Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

तरुणांच्या तंदुरुस्तीसाठी खासदार फंडातून क्रीडा व व्यायाम साहित्य Sports and Exercise Materials from MP Fund for Youth Fitness*

*l

*वणी तालुक्यातील लाठी - भालर येथे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा*

यवतमाळ : चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी तरुण पिढी तंदुरुस्त रहावी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करता यावे, यासाठी खासदार निधीतून वणी तालुक्यातील लाठी येथे व्यायाम साहित्य 5 लाखाचे तर क्रीडा साहित्य 7 लाखाचे साहित्य उपलब्ध करून दिले.

वणी तालुक्यातील ग्रामपंचायत लाठी-भालर वसाहतला प्राप्त झालेल्या - व्यायाम साहित्य व क्रिडा साहित्याचा लोकार्पण सोहळा, रविवार दि. २५/१२/२०२२ रोजी रात्री 7 वाजता जिल्हा परिषद शाळा लाठी येथे आयोजीत करण्यात आला होता. सदर लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक सन्मानिय खासदार बाळुभाऊ धानोरकर हे होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच ग्रामपंचायत लाठी-भालर वसाहत योगिता मोहोड, झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष कुलसंगे, दुबे, वणी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद वासेकर, माजी सरपंच उकणी संजय खाडे, माजी सभापती वणी सुनील वरारकर, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामु तिवारी, ओम ठाकूर, विलासभाऊ खोके, निवली सरपंच बबन वाटेकर, तरोडा सरपंच वैष्णवी वऱ्हाटे, बेसा सरपंच संध्याताई वाघमारे, भालर सरपंच मंदाताई हेपट, पोलीस पाटील संजिवनी खिरटकर, तंटामुक्ती अध्यक्ष, लाठी धर्मेंद्र डोहे, सुनिता डवरे, मनोहर गोवारदिपे, तेजस्वी खिरटकर, गेडाम, निळकंठ धांडे, मीरा माहुरे यांची उपस्थिती होती.

यावेळी ग्रामसेवक मंगेश खोके, निवृत्त ग्राम विकास अधिकारी विजय काकडे, सुनिता कातकडे ग्रामसेविका यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रीती डोहे यांनी केले, प्रास्ताविक राहुल खारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश चार्लीकर यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.