Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

अंबाडीत एक गाव एक गणपती | Ganeshotsav Festival

अंबाडीत एक गाव एक गणपती अंतर्गत गणेशोत्सव शांततेत साजरा करा.- पो. नि. अभिमन्यू साळुंके 



किनवट (प्रतिनिधी):-

कोरोना कालावधी ओसरल्यामुळे यंदा ग्रामीण भागात गणेशोस्तव ठिकठिकाणी साजरा करण्यात येत आहे.यावर्षी किनवट पोलिस स्टेशन हद्दिमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.


जानेवारी  2021  ते एप्रिल 2022  मध्ये  मुदत  संपलेल्या,  मुदत संपणाऱ्या,नव्याने स्थापन झालेल्या  ग्रामपचायती  तसेच  मागील  निवडणूकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपचायती अशा किनवट तालुक्यातील एकुण 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषगाने  किनवट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये  गणेशोत्सवामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके हे आपल्या सहकाऱ्यांसह अनेक ठिकाणी गाव भेटी देवून सूचना करीत आहेत.


                दिनांक 1 सप्टेंबर रोजी आपल्या पोलिस स्टेशन अंतर्गत राजगड बिटमधील मौजे कमठाला,नीचपुर,अंबाडी तांडा,राजगड व अंबाडी येथे भेट देवून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून मार्गदर्शन केले.यावेळी अंबाडीचे माजी सरपंच श्री कैलाश सिलमवार यांनी अंबाडी ग्रामस्थाच्यावतीने पोलिस निरीक्षक श्री अभिमन्यू साळुंके साहेब यांचे शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी बिट जमादार श्री पुंडलिकराव बोंडलेवाड यांचेही यावेळी श्री परमेश्वर मुराडवार यांनी सत्कार केला.

          यावेळी पोलीस निरीक्षक श्री साळुंके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबाडीत वास्तव्यास असलेल्या बौद्ध,गोंड, मन्नेरवारलू,परधान,भोई, बेलदार,मातंग,मराठा या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असून गावात एक गाव एक गणपती या संकल्पनेतून शांततेत दरवर्षी बसविणाऱ्या सवारी बंगला येथील बसविलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकार्यासह गावकऱ्यांचे कौतुक करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आपल्या हस्ते सत्कार केले.यावेळी त्यांच्यावतीने गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम आणि मिरवणूक शांततेत व्हावे व कुठलेही गालबोट लागू नये यासाठी सूचना  केल्या. 

           यावेळी अक्षय पंडलवार,गजानन बावणे, जुनघरे,यांच्यासह रामप्रसाद जैस्वाल,सुधीर काळुंके, रवी मुराडवार,अक्षय वानखेडे,पोषट्टी नक्कावार,निलेश कोतापेलिवार,भुमंना मिसालवार,विनोद जोगुलवार आदीं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.