Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०५, २०२०

कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा जागीच मृत्यू



नाशिक/ प्रतिनिधी
येवला तालुक्यातील ममदापुर येथे डी. पी. नाल्याजवळ कुत्र्याच्या तावडीत सापडून हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आज साडेचार वाजेच्या सुमारास ममदापुर येथील गोराणे यांच्या शेतात गिडगे वस्ती ममदापुर डी.पी. नाला रोड लगत हरणाच्या मादी जातीच्या हरणावर दोन कुत्र्यांनी अचानक हल्ला केलाय.
हरीण आपली भूक भागवत असतांना कुत्र्याच्या कचाट्यात सापडलं आणि हरीण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले माञ दोघा कुत्र्यांच्या कचाट्यात ते सापडल्यामुळे हरीण मोठया प्रमाणात जखमी झाले होते. सदर घटना जनार्दन साबळे , राजाराम गिडगे यांच्या लक्षात आल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन बघितलं तर हरीण मृत्यूच्या घडीला जाऊन पोहचले होते..त्यांनी हरणाला पाणी पाजले परंतु कुत्र्यांनी चांगलंच घायाळ केलेलं असल्यामुळे हरणाचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती वनरक्षक पोपट वाघ यांना कळवली असता ते आपल्या वन कर्मचारी मनोहर दाणे,दत्तू गोसावी यांच्यासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

प्रतिनिधी : विजय खैरनार,येवला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.