Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९

गणगण गणात बोते च्या गजराने दुमदुमले कारंजा शहर

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी इथे अनेक संतांनी अवतार घेतला त्यांच्या ज्ञानामृताने अमृतवचनाने समाजमन समृध्द झाले असाच विदर्भात एका अवलियाने जन्म घेतला तो म्हणजे संत गजानन महाराज.कुठलेही अवडंबर न माजविता प्रत्येक माणूस जोडित गेला. प्राणिमात्रावर दयाभाव ठेवून मानवतेचा मूलमंत्र दिला अशा जगतवंदनीय परमत्हादेय माऊलीचा १४१ वा प्रगटदिन कारंजा स्थीत श्री संत गजानन महाराज संस्था कारंजा(घा) जि. वर्धा इथे श्री संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा २०१९ संपन्न झाला या संस्थेचे हे ४ थे वर्षे सोम. दि. १८/२/२०१९ ते सोम. २५/२/२०१९ चा कालावधी मध्ये विविध धार्मिक समाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दै कार्यक्रमाध्ये महाआरती, परिसर सफाई व पारापण भजनाचे कार्यक्रम संगीतमय भागवत नुत्य व भजन व किर्तन आदिंचे आयोजन केले गेले. 

दि. २५/२/२०१९ ला प्रगट दिनाचे औचित्य साधून या अशा दिंडी पालखीचे शहराच्या प्रमुख मार्गावर भ्रमण झाली दिंडी चाले भक्त डोले किर्तनात जयघोश चालला भक्तीचा जल्लोष ही अनुभूती कारंजा वासीयांनी घेतला सडा
रांगोळींनी माताभगीनींनी अंगण सजवून पालखीची पूजाअर्चना केली.

रम्यसकाळी पाखराची किलबिल, सूर्यांची कोवळी किरण ही माऊलीच्या स्वागतासाठी सज्ज झाली मंदिरातून ही पालखी निघून या नगरीतील संत लटारे महाराज मंदिर, हनुमान मंदिर, राधाकृष्ण मंदिर, दादाजी महाराज मठ, गुरूदेव संवा मंदिर मार्गे, मुख्यरत्यानी आली. ह.भ.प. प्रमोद महाराज देशमुख नागपूर यांचे काल्याचे किर्तन होऊन दहीहांडी फोडन्यात आली. समारोपीय कार्यक्रमात या महोत्सवात तथा भजन, दिंडी मंडळांनी सहभाग घेतला होता त्या मंडळांच्या सत्कार समारोपीय समारभात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या आला. समाजातील वयोवृध्दांचाही सत्कार झाला. याच साठी होता केला अट्टहास शेवटचा दिसगोडव्हावा या युक्तीप्रमाणे प्रत्येक भक्त भावांनी प्रत्येय घेतला जन कारंजा नगरी माऊलीमय झाली. या संस्थेचे अध्यक्ष महादेवरावजी चौधरी, सचिव प्रेमराज डोंगरे, संचालक मंडळातील अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आदींनी या प्रगटदिनाचा निमित्याने कारंजावासियांना सेवा दिली.सोबतच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.