उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
स्थानिक मनुविद्या सामाजिक संस्था द्वारा संचालित सनशाईन स्कुल कारंजा मध्ये विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक गुण विकसित व्हावे करिता विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचीच प्रचिती आज कारंजा वासीयांना सिडबॉल उपक्रम शुभारंभातुन आली.
झाडे लावल्यानंतर त्यांचे संवर्धन करणे कठीण कार्य असते म्हणून संस्थाध्यक्ष प्रेम महिले व सचिव विजय ठाकरे यांचे कल्पनेतून विद्यार्थी यांचे पर्यावरणाशी नाते जुळावे करिता माती व खत याचे मिश्रण करून त्यात कडू निंबाच्या बिया टाकण्यात आल्या व साधारणतः शालेय विद्यार्थी व शिक्षक यांचे सहकार्याने 2000 सिड बॉल तयार करण्यात आले आणि संस्थाध्यक्ष प्रेम महिले यांचे वाढदिवसाचे निमित्य शाळे लगतच वनविभागाच्या जागेत सदर बॉल टाकण्यात आले पाणी येताच सदर बियांना अंकुर येवून त्याची मुळे जमिनीत रोवली जातात.
या उपक्रमात बियाणे वनविभागात कार्यरत निशिकांत कापगते यांनी बिया पुरविल्या तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सिड बॉल चे महत्व विषद करण्यात आले तसेच त्यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर घरी तयार करावे आणि वाढदिवसाची भेट म्हणून प्रत्येक विदयार्थ्यांनी कमीत कमी 20 बॉल तयार करावे जेणेकरून 8 ते 9 हजार सिडबॉल्स तयार होतील असे आव्हान प्रेम महिले यांनी केले.
हा उपक्रम नसून एक चळवळ आहे आणि विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या शैक्षणिक कार्यासोबतच या चळवळीत सहभागी व्हावे त्याचबरोबर आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापिका संगीता चाफले, शिक्षक पवन ठाकरे, हेमंत बन्नगरे, शालीनि गोरे, ममता दिवाणे व सर्व शिक्षक शिक्षिका वृद्ध उपस्थित होते.