Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कारंजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कारंजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जानेवारी १९, २०२०

भाजपा कारंजा तालुका अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर

भाजपा कारंजा तालुका अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर

कारंजा (घा):- 

              भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकीच्या वतीने कारंजा तालुका व शहर तर्फे चरडे मंगल कार्यालय येथे सभा पार पडली. या निवडणुकीमध्ये पर्यवेक्षक म्हणून माजी खासदार विजय मुडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दादाराव केचे, कारंजा पं.स.चे सभापती जगदिश डोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे व प.स.सभापती जगदिश डोळे यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            या निवडणुक प्रक्रियेमध्ये कारंजा तालुका भाजपा अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी प्रामुख्याने शिरीष भांगे,हरिभाऊ जसुतकर,जि.प.सदस्य सुरेश खवशी,रेवता धोटे,नीता गजाम,माजी सभापती मंगेश खवशी,पं.स.सदस्य रंजना टिपले,रोशनी ढोबाळे, आम्रपाली बागडे,नगरसेवक संजय कदम,बाळू भांगे,काकडे,निसार,त्याचप्रमाणे किशोर भांगे,राजू डोंगरे,सुनील वंजारी,तेजराव बंनगरे,गौरी अग्रवाल,बाबा मानमोडे,विशाल भांगे,चक्रधर डोंगरे,वसंता भांगे,शिवम कुरडा,निखिल धंडारे राणा बावरी यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुवार, ऑक्टोबर १७, २०१९

वर्धा:तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा:तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)

गवंडी येथील तरुण शेतकरी उमेश दौलतराव धोटे वय ३४ वर्षे या शेतकऱ्याने आज दि. १७/१०/२०१९ ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मृतक शेतकरीवर बँक चे अंदाजे ३ लाख रु कर्ज होते असे समजते. मृतकाच्या नावावर ९ ते १० एकर शेती आहे. आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीही नव्हते पत्नी लहान मुलाला घेऊन कारंजा येथे दवाखान्यात आली होती. तर म्हातारे आई आणि वडील शेतात गेले होते. 

मृतकाच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या हेमराज आटनेकर हे मृतकाच्या घरी शेती उपयोगी साहित्य मागण्या करीता गेले असता त्यांना मृतक उमेश धोटे फासावर लटकलेला दिसला. त्या बद्दल ची माहिती गवंडी येथील पुलिस पाटील पंकज धारपुरे यांना दिली असता घटनेची माहिती पोलीस ठाणे कारंजा यांना दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश साहेर करीत आहे.

शुक्रवार, जुलै १२, २०१९

सनशाईन स्कुल कारंजा ने केली सिडबॉल उपक्रमास सुरुवात

सनशाईन स्कुल कारंजा ने केली सिडबॉल उपक्रमास सुरुवात

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):




स्थानिक मनुविद्या सामाजिक संस्था द्वारा संचालित सनशाईन स्कुल कारंजा मध्ये विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक गुण विकसित व्हावे करिता विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचीच प्रचिती आज कारंजा वासीयांना सिडबॉल उपक्रम शुभारंभातुन आली. 



झाडे लावल्यानंतर त्यांचे संवर्धन करणे कठीण कार्य असते म्हणून संस्थाध्यक्ष प्रेम महिले  व सचिव विजय ठाकरे यांचे कल्पनेतून विद्यार्थी यांचे पर्यावरणाशी नाते जुळावे करिता माती व खत याचे मिश्रण करून त्यात कडू निंबाच्या बिया टाकण्यात आल्या व साधारणतः शालेय विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्याने 2000 सिड बॉल तयार करण्यात आले आणि संस्थाध्यक्ष प्रेम महिले यांचे वाढदिवसाचे निमित्य शाळे लगतच वनविभागाच्या जागेत सदर बॉल टाकण्यात आले पाणी येताच सदर बियांना अंकुर येवून त्याची मुळे जमिनीत रोवली जातात.

  या उपक्रमात बियाणे वनविभागात कार्यरत निशिकांत कापगते यांनी बिया पुरविल्या तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सिड बॉल चे महत्व विषद करण्यात आले तसेच त्यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर घरी तयार करावे आणि वाढदिवसाची भेट म्हणून प्रत्येक विदयार्थ्यांनी कमीत कमी 20 बॉल तयार करावे जेणेकरून 8 ते 9 हजार सिडबॉल्स तयार होतील  असे आव्हान प्रेम महिले यांनी केले. 

हा उपक्रम नसून एक चळवळ आहे आणि विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या शैक्षणिक कार्यासोबतच या चळवळीत सहभागी व्हावे त्याचबरोबर आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापिका संगीता चाफले, शिक्षक पवन ठाकरे, हेमंत बन्नगरे, शालीनि गोरे, ममता दिवाणे व सर्व शिक्षक शिक्षिका वृद्ध उपस्थित होते.

शुक्रवार, जून १४, २०१९

कारंजात शॉर्टसर्किट ने लागली दोन घराला आग

कारंजात शॉर्टसर्किट ने लागली दोन घराला आग

कारंजा(घा)उमेश तिवारी:

वेळीच लक्षात आल्याने मोठी घटना टळली

 आर्वी विधानसभेचे आमदार अमर काळे व कारंजा नगरपंचायतचे उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, नगरसेवक नरेश चाफले घटनास्थळी मदतीला आले धावून. 

 - कारंजा येथील दोन घरांना अचानक शॉट सर्किटने आग लागल्याने घराचे साहित्य जळाले. वेळीच आग लागल्याच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.शेषराव आमझिरे व बंडू आमझिरे यां दोघांच्या घराला संध्याकाळच्या सुमारास आग लागली.

या वेळी घरातील सर्व सदस्य हजर होते.आगीत घरातील कपडे , जीवनावश्यक साहित्यसह घरातील काही सामान जळाले.परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विजवली.

बुधवार, जून १२, २०१९

माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश

माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांना यश

कारंजा-आष्टीला प्रत्येकी २ कोटी रुपये प्राप्त
उमेश तिवारी/कारंजा (घा):


माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नांतून कारंजा आणि आष्टी शहरांच्या विकासासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी नगरविकास खात्याकडून प्राप्त झाले आहेत. आष्टी आणि कारंजा नगरपंचायत मध्ये सत्ता नसतांनाही नगरसेवकांच्या आणि स्थानिकांच्या विनंतीला मान देत माजी आमदार दादाराव केचे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक २०/०८ /२०१८ रोजी आष्टी आणि कारंजा नगरपरिषद करीता प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे मागणी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १८ /९ /२०१८ रोजीचे रणजित पाटील यांनी पत्र दिले.

यातूनच आष्टी आणि कारंजा नगरपंचायत करीता प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कारंजा शहराच्या १७ वार्ड मध्ये व आष्टी शहरांच्या वार्ड मध्ये विकास कामे होणार आहेत. यासाठी आष्टी नगरपरिषदचे सदस्य मनिष ठोंबरे, अशोक विजेकर, अजय लेकूरवाडे, सुरेश काळपांडे, वंदना दारोकार, विमल दारोकार, प्रमोद गुप्ता (स्विकृत सदस्य) तसेच कारंजा नगरपंचायतचे सदस्य संजय कदम, शेख निसार, निता काकडे यांच्या मागणीला प्रत्यक्षरूपात दादाराव केचे यांनी उतरवले. दिनांक १६ /०६ /२०१९ रोजी कारंजा येथील विकास कामांचे भूमिपूजन दादाराव केचे यांच्या हस्ते तथा रामदास तडस खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना दादाराव केचे यांनी सांगितले की, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे नगरपरिषदवर जरी सत्ता नसली तरी कारंजा आणि आष्टीत राहणारी जनता माझी आहे. त्याच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत आहे असे सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याचे मंत्री रणजित पाटील यांचे आभार मानले.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध