मूल : प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रार्दुभावा मुळे संपूर्ण देशातील अत्यावश्यक सुविधा सोडले तर इतर वाहतूक व्यवस्था बदं करण्यात आली आहे.दवाखान्यात अॅम्बलस असले तरी कोरोनाच्या परीस्थीतीत वाहनाची गरज भासत असल्याने याचाच विचार
करून मुल येथील श्री साई मित्र परिवार व संघर्ष गुप यांच्या संयुक्त
विद्यमाने गरजू रूग्णांना जिल्हा रूग्णालयात रूग्णांना जाणे—येणे
करण्याकरीता या संस्थेने पुढाकार घेवून गाडी भाडा न घेता सामजिक बांधीलकी जोपासत रूग्णाकरीता रूग्ण हीच ईश्वर सेवा हे ब्रिद वाक्य लक्षा घेवून सोय करण्यात आली आहे. उपक्रमाची सुरूवात
लहान बालकाला चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात दि 5 एप्रिलला नेण्यात आले. मुल शहरामध्ये हि संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवित असते.
सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दहशत असल्याने आपत्तीकाळात गरीब रूग्णानाकरीता गाडीची सोय उपलब्ध करून दिल्याने श्री साई मित्र परिवार व संघर्ष गुप यांचे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
श्री साई मित्र परिवार व संघर्ष गृप मूल चे सदस्य पंकज महाजनवार व विवेक मृत्यलवार यांनी आपले वाहन 14 एप्रिल पर्यंत सेवा देणार असल्याचे
सांगिेतले आहे.यासाठी गरजू व आर्थीक दुर्बल घटक वर्गातील नागरीकांनी 9067700767,7588549744 या भ्रमणध्वनी क्रमांकावर
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.