स्मशानभूमि करिता जागा उपलब्ध करून द्या... अन्यथा जनाक्रोशाला पुढे जा - सामाजिक कार्यकर्ते आनंद दहागावकर
मानव-जीव संघर्षाचे पडसाद-नागरिकांमध्ये प्रचंड भिती
मृत्यू नंतर मानवी प्रेत जाळणार कुठे न गाडणार कुठे असा गंभीर प्रश्न?
अहेरी :- सात गावांनी नटलेल्या नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील गावात ग्रामपंचायत प्रशासनाला चालना देण्याहेतू गावातील रहिवाशाकडून कर टॅक्स स्वरूपात घेण्यात येतो. यामुळे नागेपल्ली ग्रामपंचायतचे विक्रमी संख्या आहे. नागेपल्ली क्षेत्राचा विकास करताना मानव-जीव आकस्मिक मृत्यू संघर्ष टाळण्याच्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मानव-जीव आकस्मिक मृत्यू संघर्षात मोठी जीवित हानी होत असून अनेकांचा नाहक बळी जात आहे. हिंस्त्र प्रशासनमुळे सर्वसामान्य मानव वर्गात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. एवढे सर्व घडत असतानाही ग्रामपंचायत प्रशासन मात्र मानव जीवाचे मोल मोजण्या पलीकडे काहीच उपाययोजना करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास स्मशानभूमि करिता जागा उपलब्ध करून त्या जागेवरील अवैध अतिक्रमणचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास प्रचंड जन आक्रोशाला सामोर जावे लागेल असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ते आनंद दहागावकर यांनी सरपंच/सचिव यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वदूर परिचित असलेल्या ग्रामपंचायत नागेपल्ली गावाची दुसरी ओळख म्हणजे ही की, सात गावची मोठी ग्रामपंचायत असून फक्त कागदोपत्री गाव विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासनाकडून मोठी चालना मिळत असली तरी मात्र मानव-जीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत आहे. अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे दररोज हिंस्त्र हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुले, मजूर यांचा नाहक बळी जात असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे जाणवते. नागेपल्ली गावातील वाहतूक मार्ग, मानव वस्ती, वर्दळ ठिकाणी आज घडीला आता नागेपलीमध्येही मानव-जीव संघर्ष पेटला असून ग्रामपंचायत प्रशासन मात्र नागरिकांच्या नाहक जीवित बळींची नोंद करण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे दिसुन येते. अशा भयावह स्थितीत अहेरी विधानसभा मतदार संघातील अहेरी तालुक्यातील नागेपली मध्ये सायंकाळ ते रात्रपाळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक व जीवावर भेटणारा झाला असून गावातील नागरिक दहशतीखाली जीवन जगत आहे. मानव-जीव मृत्यू हे काही सांगून येत नसून वाढत्या घटना पाहता पेटून उठण्याची गरज असून, जीवांचे रक्षण झालेच पाहिजे यात कुठलेही दुमत नसून मानव-जीव संघर्षामुळे गावात होत असलेली जीवित हानी या आकस्मिक जीवितहानी टाळण्यासाठी नागेपल्लीत नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून, तसेच शाळा महाविद्यालययात ये-जा करणारे, जाणारे लहान-मोठ्या विद्यार्थ्यांना गावात मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे, त्यावर म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी तथा वार्ड मेंबर्सनी ग्रस्त, गावातील गस्ती कामावर घेऊन मोठ्या प्रमाणात गस्त लावणे, गाव स्वच्छता कडे लक्ष घालणे, वारंवार नाल्या साफसफाई, गावा लगतचे झाडे सफाई, गावात सी.सी.टिव्ही, ट्रॅप कॅमेरे बसविणे, गावाशेजारी सोलर लाईट बसविणे, अशा विविध उपाययोजना करून महत्वाचं हे की स्मशान भूमीवरील अतिक्रमण काडून जागा रिक्त करून तातडीने बंदोबस्त करा अन्यथा नागेपल्लीत यापुढे मानव-जीव संघर्षात गावात कुठलीही जीवितहानी झाली या आकस्मिक मृत्यू झाला तर संबंधित ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयात मृतदेह ठेवून आंदोलन करणार असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ते आनंद दहागावकर यांनी दिला आहे.
निवेदन देताना किशोर रापेल्लीवार, किशोर दुर्गे, गणेश दुर्गे, माया सुनतकर, अशोक रापेल्लीवार, संतोष अग्रवाल,मोहन खोब्रागडे, रेड्डी सावकार,किरण खोब्रागडे,ओमप्रकाश खेवले, जमीर शेख, सब्बीर शेख, अरुण आत्राम, ओमप्रकाश चुनारकर, बंडू मोहुर्ले, विलास निकोडे, लक्ष्मण मोहुर्ले, रामचंद्र निकोडे, रामचंद्र दहागावकर, तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.