कारंजा-आष्टीला प्रत्येकी २ कोटी रुपये प्राप्त
उमेश तिवारी/कारंजा (घा):
माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांतून कारंजा आणि आष्टी शहरांच्या विकासासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून प्राप्त झाले आहेत. आष्टी आणि कारंजा नगरपंचायत मध्ये सत्ता नसतांनाही नगरसेवकांच्या आणि स्थानिकांच्या विनंतीला मान देत माजी आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक २०/०८ /२०१८ रोजी आष्टी आणि कारंजा नगरपरिषद करीता प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे मागणी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १८ /९ /२०१८ रोजीचे रणजित पाटील यांनी पत्र दिले.
यातूनच आष्टी आणि कारंजा नगरपंचायत करीता प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कारंजा शहराच्या १७ वार्ड मध्ये व आष्टी शहरांच्या वार्ड मध्ये विकास कामे होणार आहेत. यासाठी आष्टी नगरपरिषदचे सदस्य मनिष ठोंबरे, अशोक विजेकर, अजय लेकूरवाडे, सुरेश काळपांडे, वंदना दारोकार, विमल दारोकार, प्रमोद गुप्ता (स्विकृत सदस्य) तसेच कारंजा नगरपंचायतचे सदस्य संजय कदम, शेख निसार, निता काकडे यांच्या मागणीला प्रत्यक्षरूपात दादाराव केचे यांनी उतरवले. दिनांक १६ /०६ /२०१९ रोजी कारंजा येथील विकास कामांचे भूमिपूजन दादाराव केचे यांच्या हस्ते तथा रामदास तडस खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देतांना दादाराव केचे यांनी सांगितले की, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे नगरपरिषदवर जरी सत्ता नसली तरी कारंजा आणि आष्टीत राहणारी जनता माझी आहे. त्याच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत आहे असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याचे मंत्री रणजित पाटील यांचे आभार मानले.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध |