किल्ले शिवनेरी वर सापडले ऐतिहासिक दगडी तोफगोळे
जुन्नर /आनंद कांबळे
वनपरीक्षेत्र जुन्नर मधील वनरक्षक रमेश खरमाळे (माजी सैनिक) व वनरक्षक नारायण राठोड यांना रोपवन फिरती दरम्यान किल्ले शिवनेरी वर ४.२ किलो ग्रॅम वजनाचे व ४५ से.मी गोलाई असलेले तीन तोफगोळे निदर्शनास पडले. जमीनीवर गोलाकार दगड गाडलेला दिसुन आल्याने रमेश खरमाळे यांनी तो मातीतून बाहेर काढल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की हे तोफगोळे असावेत. किल्ले शिवनेरी वर तोफा नसल्याने ते संभ्रमात होते त्यांनी याबाबत इतिहास अभ्यासक विनायक खोत यांच्याशी what's up व्हिडिओ काॅलवर संपर्क करुन खात्री केली असता ते तोफगोळे असल्याची खात्री पटली व किल्ले शिवनेरीच्या ऐतिहासिक वारसेत ही खूप मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. तसेच याचा अर्थ कदाचित येणाऱ्या काळात किल्ले शिवनेरी वरील गाडलेल्या पाण्याच्या टाक्यांत निश्चितच तोफा सापडतील असे मत विनायक खोत यांनी व्यक्त केले. किल्ले शिवनेरी वर उभारण्यात येत असलेल्या वस्तू संग्रहालयात या तोफगोळ्यांची पर्यटकांना पाहण्यासाठी नक्कीच भर पडेल.