दिवशी प्रकरणाच्या ऐतिहासिक निकालामुळे मन्नेरवारलू समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनेकडून केले पोलीस प्रशासनाचे कौतुक.
नांदेड ः पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीला नांदेडच्या मे. भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी मे.भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली.
भोकर तालुक्यातील दिवशी (बु.) येथे एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना २० जानेवारीला घडली होती.
याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव ऊर्फ बाबुराव माळेगावकर उकंडु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर या प्रकरणी मन्नेरवारलू समाज संघटनेस विविध सामाजिक संघटने कडून मराठवाड्यासह संबंध महाराष्ट्रातून नांदेड,परभणी,सोलापूर,जालना,यवतमाळ,पुणे जिल्हासह औरंगाबादेत जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,गृहमंत्री यांच्याकडे आदिवासी मन्नेरवारलू समाजातील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जिवे मारणाऱ्या माथेफिरू ला फाशी ची शिक्षेकरिता खूप मोठ्या प्रमाणात निवेदने देण्यात आली व ठिकठिकाणी बाजारपेठे बंद ठेवण्यात आली त्यामुळे या प्रकरणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर,ना.अशोकराव चव्हाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी दिवशी येथे भेट देवून शिक्षेची मागणी केली होती व आदिवासी महासंघाची आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.
याप्रकरणी भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी वेळेत तपास पूर्ण करून मे.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले.
फिर्यादी, साक्षीदाराचे साक्ष पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरूद्ध सबळ पुरावे याआधारे आरोपी बाबुराव माळेगावकर यास ४१ व्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात सरकार तर्फे ॲड.रमेश राजुरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.स्वप्नील कुलकर्णी, अँड सलीम शेख यांनी मदत केली. सदरील निकालानंतर औरंगाबाद येथील मन्नेरवारलू समाजाचे रमेश छबिल्वाड,व्यंकटराव ठक्के,,रमेश मुंडलोड सदाशिव पपुलवार,राजूभाऊ सिलमवार,मारोती निलावाड,बी.जी बोगुलवाड,जवादवाड,सतीश इज्जपवार,शेखर राऊतवार,सत्या तोटावाड, साईनाथ इसानकर,बालाजी,तोटेवाड सर, कर्णे,सुभाष मुपडे,पडलवार साहेब, हरिनाम कोमलवाड,शुभम माडे,कार्तिक गधपवाड,आईटवार,गोल्लेवार, उस्केमवार रवी कुरेवाड, गणेश सर्कलवाड आदी बांधवासह,संभाजी ब्रिगेडचे अजय कदम,प्रहार चे सतीश बोंतावार तथा विविध सामाजिक संघटनेस दिवशी (बु.) येथील ग्रामस्थ समाधान व्यक्त करून मे.न्यायालयाचे तथा पोलीस प्रशासनाचे या ऐतिहासिक निकालाबद्धल कौतुक करीत आहेत.