चव्हाण, मा. नगरसेविका सौ. श्रध्दा चव्हाण यांचे विनंतीवरून आज पहाटेपासुनच शिवनगर,चंद्रनगर,सखोजीनगर या भागात लंगर सेवा घरपोच देण्यात आली या वेळी लंगर वाटप करताना गुरूद्वारा बोर्ड चे सर्व पदाधिकारी सदस्य कर्मचारी तथा धर्मरक्षक जनसेवक सुशिलकुमार चव्हाण, शहरात कुठेही लंगरसेवेची आवश्यकता असेल तर या नंबरवर संपर्क करावा असे अवाहन देवेंद्र सिंघ मोटरवाले यांनी केले आहे.
8888100073