Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०५, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटोदा येथे शेतमजुरांना मास्कचे वाटप!





येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला, ता. ०५ : तालुक्यातील पाटोदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवजयंती उत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी गाव-मळ्यात जाऊन कष्टकरी, शेतकरी-शेतमजूरांना मास्कचे मोफत वितरण केले. शिवजयंती उत्सव समिती प्रमुख जगदीश बोराडे आणि सहकारी सागर बैरागी, श्रीनिवास बोनाटे, गणेश बोराडे, प्रताप पाचपुते, गणेश बैरागी, ऋषी जाधव, पप्पू शेटे, महेश शेटे, सुनील बोराडे, गणेश पिंपरकर, योगेश जाधव, लहू पवार, अंगुर मुलानी, सुनील पाचपुते, सचिन म्हस्के, गोकुळ राजगुरू, लखन पगारे, पापा चौधरी, संजय जाधव आदींनी गाव परिसरातील ८०० कष्टकरी, गोरगरीबांना घरोघरी व मळ्यात जावून मास्क वाटप केले. सामाजिक जाणीवेतून हा उपक्र म राबविण्यात आला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.