Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०५, २०२०

नागपूरने फोडला दिल्लीला घाम....





महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डाँ. नितीन राऊत .मंत्री उच्चशिक्षित व अभ्यासू असला की काय करू शकते. त्यांची प्रचिती आली. जेवढे राज्य तेवढे ऊर्जा मंत्री. मात्र संधी घेतली महाराष्ट्राने. विषय होता. ५ एप्रिल , रात्री ९ वाजताचा. तेव्हा ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करा . हे आवाहन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केले. हेतू चांगला असेल. मात्र या एका तांत्रिक चुकीने पाँवरग्रीड फेल होईल. वीज निर्मिती केंद्रांमध्ये बिघाड होईल. वीज पुरवठा ठप्प होईल. कोणी लिफ्टमध्ये अडेल. कोणाचा व्हन्टिलेटर बंद पडेल. अनहोनी घडेल. त्यास जबाबदार कोण राहिल? अशी विचारणा केली. प्रश्न मुद्द्याचा होता.अनेकांच्या प्राणाचा होता. राष्ट्रीय हानीचा होता. नागपूरवरून सुटलेला हा नितीनचा उध्दव बाण अचूक लागला. त्याने पीएम कार्यालयाचा वेध घेतला होता.

या बाणाने दिल्ली घामाघुम झाली. पंतप्रधान कार्यालय चक्रावले. गरगर फिरू लागले. किती वेळ फिरत राहिले. ही चर्चा वेगळीच. लगेच फोनाफोनी सुरू झाली. पाँवरग्रीड अधिकाऱ्यांची मोबाईल काँन्फ्ररन्स बोलावली. कमी-उच्चदाबाने वीज प्रवाह खंडित होणार काय? पलिकडून उत्त्तर आले होय. धोका होवू शकतो. सारेच उडाले. मात्र त्यातून मार्ग काढावे लागेल. आम्ही बघून घेवू. अडथळे टाळू. सहकार्य लागेल. काही वीज केंद्रांचे वीज उत्पादन बंद करावे लागेल. थोडी राष्ट्रीय हानी होईल. यातून मोठे संकट टळेल. निर्णय कडू व कटू आहे. पण आता इलाज नाही. आता माघार नाही. काही पथ्थे पाळावीच लागतील. हे एेकल्यावर सर्वांचा जीव भाड्यात पडला. लगेच ही पथ्थे पाळा. यादी तयार झाली. सर्व राज्यांना गेली. त्यामध्ये सांगितले. केवळ घरातीलच दिवे बंद करा. पथदिवे, ए.सी., टीव्ही, फ्रिज व अन्य उपकरणे बंद करू नका. हे आता वारंवार सांगण्यात येते.

दिल्ली सरकारचा रक्तदाब वाढला आहे. इंव्हेट संपेपर्यंत कायम राहील. आता प्रतीक्षा आहे. आज रात्री ९ वाजून १० मिनिटं केव्हा वाजतात. या घड्याळाच्या काट्याकडे . तो पर्यंत धाकधुक कायम आहे. या घटनेने दिल्लीला मोठा धक्का दिला. इतिहासात पहिल्यादा असे घडले असावे. मला अभिमान आहे नागपुरचा. अभिमान आहे, त्या नागपुरी निर्भिडतेचा. ज्याने अगोदर सामन्य माणसाचा ,त्याच्या अडचणीचा , राष्ट्रीय संपत्तीच्या हानीचा विचार करा. मगच पुढचे पाऊल टाका असे बजावले. लोकहितासाठी सातपुडा उभा ठाकला दिल्लीपुढे. रात्री बटन बंद करणाऱ्यांना आठवतील नितीन राऊत. आवाज घुमेल सावधान. जरा संभलके.....!

असेच वागा. ताठ राहा. आणखी ऊर्जावान बना.


- भूपेंन्द्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.