Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०६, २०२१

शिवणी येथे पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध




किनवट :(प्रतिनिधी) बालाजी सिलमवार

 पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्याच्या निषेधार्थ शिवणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 

 नुकतेच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळविलेला आहे.याबद्दल मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. 

 तसे पाहिले तर निवडणुकीत कुणाचे तरी जय-पराजय होतच असतो.पराजय झाला म्हणून निराश व्हायचे नसते तसेच विजय झाल्यानंतर उन्माद करायचा नसतो. परंतु तृणमूल काँग्रेसच्या पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजपच्या पाठीराख्या कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध म्हणून किनवट तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

           आज शिवणीत भाजपचे तालुका सरचिटणीस श्री बालाजी आलेवार यांच्या उपस्थीतीमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कोव्हिड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून भाजपाच्या पदाधिकारी यांना सोबत घेवून श्री आलेवार यांनी तोंडाला काळे मास्क व हाताला काळे रिबीन बांधून आपल्या भावना व्यक्त करून या घटनेचा निषेध करण्यात आला भाजपचे यावेळी भाजपचे श्री बालाजी किशनराव आलेवार यांच्यासह भाजपा कार्यकर्ते शंकर पटेकर भाजप युवक कार्यकर्ता नागेश बेलयवार युवा कार्यकारणी बुच्यागौड रेड्डीवार,राजू भुसिवाड, पवण कार्लेवांड,रवी मैदेवाड,सूर्यकांत कार्लेवांड,विनोद अनंतवार,श्रीकांत कट्टा,सदानंद रेकुलवाड,विनोद मेंढेवाड,आदी कार्यकर्त्यांनी शिवनीत निषेध व्यक्त केला.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.