*चंद्रपूर:-* धनराज कोवे मित्रपरिवार मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व परिवार विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 ला दुपारी 12-00 वा. पासून ते दुपारी 4-00 वाजेपर्यंत निशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर जानव्ही मेडिकल इंदिरानगर मूल रोड, चंद्रपूर येथील जय बजरंग बली बाल गणेश मंडळाच्या पेंडाल मध्ये होत आहे. शिबिराचे उदघाटन श्री. दिनकरजी सोमलकर असून प्रमुख अतिथी श्री. राजेशजी सोलपन,श्री. बन्सीधर तिवारी,डॉ. गिरधरजी येडे राहणार आहेत. शिबिरात स्त्रीरोग, अस्थिरोग,बालरोग, जनरल तपासणी, दंतचिकित्सा,त्वचारोग व बीपी या सर्व प्रकारच्या रोगाची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. शिबिरासाठी महानगरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. माधुरी मानवटकर- जनरल सर्जन, डॉ. उल्हास बोरकर- अस्थिरोग तज्ञ, डॉ. शैलेश वांदिले- बालरोग तज्ञ,डॉ. निश्चिता मॅडम- जनरल फिजिशियन,डॉ. दीपक चव्हाण- दंतरोग तज्ञ, डॉ. विना बनसोडे- त्वचारोग तज्ञ यांची उपस्थिती लाभणार आहे. तेव्हा इंदिरानगर, संजय नगर, कृष्ण नगर परिसरातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून होणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे आयोजक- धनराज कोवे, संयोजक- रुद्रनारायण तिवारी, पप्पू बोपचे,प्रलय सरकार,संजय पटले, डॉ. उजेश देशमुख, माजी नगरसेविका सौ.चंद्रकला सोयम,सौ. जयश्री जुमडे,सौ.वंदना जांभूळकर,जय बजरंग बली समिती चे अध्यक्ष बबनजी कोसरे,सौ.रेखा मडावी,सौ.नीलिमा आत्राम,सौ.वर्षां सोमलकर,अनिल मंचर्लवार,गजू राऊत, अमोल चांदेकर, रोहित मडावी,विनय मडावी यांनी केले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments