Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०५, २०२१

असा मिळवा प्रवासासाठी ई-पास

 


 असा मिळवा प्रवासासाठी ई-पास 

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक कामाच्या प्रवासासाठी ई-पास (E-Pass) प्रणाली आहे. covid19.mhpolice.in या पोर्टलवर ई-पास मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. पोलीस विभागाकडून आवेदनात दिलेल्या कारणाची खात्री करून प्रवासासाठी ई-पास देण्यात येईल.

ई पास काढण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पाससाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचे आहे की नाही यावर क्लिक करा.

१-जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा २- तुमचे संपूर्ण नाव नोंद करा ३- प्रवास कोणत्या तारखेपासून ते कित तारखेपर्यत करणार ते नमूद करा. ४- मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तरपणे नोंद करा. ५-वाहनाचा प्रकार, नोंदणी क्रमांक,सध्याचा पत्ता,आणि ई-मेल नोंद करा
६- प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा ७-आपण कटेंनमेंट झोनमधील आहात का याविषयी माहिती सादर करा ८- परतीचा प्रवास याच मार्गाने करणार का हे नमूद करा. ९- २०० केबीपेक्षा लहान साईजचा पासपोर्ट फोटो अपलोड करा, सर्व माहिती चेक करून अर्ज सादर करा

ई पाससाठी वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा. ई -पास काढण्याबाबत शहरात परिमंडळ निहाय पोलीस कर्मचारी व त्यांचे मोबाईल नंबर दिले आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.