माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत प्रवेश
उमेश तिवारी/कारंजा/वर्धा:
आर्वी येथे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच त्यांच्या माध्यमातून आर्वी विधानसभा क्षेत्रात होत असलेली विकास कामे यावर प्रभावित होत कारंजा येथील काँग्रेसचे कारंजा येथील वार्ड क्रमांक ५ चे नगरसेवक बाळू उर्फ लक्ष्मीकांत अजाबराव भांगे यांनी तसेच कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय काशिकर यांनी भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश घेतला. यांचा पक्ष प्रवेश शिरीष भांगे माजी सरपंच कारंजा यांच्या माध्यमातून झाला आहे.
आर्वी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार हे काँग्रेस पक्षाचे असुन यांचे जनताप्रेम फक्त निवडणूक जवळ आली असता दिसुन येते. निवडणूक झाली की यांचे दर्शनही कार्यकर्त्यांना होत नसल्याने वार्ड, गाव, शहर तथा वैयक्तिक कामासाठी मदत होत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष विधानसभा पक्ष नेतृत्वावर आहे. जनतेनी सांगितलेली काम होत नसल्याने तसेच याउलट आमदार नसतांनाही आर्वी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास विविध योजना प्रभावीपणे राबवत माजी आमदार दादाराव केचे यांनी विधानसभा क्षेत्रात विकास कामांसोबत गरजूंना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने दादाराव केचे एकमेव पर्याय असल्याने तसेच त्यांच्या मनमिळावू स्वभाव व विकास कामांमध्ये पक्षपातीपणा न करता सर्वांचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. असे प्रवेश करते वेळी लक्ष्मीकांत भांगे यांनी सांगत आणखी काही काँग्रेसचे नेते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे सांगितले.
प्रवेश घेतलेल्यांचे अभिनंदन माजी आमदार दादाराव केचे यांनी करत भावी विकासमय वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरीष भांगे माजी सरपंच कारंजा, सुनिल वंजारी, सुदीप भांगे, संजय कदम नगरसेवक कारंजा, किशोर भांगे, हेमंत बन्नगरे, निलेश मस्की, शिवम कुर्डा, दिलीप जसुतकर सरचिटणीस, प्रमोद कालभुत, गणेश लोखंडे, प्रकाश धारपुरे, सुजित चौधरी यांची उपस्थिती होती.