चंद्रपूर- अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व ईतर पांरपारीक निवासी वनहक्क अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अन्वये कलम ३ (1) अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील नागाळा ग्रामपंचायत अंतर्गत महादवाडी गावाला वनहक्काचे अधिकार प्राप्त झाले. त्या अनुषंगाने सामूहिक वनहक्क अधिकार प्राप्त 81.04 हेक्टर क्षेत्राचे सीमांकन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात संवर्ग विकास अधिकारी ,चंद्रपूर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, वनहक्क जिल्हा समन्वयक चंद्रपूर,वनहक्क तालुका समन्वयक चंद्रपूर, वन विभागाचे अधिकारी ,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधिकारी, सरपंच , सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समिती महादवाडी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थचे संशोधन अधिकारी व गावकरी उपस्थित होते. यावेळी सामुहिक वनहक्क क्षेत्रात मनरेगा अंतर्गत घ्यावयाची कामे याची देखील चंद्रपूर मनरेगा टीम कडून पडताळणी करण्यात आली.
महादवाडी गावाला वनहक्काचे अधिकार प्राप्त | Zilla Parishad Chandrapur @ChandrapurZilla
Zilla Parishad Chandrapur
@ChandrapurZilla