निफन्द्रा-प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या पालेबारसा येथील इंदिरा गांधी विद्यालयातील वर्ग 5 ते 8 वि मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरूना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत .सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ ,डाळ ,मटकी विद्यार्थ्यांना समप्रमाणात वितरीत करण्याच्या सूचना केल्या होत्या .त्या अनुषंगाने शाळेत शिक्षण घेणाऱ्या मंगरमेंढा,जनकापुर ,ऊसरपार, सावंगी इत्यादी गावातिल विद्यार्थ्यांचे गावात जाऊन घरपोच वितरित करण्यात आले. स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेतच धान्य वितरित करण्यात आले. धान्य वितरित करताना सोशल डिस्टनसिंग के अनुपालन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. के .ए. शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली प्राचार्य विलास लोखंडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन करून धान्य वितरीत केले.यावेळी प्रत्येक गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे पालक सदस्य, पोलीस पाटील व पालक उपस्थित होते. बाहेर गावातील विद्यार्थ्यांना घरपोच धान्य पुरवल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.