सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा - आमदार सुधीर मुनगंटीवार
मनपाच्या वतीने छत्रपतीनगर येथे वृक्षारोपण
चंद्रपूर, ता. १ : आईचे कर्ज जन्मभर सेवा करूनही फेडता येत नाही. मात्र, निरोगी जीवन जगायचे असेल तर वसुंधरेचे ऋण फेडले पाहिजे. सृष्टीला जगविण्यासाठी आधी वृक्षांना जगवा, असे प्रतिपादन लोकलेखा समिती अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने एकता गणेश मंडळ, छत्रपती नगर, शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ येथील बगिच्यात १ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमदार सुधीर मुनंगटीवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार होत्या. याप्रसंगी मंचावर उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदिप आवारी, भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंद्रकलाताई सोयाम, उपसभापती पुष्पाताई उराडे, शास्त्री नगर प्रभाग क्र. २चे नगरसेवक सोपान वायकर, नगरसेविका वनिता डुकरे, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेवक सुरेश पचारे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपतीनगर येथील महिला आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षदिंडी काढली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वडाच्या झाडाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व लोकांना कळले. अनेकांना ऑक्सिजन विकत घ्यावे लागले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. सृष्टीला विकसित करण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी हातभार लावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी वृक्ष आणि निसर्गाचे महत्व विषद करताना पौराणिक कथा आणि पूजेतील पुष्प, वेल, पाने आणि गवत यांचे उदाहरण दिले. पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरायचे नसेल तर आजच वृक्ष लावून त्यांचे संगोपन करा, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कडुलिंब, करंजी जांभूळ, सप्तपर्णी, शीशम आदी वृक्षांच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले. मागील वर्षी याच दिवशी लागवड केलेल्या वृक्षांना एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घेणारे मधुकर आडपवार, ज्येष्ठ नागरिक रामरतन गाताडे, गौरीशंकर धामणकर, बबनराव असुटकर, श्रावण नन्नावरे, रामभाऊ बोरसरे, सुरेश निरंजने, धनंजय दिंगलवार, पंडितराव घुमडे, रामराम हरडे, उषाताई मेश्राम, सुरेश भोयर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका माया उईके, नगरसेविका शीला चव्हाण, सुनील डोंगरे, चंदन पाल, रवी गुरनुले, रामपाल सिंग, प्रकाश धारणे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे यांनी, तर शिक्षिका स्वाती बेत्तावार यांनी केले.