Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कारंजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कारंजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जानेवारी १९, २०२०

भाजपा कारंजा तालुका अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर

भाजपा कारंजा तालुका अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर

कारंजा (घा):- 

              भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकीच्या वतीने कारंजा तालुका व शहर तर्फे चरडे मंगल कार्यालय येथे सभा पार पडली. या निवडणुकीमध्ये पर्यवेक्षक म्हणून माजी खासदार विजय मुडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दादाराव केचे, कारंजा पं.स.चे सभापती जगदिश डोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे व प.स.सभापती जगदिश डोळे यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            या निवडणुक प्रक्रियेमध्ये कारंजा तालुका भाजपा अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी प्रामुख्याने शिरीष भांगे,हरिभाऊ जसुतकर,जि.प.सदस्य सुरेश खवशी,रेवता धोटे,नीता गजाम,माजी सभापती मंगेश खवशी,पं.स.सदस्य रंजना टिपले,रोशनी ढोबाळे, आम्रपाली बागडे,नगरसेवक संजय कदम,बाळू भांगे,काकडे,निसार,त्याचप्रमाणे किशोर भांगे,राजू डोंगरे,सुनील वंजारी,तेजराव बंनगरे,गौरी अग्रवाल,बाबा मानमोडे,विशाल भांगे,चक्रधर डोंगरे,वसंता भांगे,शिवम कुरडा,निखिल धंडारे राणा बावरी यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुवार, ऑक्टोबर १७, २०१९

वर्धा:तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा:तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)

गवंडी येथील तरुण शेतकरी उमेश दौलतराव धोटे वय ३४ वर्षे या शेतकऱ्याने आज दि. १७/१०/२०१९ ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मृतक शेतकरीवर बँक चे अंदाजे ३ लाख रु कर्ज होते असे समजते. मृतकाच्या नावावर ९ ते १० एकर शेती आहे. आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीही नव्हते पत्नी लहान मुलाला घेऊन कारंजा येथे दवाखान्यात आली होती. तर म्हातारे आई आणि वडील शेतात गेले होते. 

मृतकाच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या हेमराज आटनेकर हे मृतकाच्या घरी शेती उपयोगी साहित्य मागण्या करीता गेले असता त्यांना मृतक उमेश धोटे फासावर लटकलेला दिसला. त्या बद्दल ची माहिती गवंडी येथील पुलिस पाटील पंकज धारपुरे यांना दिली असता घटनेची माहिती पोलीस ठाणे कारंजा यांना दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश साहेर करीत आहे.

शुक्रवार, जुलै १२, २०१९

सनशाईन स्कुल कारंजा ने केली सिडबॉल उपक्रमास सुरुवात

सनशाईन स्कुल कारंजा ने केली सिडबॉल उपक्रमास सुरुवात

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):




स्थानिक मनुविद्या सामाजिक संस्था द्वारा संचालित सनशाईन स्कुल कारंजा मध्ये विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक गुण विकसित व्हावे करिता विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचीच प्रचिती आज कारंजा वासीयांना सिडबॉल उपक्रम शुभारंभातुन आली. 



झाडे लावल्यानंतर त्यांचे संवर्धन करणे कठीण कार्य असते म्हणून संस्थाध्यक्ष प्रेम महिले  व सचिव विजय ठाकरे यांचे कल्पनेतून विद्यार्थी यांचे पर्यावरणाशी नाते जुळावे करिता माती व खत याचे मिश्रण करून त्यात कडू निंबाच्या बिया टाकण्यात आल्या व साधारणतः शालेय विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्याने 2000 सिड बॉल तयार करण्यात आले आणि संस्थाध्यक्ष प्रेम महिले यांचे वाढदिवसाचे निमित्य शाळे लगतच वनविभागाच्या जागेत सदर बॉल टाकण्यात आले पाणी येताच सदर बियांना अंकुर येवून त्याची मुळे जमिनीत रोवली जातात.

  या उपक्रमात बियाणे वनविभागात कार्यरत निशिकांत कापगते यांनी बिया पुरविल्या तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सिड बॉल चे महत्व विषद करण्यात आले तसेच त्यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर घरी तयार करावे आणि वाढदिवसाची भेट म्हणून प्रत्येक विदयार्थ्यांनी कमीत कमी 20 बॉल तयार करावे जेणेकरून 8 ते 9 हजार सिडबॉल्स तयार होतील  असे आव्हान प्रेम महिले यांनी केले. 

हा उपक्रम नसून एक चळवळ आहे आणि विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या शैक्षणिक कार्यासोबतच या चळवळीत सहभागी व्हावे त्याचबरोबर आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापिका संगीता चाफले, शिक्षक पवन ठाकरे, हेमंत बन्नगरे, शालीनि गोरे, ममता दिवाणे व सर्व शिक्षक शिक्षिका वृद्ध उपस्थित होते.

शुक्रवार, जून १४, २०१९

कारंजात शॉर्टसर्किट ने लागली दोन घराला आग

कारंजात शॉर्टसर्किट ने लागली दोन घराला आग

कारंजा(घा)उमेश तिवारी:

वेळीच लक्षात आल्याने मोठी घटना टळली

 आर्वी विधानसभेचे आमदार अमर काळे व कारंजा नगरपंचायतचे उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, नगरसेवक नरेश चाफले घटनास्थळी मदतीला आले धावून. 

 - कारंजा येथील दोन घरांना अचानक शॉट सर्किटने आग लागल्याने घराचे साहित्य जळाले. वेळीच आग लागल्याच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.शेषराव आमझिरे व बंडू आमझिरे यां दोघांच्या घराला संध्याकाळच्या सुमारास आग लागली.

या वेळी घरातील सर्व सदस्य हजर होते.आगीत घरातील कपडे , जीवनावश्यक साहित्यसह घरातील काही सामान जळाले.परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विजवली.

बुधवार, जून १२, २०१९

माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश

माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश

कारंजा-आष्टीला प्रत्येकी २ कोटी रुपये प्राप्त
उमेश तिवारी/कारंजा (घा):


माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांतून कारंजा आणि आष्टी शहरांच्या विकासासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून प्राप्त झाले आहेत. आष्टी आणि कारंजा नगरपंचायत मध्ये सत्ता नसतांनाही नगरसेवकांच्या आणि स्थानिकांच्या विनंतीला मान देत माजी आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक २०/०८ /२०१८ रोजी आष्टी आणि कारंजा नगरपरिषद करीता प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे मागणी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १८ /९ /२०१८ रोजीचे रणजित पाटील यांनी पत्र दिले.

यातूनच आष्टी आणि कारंजा नगरपंचायत करीता प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कारंजा शहराच्या १७ वार्ड मध्ये व आष्टी शहरांच्या वार्ड मध्ये विकास कामे होणार आहेत. यासाठी आष्टी नगरपरिषदचे सदस्य मनिष ठोंबरे, अशोक विजेकर, अजय लेकूरवाडे, सुरेश काळपांडे, वंदना दारोकार, विमल दारोकार, प्रमोद गुप्ता (स्विकृत सदस्य) तसेच कारंजा नगरपंचायतचे सदस्य संजय कदम, शेख निसार, निता काकडे यांच्या मागणीला प्रत्यक्षरूपात दादाराव केचे यांनी उतरवले. दिनांक १६ /०६ /२०१९ रोजी कारंजा येथील विकास कामांचे भूमिपूजन दादाराव केचे यांच्या हस्ते तथा रामदास तडस खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना दादाराव केचे यांनी सांगितले की, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे नगरपरिषदवर जरी सत्ता नसली तरी कारंजा आणि आष्टीत राहणारी जनता माझी आहे. त्याच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत आहे असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याचे मंत्री रणजित पाटील यांचे आभार मानले.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध

शनिवार, मे २५, २०१९

संवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास

संवेदना युवा मंच ने घेतला जल-संधारणाचा ध्यास

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असलेल्या पाणी फाउंडेशन च्या वाॅटर कप स्पर्धेच्या धरतीवर कारंजा शहरात सुद्धा पाणी प्रश्न मिटावा यासाठी जलसंधारणाचं काम करण्याचं या ग्रुप ने ठरवलं. आणि कारंजा चे ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी च्या पर्वावर 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या मोहिमेला सुरुवात केली.

सध्या संपुर्ण महाराष्ट्र पाणी समस्येशी झगडत आहे. कारंजा शहर सुद्धा याच परिस्थितीतून जात आहे. खैरी धरणातील पाणीसाठा अगदी कमी झाला आहे.

पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित वाटर कप स्पर्धेत शहराला सहभागी होण्याची काही योजना नाही. परंतु भविष्यात कारंजा शहरातील भु-जल पातळी वाढविण्यासाठी वाॅटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांसारखं जलसंधारणाचं काम करण्याचं शहराच्या वतीनं संवेदना युवा मंच ने ठरवलं.
त्यादृष्टीने श्री संत लटारे महाराज पुण्यतिथी च्या पावन पर्वावर शहरवासीयांच्या मदतीने दि. १९/०५/२०१९ ते २८/०५/२०१९ भु-जल पातळी वाढविण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेअंतर्गत श्री विठ्ठल टेकडी जवळ च्या परिसरात सकाळी 6.00 ते 10.00 ला जल-संधारणासाठी श्रमदान करण्याचे काम अविरतपणे चालू आहे. शहरातील नागरिक सुद्धा श्रमदानात उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत.

आज आपण या श्रमदानात केलेल्या छोट्याशा मदतीमुळे पाणी प्रश्न मिटविण्यासाठी व पर्यायाने उज्वल भविष्यासाठी मदत होईल. यासाठी शहरवासीयांनी आपले कर्तव्य म्हणून या श्रमदानात सहभागी होऊन उद्याच्या उज्ज्वल जलमय भविष्यासाठी हातभार लावावा व जेसीबी च्या कामाकरिता शक्य ती आर्थिक मदत करावी, अशी विनंती संवेदना युवा मंच च्या वतीने करण्यात आली.

यासोबतच वाटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावातील जल-संधारणाचं प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती (वॉटर हिरो) व तालुक्यातील नोंदणीकृत जलमित्र तसेच शाळा, महाविद्यालये, मंदिर व्यवस्थापन, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था-संघटना यांनी सुद्धा श्रमदानात सहभागी व्हावं, अशी विनंती संवेदना युवा मंच ने केली आहे.

श्रमदानाच्या यशस्वीतेसाठी ग्रुपचे विशाल खवशी, मो. अजहर, प्रतिक लोखंडे, अंकेश शेकार, अभिषेक शेकार , चेतन जोगणे, कुंदन गोंडे व इतर सदस्य सातत्याने झटत आहेत.
सर्व प्रकरचे पोल्ट्रीफीड उपलब्ध 
संपर्क:९१७५९३७९२५ 

मंगळवार, मे ०७, २०१९

 खैरी धरणाच्या घश्याला पडली कोरड

खैरी धरणाच्या घश्याला पडली कोरड

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

- धरणांमध्ये फक्त १८ टक्के जलसाठा शिल्लक.

-  पुढील काही महिने कारंजा शहराला आणि तालुक्यातील गावांना याचं धरणावरून होणार पाणीपुरवठा.

-  समोरील काही दिवसात येणाऱ्या परिस्थितीला प्रशासनाच्या काहीच उपाययोजना नाही.

-  मागील नऊ महिन्यापासून पाण्याच्या टाकीचे पाईप लिक असून टेकडीच्या पायथ्यासी शेकडो लिटर पाण्याचा अपयव्य होत आहे.

-  स्थानिक नागरिकांनी सिमेंट आणि रेतीचा पाणवठा बांधून मोटर लावून चक्क पाणी नेले घरी.

-  तरी पण कारंजा नगरपंचायत प्रशासनाला जाग नाही.

-  दर ५ ते ६ दिवसाने नळाला येते पाणी.

-  सार्वजनिक नळांच्या टोट्या खराब असल्याने पाण्याचा होत आहे अपयव्य.

- शहरामध्ये चक्क दिसतो आहे पाण्याचा अपयव्य.

शुक्रवार, एप्रिल २६, २०१९

वर्ध्यात कत्तलखान्यात बैल घेऊन जाणा-या वाहनांचे मागील चाक निघाल्याने वाहनाला अपघात

वर्ध्यात कत्तलखान्यात बैल घेऊन जाणा-या वाहनांचे मागील चाक निघाल्याने वाहनाला अपघात

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे)


- ११ बैल जखमी



- नागपूर अमरावती महामार्गावरील कारंजा(घाडगे)येथील घटना



- वाहन सोडून चालक पसार,



- कारंजा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जखमी बैलावर उपचार सुरु



- घटनास्थळी पोलीस दाखल

शुक्रवार, एप्रिल १९, २०१९

वर्ध्यात गुरांच्या गोठयाला भीषण आग;६ जनावरांचा आगीत होरपडून मृत्यू

वर्ध्यात गुरांच्या गोठयाला भीषण आग;६ जनावरांचा आगीत होरपडून मृत्यू

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

कारंजा तालुक्यातील पार्डी गावात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गुरांच्या गोठयाला भीषण आग लागली. या घटनेत ६ जनावरांचा मृत्यू झाला तर ८ जनावरे गंभीर जखमी झालीत.या लागलेल्या आगीत  मुकुंदराव चाफले यांचे ३ जनावर,दिनबाजी सय्याम यांची २ जनावरांचा या आगीत होरपडून मृत्यू झाला,  


तर दोघांचेही ८ जनावरे या आगीत भाजले गेले.याच सोबत नामदेव कोडापे यांचे पेरनियंत्र,कुटार व  बंडी आगीत जळुन खाक झाली, तर किसना मर्सकोल्हे, शिवराम भलावी, महादेव कुंभारे, यांची शेती उपयोगी साहित्य आगीत खाक झाले. 

                        
हि आग दुपारी २ वाजता च्या दरम्यान लागल्याची गावकऱ्यांनी सांगितले,,जवळ अग्निशमन दल नसल्याने लोकांनीच आग विझवण्यास सुरवात केली.अडीच तासाने ४.३० वाजता आर्वी आणि आष्टीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली. घटनास्थळी तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार व तलाठी यांनी भेट दिली व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोल्ट्री फीड 

शनिवार, मार्च १६, २०१९

धक्कादायक:वर्ध्यात सापडला मानवी हाडांचा सांगाडा

धक्कादायक:वर्ध्यात सापडला मानवी हाडांचा सांगाडा

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

- पोत्यात हाडांचा सांगाडा आढळल्याने खळबळ

 - मोर्शी खरसखंडा रस्तालगतच्या पेट्रोल पंप मागील शेतात आढळले

-   पुरुष जातीच्या शरीराची कवटी सह हाडांचा सांगाडा 

- सकाळी दिसताच परिसरात खळबळ

- पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज

- महामार्ग लागून असल्याने कोणी फेकल्याचा अंदाज

- पोलीस घटनास्थळी दाखल
पोल्ट्रीफीड

मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९

गणगण गणात बोते च्या गजराने दुमदुमले कारंजा शहर

गणगण गणात बोते च्या गजराने दुमदुमले कारंजा शहर

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी इथे अनेक संतांनी अवतार घेतला त्यांच्या ज्ञानामृताने अमृतवचनाने समाजमन समृध्द झाले असाच विदर्भात एका अवलियाने जन्म घेतला तो म्हणजे संत गजानन महाराज.कुठलेही अवडंबर न माजविता प्रत्येक माणूस जोडित गेला. प्राणिमात्रावर दयाभाव ठेवून मानवतेचा मूलमंत्र दिला अशा जगतवंदनीय परमत्हादेय माऊलीचा १४१ वा प्रगटदिन कारंजा स्थीत श्री संत गजानन महाराज संस्था कारंजा(घा) जि. वर्धा इथे श्री संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा २०१९ संपन्न झाला या संस्थेचे हे ४ थे वर्षे सोम. दि. १८/२/२०१९ ते सोम. २५/२/२०१९ चा कालावधी मध्ये विविध धार्मिक समाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दै कार्यक्रमाध्ये महाआरती, परिसर सफाई व पारापण भजनाचे कार्यक्रम संगीतमय भागवत नुत्य व भजन व किर्तन आदिंचे आयोजन केले गेले. 

दि. २५/२/२०१९ ला प्रगट दिनाचे औचित्य साधून या अशा दिंडी पालखीचे शहराच्या प्रमुख मार्गावर भ्रमण झाली दिंडी चाले भक्त डोले किर्तनात जयघोश चालला भक्तीचा जल्लोष ही अनुभूती कारंजा वासीयांनी घेतला सडा
रांगोळींनी माताभगीनींनी अंगण सजवून पालखीची पूजाअर्चना केली.

रम्यसकाळी पाखराची किलबिल, सूर्यांची कोवळी किरण ही माऊलीच्या स्वागतासाठी सज्ज झाली मंदिरातून ही पालखी निघून या नगरीतील संत लटारे महाराज मंदिर, हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर, दादाजी महाराज मठ, गुरूदेव संवा मंदिर मार्गे, मुख्यरत्यानी आली. ह.भ.प. प्रमोद महाराज देशमुख नागपूर यांचे काल्याचे किर्तन होऊन दहीहांडी फोडन्यात आली. समारोपीय कार्यक्रमात या महोत्सवात तथा भजन, दिंडी मंडळांनी सहभाग घेतला होता त्या मंडळांच्या सत्कार समारोपीय समारभात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या आला. समाजातील वयोवृध्दांचाही सत्कार झाला. याच साठी होता केला अट्टहास शेवटचा दिसगोडव्हावा या युक्तीप्रमाणे प्रत्येक भक्त भावांनी प्रत्येय घेतला जन कारंजा नगरी माऊलीमय झाली. या संस्थेचे अध्यक्ष महादेवरावजी चौधरी, सचिव प्रेमराज डोंगरे, संचालक मंडळातील अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आदींनी या प्रगटदिनाचा निमित्याने कारंजावासियांना सेवा दिली.सोबतच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

काँग्रेस नगरसेवकांचा भाजप प्रवेश

काँग्रेस नगरसेवकांचा भाजप प्रवेश

माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत प्रवेश
उमेश तिवारी/कारंजा/वर्धा:

आर्वी येथे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच त्यांच्या माध्यमातून आर्वी विधानसभा क्षेत्रात होत असलेली विकास कामे यावर प्रभावित होत कारंजा येथील काँग्रेसचे कारंजा येथील वार्ड क्रमांक ५ चे नगरसेवक बाळू उर्फ लक्ष्मीकांत अजाबराव भांगे यांनी तसेच कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय काशिकर यांनी भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश घेतला. यांचा पक्ष प्रवेश शिरीष भांगे माजी सरपंच कारंजा यांच्या माध्यमातून झाला आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार हे काँग्रेस पक्षाचे असुन यांचे जनताप्रेम फक्त निवडणूक जवळ आली असता दिसुन येते. निवडणूक झाली की यांचे दर्शनही कार्यकर्त्यांना होत नसल्याने वार्ड, गाव, शहर तथा वैयक्तिक कामासाठी मदत होत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष विधानसभा पक्ष नेतृत्वावर आहे. जनतेनी सांगितलेली काम होत नसल्याने तसेच याउलट आमदार नसतांनाही आर्वी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास विविध योजना प्रभावीपणे राबवत माजी आमदार दादाराव केचे यांनी विधानसभा क्षेत्रात विकास कामांसोबत गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने दादाराव केचे एकमेव पर्याय असल्याने तसेच त्यांच्या मनमिळावू स्वभाव व विकास कामांमध्ये पक्षपातीपणा न करता सर्वांचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. असे प्रवेश करते वेळी लक्ष्मीकांत भांगे यांनी सांगत आणखी काही काँग्रेसचे नेते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे सांगितले.

प्रवेश घेतलेल्यांचे अभिनंदन माजी आमदार दादाराव केचे यांनी करत भावी विकासमय वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरीष भांगे माजी सरपंच कारंजा, सुनिल वंजारी, सुदीप भांगे, संजय कदम नगरसेवक कारंजा, किशोर भांगे, हेमंत बन्नगरे, निलेश मस्की, शिवम कुर्डा, दिलीप जसुतकर सरचिटणीस, प्रमोद कालभुत, गणेश लोखंडे, प्रकाश धारपुरे, सुजित चौधरी यांची उपस्थिती होती.

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

कारंज्यात राज्य आपत्ती दलामार्फत बचाव प्रात्यक्षिक सादर

कारंज्यात राज्य आपत्ती दलामार्फत बचाव प्रात्यक्षिक सादर

उमेश तिवारी/कारंजा(घा)वर्धा:
शुक्रवारला स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण संस्था कारंजा द्वारा संचालित गुरूकुल पब्लिक स्कूल कारंजा येथे राज्य आपत्ती दल नागपूर (SDRF) व पथक यांच्या वतीने विद्यार्थ्यासमोर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
 दैनंदिन जीवन जगत असताना मानवी आयुष्यात ज्या नैसर्गिक आपत्ती येतात . या आपत्तीला न डगमगता मोठ्या हिमतीने तोडगा व आपत्ती वर मात  करण्याचा संदेश या पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आला. पथकाने विद्यार्थ्यां समोर अनेक आपत्ती निवारण प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रात्यक्षिकेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
 या पथकाद्वारे नागपूर ते मुबई सायकल रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे सदर रॅली चा पहिला पडाव हा गुरूकुल स्कूलमध्ये होता. या पथकाला पुढील प्रवासा साठी गुरूकुल परिवारा तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी माननीय श्री. रमेश बहाळे साहेब (DYSP) राज्य राखीव बल नागपूर यांनी रॅली बद्दल मार्गदर्शन केले तसेच मनोज मोहोड साहेब व पथक यांनी विद्यार्थ्यां समोर प्रात्यक्षिक सादर केले सदर कार्यक्रमास बिरजू चत्रे साहेब (PI SDRF) चांदे साहेब कारंजा, मोहन डूळे साहेब कारंजा, मनोज मोहोड साहेब, दुधे साहेब, खळतकर साहेब, कुंभारे साहेब, भूमकर साहेब, डॉ. झाडे साहेब तसेच SRPF चे पूर्ण सायकलस्वार, बँड पथक SDRF व भोकरे सर, अप्पनवार सर, बोके सर, मुख्याद्यापक निंभोरकर सर, बाळापुरे सर, बारंगे सर, सचिन सर, जसुतकर सर, सर्व  शिक्षक व इतर कर्मचारी आणि सम्पूर्ण गुरूकुल रत्न उपस्थित होते.
  सदर कार्यक्रमास SDRF व SRPF दलाने कार्यक्रमाची प्रशंसा करून शाळेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी श्री प्रदिप मयराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा पो.स्टे.चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

विहरित पडून निलगाईचा मृत्यू

विहरित पडून निलगाईचा मृत्यू

कारंजा तालुक्यातील चांदेवानी येथील घटना
उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

कारंजा तालुक्यातील चांदेवानी येथील शेतातल्या विहिरीत निलगाईचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. पुरषोत्तम घोरमाडे यांच्या शेतातल्या या विहिरीत हि नीलगाय पडली. तिला बाहेर निघता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला .

 घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळ गाठत निलगाईला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दुपारी २ वाजता तिचा मृत्यू झाला. तिला त्याच अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

बुधवार, फेब्रुवारी १३, २०१९

दुचाकी अपघात दोघांचा मृत्यू

दुचाकी अपघात दोघांचा मृत्यू

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे) वर्धा:


सावरगाव वरून काटोल मार्गी आपल्या दुचाकीने बांगडापूर येथे जातांना नियंत्रण सुटल्याने दुचाकी स्वार असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान धर्ती गावाजवळ घडली.दुचाकीस्वराचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट धर्ती गावाजवळील पुलावर जावून धडकली.
MH.32.F.7231 या वाहनाने दोघेही आपल्या गावाकडे जात होते.यात रामभाऊ मारोती धाडसे रा. बांगडापूर जागीच ठार झाले तर दुसरा विवेक लक्ष्मण कन्नाके याला जखमी अवस्थेत कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.हे दोघेही बांगडापूर येथील रहिवासी आहेत.पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.

बुधवार, फेब्रुवारी ०६, २०१९

कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

पंचायत समिती कारंजा व कृषिव्यवसायिक संघ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२/०२/२०१९ रोज शनिवार ला पंचायत समिती कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे कृषी प्रदर्शन व चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेशजी खवशी यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून राविभाऊ शेंडे अद्यक्ष कृषी व्यावसायिक संघ वर्धा जिल्हा हे होते यावेळी कार्यकर्माचे स्वागताध्यक्ष मंगेशभाऊ खवशी सभापती,उपसभापती रंजनाताई टिपले पं स कारंजा हे होते.

 तसेच समाजकल्याण सभापती निताताई गजाम जी प वर्धा, उमेशकुमार नंदागवळी गट विकास अधिकारी, जी प सदस्य रेवताई धोटे, सरीताताई गाखरे, अनिल आदेवर कृषी अधिकारी,पं स सदस्य जगदीश डोळे,टिकाराम घागरे,पुष्पा ताई चरडे, आम्रपाली बागडे,रोशनीताई ढोबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते. सदर चर्चासत्रात संत्रा, मोसंबी व लिंबू फळपीक तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पीकाचे तज्ज्ञ मार्गदर्शन द्वारे सखोल मार्गदर्शन डॉ श्रीवास्तवव NRCC नागपूर,डॉ अंजिता जार्ज, डॉ आर येस शिरजूशे, डॉ आर के दास, व महाले यांनी केले.

या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला,ऍपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ संपूर्ण शेतमाल विकल्या गेला तसेच तालुक्यातील महिलाबचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली.

तालुक्यातील प्रगतिशील शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला त्यात केशवराव भक्ते हेटीकुंडी, सुनील ढोले बोरगाव ढोले, विनोद नासरे खरसखंडा, प्रशांत पुरी जोगा, वसंता अवथळे ब्राह्मणवाडा, श्रीराम चोपडे कारंजा, ज्ञानेश्वर भांगे कारंजा, श्रीमती सुनीता नेत्राम गाडगे बोनदरठाना , गजानन पेठे बोरगाव, माणिकचंद देशमुख नारा, प्रभाकर खवशी नारा,रमेश लोहकरे नागाझरी,विश्वजित आखरे चिंचोली,किशोर बंनगरे जसापूर, छायाताई गळहट चोपण या शेतकरी शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.

या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून, ऍग्री केअर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीताफळ ज्युस व शेक, युवा प्रगतशील शेतकरी किशोर बंनगरे यांची विषमुक्त पपई, ऍपल बोर, ऊस,उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले.
कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कृषी प्रदर्शन व चर्चासत्राचा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी घेतला लाभ

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

पंचायत समिती कारंजा व कृषिव्यवसायिक संघ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२/०२/२०१९ रोज शनिवार ला पंचायत समिती कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे कृषी प्रदर्शन व चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेशजी खवशी यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून राविभाऊ शेंडे अद्यक्ष कृषी व्यावसायिक संघ वर्धा जिल्हा हे होते यावेळी कार्यकर्माचे स्वागताध्यक्ष मंगेशभाऊ खवशी सभापती,उपसभापती रंजनाताई टिपले पं स कारंजा हे होते.

 तसेच समाजकल्याण सभापती निताताई गजाम जी प वर्धा, उमेशकुमार नंदागवळी गट विकास अधिकारी, जी प सदस्य रेवताई धोटे, सरीताताई गाखरे, अनिल आदेवर कृषी अधिकारी,पं स सदस्य जगदीश डोळे,टिकाराम घागरे,पुष्पा ताई चरडे, आम्रपाली बागडे,रोशनीताई ढोबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते. सदर चर्चासत्रात संत्रा, मोसंबी व लिंबू फळपीक तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पीकाचे तज्ज्ञ मार्गदर्शन द्वारे सखोल मार्गदर्शन डॉ श्रीवास्तवव NRCC नागपूर,डॉ अंजिता जार्ज, डॉ आर येस शिरजूशे, डॉ आर के दास, व महाले यांनी केले.

या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला,ऍपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ संपूर्ण शेतमाल विकल्या गेला तसेच तालुक्यातील महिलाबचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली.

तालुक्यातील प्रगतिशील शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला त्यात केशवराव भक्ते हेटीकुंडी, सुनील ढोले बोरगाव ढोले, विनोद नासरे खरसखंडा, प्रशांत पुरी जोगा, वसंता अवथळे ब्राह्मणवाडा, श्रीराम चोपडे कारंजा, ज्ञानेश्वर भांगे कारंजा, श्रीमती सुनीता नेत्राम गाडगे बोनदरठाना , गजानन पेठे बोरगाव, माणिकचंद देशमुख नारा, प्रभाकर खवशी नारा,रमेश लोहकरे नागाझरी,विश्वजित आखरे चिंचोली,किशोर बंनगरे जसापूर, छायाताई गळहट चोपण या शेतकरी शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.

या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून, ऍग्री केअर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीताफळ ज्युस व शेक, युवा प्रगतशील शेतकरी किशोर बंनगरे यांची विषमुक्त पपई, ऍपल बोर, ऊस,उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले.

गुरुवार, जानेवारी १०, २०१९

वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

वर्ध्यात गळफास घेऊन आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

  सेलगाव(उमाटे) येथील रहिवासी सुरेश नत्थुजी गाखरे वय (४५वर्षे) यांनी आपल्याच शेताजवळील वनविभागाच्या जागेतील सागवानाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बकरी चारणाऱ्या गुराखी डोमा कुरमती हा तेथे गेला असता त्याला प्रेत झाडाला लटकले असल्याचे दिसले.त्यांनी लगेचच त्याने गावात जाऊन त्याच्या घरी जाऊन हा घटनेची माहिती दिली.तत्काळत्याच्या नातेवाईक मंडळी व आजूबाजूच्यांनी शेताकडे धाव घेतली. वासुदेव दत्तूजी गाखरे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून प्रेत हे ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे उत्तरीय तपासणी करिता आणले. उत्तरीय तपासणी झालेले प्रेत पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकाला दिले. मृतकाच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी मृतकाचा मुलगा दुचाकी अपघातात मरण पावला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास केंद्रे व योगेश चाहेर आणि त्यांचा चमू करीत आहे.