Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

नांदेड-नागपूर महामार्गावर कार-क्रुझरची समोरासमोर धडक; 2 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नांदेड- बामणी फाट्याजवळ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 2 खासगी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेडहून येणारी टाटा इंडिका आणि नांदेडच्या दिशेने जाणारी क्रुझर यांची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक नवनाथ नारायण घुगे (वय 44, रा. राशनवाडी ता. चाकूर जि. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इंडिका कारमधील सुरेंद्र शिवाजीराव जवळकर (वय 55, रा. पावडेवाडी, नांदेड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातामध्ये अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पावडेवाडी येथील रहिवाशी नांदेड येथून ऊमरखेडकडे इंडीका कारमधून (एम एच 26, एएफ 0770) जात होते. तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या राशनवाडी येथील काही प्रवाशी वर्धा येथील धनगर समाजाचा मेळावा आटोपून ऊमरखेड-नांदेड मार्गे लातूरच्या दिशेने जात होते. हदगांवपासून 16 किमी अंतरावर असलेल्या बामणी फाट्याजवळ टाटा इंडीका आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझरचा चालक जागीच ठार झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र जवळकर यांना गावकऱ्यांनी प्राथमिक रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कार चालक काशीनाथ बालाजी शिरगिरे (वय 37, रा गोंडेवाडी ता. लोहा) व क्रुझर जिप मधील राजू कुंडलीक वागलवाडे ( वय 60, रा. राशनवाडी) गंभीर जखमी असून प्रथोमचारानंतर त्यांना उपचारांसाठी नांदेडमध्ये हलवण्यात आले. अपघाताची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.