Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०६, २०२०

महापौर संदीप जोशी यांनी दिवे लावून दिला एकतेचा संदेश




नागपूर, ता. 6 : कोरोनाविरुद्ध लढताना या लढ्यात जे योद्धा म्हणून भूमिका बजावत आहे त्यांचे मनोबल वाढण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासोबत आहे याची जाणीव करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सहकुटुंब दीप प्रज्वलित करून एकतेचा संदेश दिला.

कोरोना विषाणू विरुद्ध नागपूरकर एकत्रित येऊन लढा देत आहेत. संपूर्ण यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकजूट झाली आहे. लॉकडाऊनला प्रतिसाद देत नागरिकही तेवढ्याच जिकरीने लढत आहेत. यादरम्यान जे गरीब व्यक्ती आहेत, मजूर वर्ग आहे, त्यांची काळजी यंत्रणेसोबत अनेक समाजसेवी संस्था, अनेक व्यक्ती घेत आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही काळजी त्यांना चहा, नाश्ता देत अनेक संस्था घेत आहेत. या सर्व लढाईत नागपूरकर संपूर्ण ताकदीने एकत्रित आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपूरकरांनी दिवे लावून आसमंत उजळला. याबददल सर्व नागपूकरांचे आभार मानतो, या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी दीपपर्वावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्वगृही सहकुटुंब दिवे लावून प्रकाशपर्वात सहभाग घेतला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.